महानूभाव पंथ
2K Posts • 5M views
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *‼️चिंतन‼️* 🌹आपल्या जीवनात गुंता आणि चिंता ही कायमची सोबत असते. प्रत्येक टप्प्यावर काही ना काही प्रश्न, आव्हाने, जबाबदाऱ्या आणि नवनवीन परिस्थिती आपल्यासमोर उभी राहतात. या गोष्टींना कधीच शेवट नसतो, कारण जीवन म्हणजे सतत चालणारा प्रवास आहे. 🌹खरे तर या प्रवासात आपल्याला सतत कुणीतरी आधार द्यावा, साथ द्यावी अशी अपेक्षा असते. परंतु खरी ताकद आपल्यातच दडलेली असते. आपण स्वतःला सांभाळायला शिकतो, निर्णय घ्यायला शिकतो, पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकतो. हीच खरी साधना आहे. 🌹या सगळ्यात आपण एकटे नसतो. आपल्या मागे सदैव एक अदृश्य शक्ती असते—ती म्हणजे "भगवान". आपण त्याला कधी देव म्हणतो, कधी नशीब, तर कधी श्रद्धा, भक्ती. पण तो नेहमीच आपल्या पाठीशी असतो.. 🌹आपल्याला धीर देतो, योग्य मार्ग दाखवतो, आपल्या अंतर्मनात आशेचा किरण जागवतो.. 🧘🏻‍♂️म्हणून आयुष्यात कितीही गुंता, चिंता किंवा संकटे आली तरी स्वतःवर विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या कृपेवर श्रद्धा ठेवा. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहिलो तर भगवंत आपल्याला पुढे जाण्यासाठी शक्ती, धैर्य आणि समाधान नक्कीच देतो. 🌹स्वतःला जपणे हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे, आणि त्या सामर्थ्याच्या सावलीतच भगवंत सदैव आपल्या सोबत असतो..✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रात्री📿🙏🏻* #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #शुभ रात्री good night
18 likes
38 shares
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* 🧘🏻‍♂️ *"विचार मंथन"* 🙏🏻 🌹न आयुष्यातला संघर्ष कमी होत न तक्रारी, जे हळूहळू संपतय, कमी होत जातय ते आहे "आयुष्य".. 🌹कोण काय करतोय, कसा करतोय, का करतोय या सर्व प्रश्नांपासून आपण जितके दूर राहू तितके अधिक आनंदात राहू. 🌹विचार केला होता कांही एक केले काही वेगळच, झाले काहीं वेगळेच मिळाले ही काही वेगळेच हेच तर जीवन आहे.. 🌹फार कठीण आहे जीवन.. खोट बोलावे तर स्वतःला त्रास आणि खरे सांगावे तर सर्वांनाच त्रास..😊 🌹अनुभवांचे स्वागत करावे, तर काय सांगावे, कुठला अनुभव आयुष्य बदलून टाकू शकेल ते.! 🌹आयुष्यात मिळते तर बरच काही, पण आपण मोजदाद करतो जे आपल्याला मिळालेच नाही त्याची.. 🌹चिकूचे बी फळात राहूनही, फळ परीपक्व झाले की, त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे.. 🥭आंब्याची कोय मात्र, आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकले तरी, रसातून अलग होत नाही. 'परिणाम', तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही म्हणून.. 🌹चिकूच्या बी सारखे वागावे, सगळ्या मोहजाळात राहूनही, योग्य वेळी करकरीत बाहेर पडावे.. 🌹कोयीसारखे मायारूपी रसात गुरफटून रहाल, तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत, पिळायच्या आधीच बाहेर पडले पाहिजे.. 🌹अपेक्षा कमी ठेवाव्यात, अमर्याद आनंद मिळेल बघा, आयुष्य आहे, ते सोपे कसे असेल.. *"अन जे सोपे आहे, त्याला आयुष्य कसे म्हणता येईल..?✍🏻* *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞 जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रात्री📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ#महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी # मी महानुभाव पंथ # श्री पंचकृष्ण# श्री आत्रेय नमः #माझा देव पोईराज बाबा. #शुभ रात्री
27 likes
44 shares
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी # मी महानुभाव पंथ # श्री पंचकृष्ण# श्री आत्रेय नमः #माझा देव पोईराज बाबा. #शुभ रात्री *"विचारमंथन"* *"आपल्या निर्णयातील शहाणपण आपले गंतव्यस्थान ठरवतात..!!"* 🧘🏻‍♂️आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस, सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ति आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही.. 🌹जर देवाने तुम्हाला दुःखाच्या जवळ आणले असेल, तर तो तुम्हाला त्यापलीकडे घेऊन जाईल असा विश्वास ठेवा. इतरांच्या चष्म्यातून स्वतःकडे पाहू नका; त्यांची दृष्टी अस्पष्ट असू शकते कारण स्वतःपेक्षा चांगले कोणीही स्वतःला समजू शकत नाही.. 🫠दुध, दही, ताक, लोणी तुप, सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते, कारण "श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही, तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते अस्तित्वमुळे निर्माण होते.. 🤨फक्त एक साधा आणि प्रामाणिक माणूसच खूप लवकर रागावतो. धूर्त आणि अप्रामाणिक व्यक्तीला त्याच्या सर्व भावना लपवून कसे हसावे हे कळते.. 😇जर तुमचे विचार बदलले नाहीत तर पाण्यात डुबकी मारून आणि हजारो वेळा तीर्थस्थळांना भेट देऊन तुम्ही काय चांगले करू शकता..? इतरांना दाखवण्यासाठी कधीही काहीही करू नका; अशा प्रकारे काम करा की प्रत्येक जण आदर्शाने तुमच्याकडे पाहत राहील..!!✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रात्री📿🙏🏻*
13 likes
6 shares