ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
760 views
5 months ago
पुरुष नाचवत राहतात बायका कधी तमाशात कधी शाळेत कधी शयनगृहात कधी दहीहंडीतल्या हजारो कृष्ण गणपतीसमोर निर्लज्जपणे! लहान लहान पोरंही मग एका क्षणात पुरुष बनतात छाती फुगवून देतात इशारे तिला तेही मर्द असल्याचे मारत राहतात शिट्टया कामुकतेने! सगळे पुरुष मिळून तिच्या बाणांनी घायाळ होऊन सबसे कातील म्हणत नागव्या डोळ्यांनी तिची इज्जत लुटतात बिनदिक्कतपणे! कधीकधी पावरफुल नवऱ्यांसोबतच्या खानदानी बायकाही डोक्यावरील पदर सांभाळत थिरकतात या बायांसोबत चोरटेपणाने! द्रौपदीची आब्रू वाचवणारा कृष्णही मग तुझा कृष्ण मुरारी गं माझी छेड काढीतो ऐकून डोळे बंद करून घेतो आणि गर्दीत नाहीसा होतो गुपचूपपणे! त्यालाही माहिती आहे पुरुषांसाठी बाया फक्त शरीर आहेत बाईच्या शरीरावर नोटांची बंडलं फेकून ते फक्त स्वतःची नुमाईश करून घेतात आणि मग हेच सज्जन पुरुष कलेच्या नावाखाली दाबतात तिची अगतिकता त्यांचं गिऱ्हाईकपण उघडं करून ते बाईचा भाव ठरवत तिलाच म्हणायला लावतात माझ्या शरीरावर माझा हक्क निर्ढावलेपणाने! सख्ख्या आया बहिणींचीही दलाली करणाऱ्या पुरुषांच्या राज्यात स्त्री कधीच नुसती कलाकार नसते ती केवळ देह असणारी बाई असते आणि बाई कधीच माणूस नसते! पुरुषांना रिझवण्याच्या व्यापाराला कला म्हणणं थांबवलं पाहिजे स्त्रीनं आता नुसता देह बनणं नाकारलं पाहिजे! फक्त माणूस बनण्याच्या प्रवासाला तिनं सुरुवात केली पाहिजे! कल्पना आहे प्रवास खडतर आहे तरी तिनं चाललं पाहिजे निडरपणे! -----------O--------- #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #एक सत्य #🌹प्रेमरंग #❤️I Love You

More like this