"भस्म व्हायच्या आधी थोडं जगून घ्या"
आपण रोज धावत आहोत. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या, ध्येयं, स्पर्धा—या सगळ्यात आपण जगणं विसरत चाललो आहे.
आपलं आयुष्य म्हणजे एका वाळूच्या घड्याळासारखं आहे. वाळूचे कण वरून खाली पडतायत…आणि एक दिवस ती वाळू संपणारच.
प्रश्न एवढाच आहे – ती वाळू संपेपर्यंत आपण खरंच जगतोय का?
"आपण सगळे जन्माला आलोय, ते एका अनिश्चित एक्सपायरी डेटसह." मग प्रश्न आहे, जेव्हा शेवटी आपल्याला भस्मच व्हायचंच आहे, राखच व्हायचंच आहे, तर आधी खरं जगायचं की नाही?
आपण कुठे धावत आहोत?
सकाळी डोळे उघडले की मोबाईलमधील मेल्स,
कामावर ताण,
घरी आलो की पुन्हा चिंता,
आपलं जगणं "to-do list" मध्ये अडकलं आहे.
“आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे.”
“टार्गेट पूर्ण करायचं आहे.”
“बिलं भरायची आहेत.”
"मुलांची शाळेची फी भरायची आहे."
आपण धावतच राहतो, पण कुठे पोहोचतो?
माणूस नोकरीमध्ये इतका बुडाला की त्याच्या मुलांचा पहिला बोबडा शब्द ऐकायला तो घरी नसतो, शाळेतला पहिला दिवस त्याने पाहिला नाही आणि वडीलधाऱ्यांसोबत जेवण करायला त्याला वेळ नाही आणि एके दिवशी अचानक हार्ट अटॅक येतो आणि माणूस होत्याचा न्हवता होतो, काही काळात राख होतो. धावपळीत हरवलेलं आयुष्य.
आपल्यापैकी कितीजण असं करतायत?
आपण पैशासाठी धावतो, पण शेवटी पैसे खर्च करायला वेळच उरत नाही. आपण भविष्य सुरक्षित करायला इतके गुंतून जातो की आजचा आनंद हरवतो.
आपण लक्ष दिलंय का? लहान मुलं किती सहज हसतात. ते भविष्याचा विचार करत नाहीत, भूतकाळाचं ओझं घेत नाहीत. ते फक्त "आत्ता मध्ये" जगतात.
आणि आपण?आत्ता विसरून सतत उद्याची भीती आणि कालचं दुःख यामध्ये अडकून बसतो.
प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
आठवा बरं,तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेत का?
तुम्ही कोणाला संकटात मदतीचा हात दिला का?
तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खरंच वेळ घालवला का?
शेवटी, आपण सगळेच भस्म होणार आहोत. आपण राख झाल्यावर लोकांना आपल्याबद्दल काय आठवेल?
आपण किती बँक बॅलन्स ठेवला होता?
की ,आपण लोकांना कसं वागवलं, कठीण काळात कोणाचा हात धरला, कोणाला मदत केली, कोणाचे अश्रू पुसले, कोणाला हसवलं?
महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, भीमराव आंबेडकर आणि इतर ही महान लोकांकडे प्रचंड संपत्ती नव्हती, पण लोकांच्या हृदयात आजही ते जिवंत आहेत. कारण त्यांनी जगताना, इतरांचं आयुष्य उजळवलं.
आपल्या आईवडिल-भाऊ-बहीण बायको-मुलं, प्रियकर-प्रेयसी मित्रांना आणि मुख्यत्वे स्वतःला वेळ द्या.
पैशाने वेळ विकत घेता येत नाही आणि एकदा गेलेला क्षण परतही येत नाही.
जगात, तुम्ही असताना किंवा तुम्ही निघून गेल्यावरही, कोणी तरी तुम्हाला आठवेल, कारण तुम्ही त्यांना कधी तरी मनापासून मिठी मारली होती, आदरनं-प्रेमानं वागवलं होतं. माणूस पैसा विसरेल, पण तुम्ही दिलेलं प्रेम-आदर विसरणार नाही. प्रेम पसरवा.
लोकं म्हणतात – “मी रिटायर झाल्यावर मज्जा करणार आहे, खूप उधळपट्टी करेन, प्रवास करेन, गाणं शिकेन, आयुष्य एन्जॉय करेन.”
पण होतं काय?
६० नंतर डॉक्टर सांगतात – “मीठ कमी करा, साखर कमी करा, चढउतार टाळा.”
म्हणजे दात होते, तेंव्हा चणे न्हवते
आणि आता चणे आहेत, तर दातांनी निरोप घेतला...😊
म्हणून,
फक्त विचार करत बसू नका, काहीतरी करा. गाणं शिकायचं असेल, तर शिका, प्रवास करायचा असेल, तर करा. स्वप्नं जगा. शरीर तरुण असताना प्रवास करा, नवं शिका. सुरक्षित खेळत बसू नका. आपल्या हृदयाचं, आपल्या शरीराचं ही ऐका.
प्रत्येक दिवसाला भेट म्हणून समजा. आज मिळालेला श्वास उद्या असेलच असं नाही. मग का उद्याच्या चिंता करून आजचा आनंद वाया घालवायचा?
आपण राख व्हायचंच आहे, भस्म व्हायचंच आहे. पण त्या आधी जगा.
एखाद्याला मनापासून हसवा,🤗
एखाद्याला मदतीचा हात द्या,🤝
स्वतःसाठी थोडं जगा
स्वप्नं जगा. मनमुराद हसा-खेळा-बागडा...
कारण जेव्हा शेवटी राख होणार आहोत, तेव्हा महत्वाचं फक्त इतकंच असेल—
"आपण खरंच जगलो का?"
म्हणून पुन्हा एकदा सांगतो –
भस्म व्हायच्या आधी थोडं जगून घ्या....!!!
#बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #एक सत्य #true #true