@mk358 🇮🇳34
1.2K views
2 days ago
नामांतर आंदोलन म्हणजे आंबेडकरी चळवळीतील एकमेव प्रदीर्घ आंदोलन. या आंदोलनात आम्ही सगळेच तरुण ज्यांना जिथे, जसे शक्य होईल तसे सहभागी होत होतो. त्या काळात नामांतर लढ्यासाठी मी एका फिल्मी गाण्याच्या चालीवर एक गाणं लिहलं होतं. १९८५ साली अत्यंत सुपर, डुपर झालेला हा पिक्चर होता. त्या पिक्चरचं नाव होतं 'प्यार झुकता नही !' त्यात एक गाजलेलं गाणं होतं. त्या गाण्याचे बोल असे होते..., "चाहे लाख तुफा आये, चाहे जान भी अब जाये, मुश्किल हो जीना फिर भी, पडे जहर पिना फिर भी, मिलके ना होंगे जुदा आ, आ कसम खाले॥ ये चाहत रहेंगी सदा आ, आ कसम खाले॥" या चालीवर मी लिहलं होतं... "रक्ताने भिजवू धरती, नामांतर प्रश्नावरती, बळी देऊन कोटी, कोटी, 'आंबेडकर' लाऊ पाटी, अरे, ओवाळून टाकू तिथे प्राण, या रे ही शपथ खाऊ!" त्या काळात हे गाणे इतके लोकप्रिय झाले होते की, बर्‍याच आंबेडकरी कव्वालांना लोकं या गाण्याची फर्माईश करायचे. उद्याच्या नामांतर दिनाच्या तमाम लढवय्या स्त्री, पुरुष भिम सैनिकांना हार्दिक सदिच्छा! जयभीम! #डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दीन #मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन 💙 #१४ जानेवारी १९९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस🔥🇪🇺✊🏻 #नामांतर #नामविस्तार दिन #मराठवाडा विद्यापीठ #डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ #जय भीम #💙नामविस्तार दिवस 🇪🇺