ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
892 views
आजकाल काही बायका लग्न झाल्यावर सतत धमक्या देत.“मी राहणार नाही.मी जाईन.मी सहन करणार नाही.”मला राहायचं नाही. मी निघून जाणार मला घटस्फोट हवा.काही पुरुष लग्न झाल्यावर सतत धमक्या देतात “मी राहणार नाही.मी घटस्फोट देईन. मला तुझ्याशी काही संबंध नाही.” अरे, जर इतकंच राहायचं नव्हतं तर लग्न कशाला केलंस? त्रास द्यायला फक्त एकमेकांना आणि बाकी लोकांना?बाकीच्या लोकांनी कायमच रागाचा, धमक्यांचा बळी का व्हायचं?तो/ती पण माणूस आहे, त्याला पण भावना आहेत.धमक्या देणं म्हणजे प्रेम नाही ती सरळसरळ छळवणूक आहे.जर इतकंच नकोसं वाटत होतं, तर लग्नच करू नका. नातं मोडायच्या धमक्या देणं हे काही परिपक्व वागणं नाही.स्वतःची बुद्धी वापरा आणि स्वतःची बुद्धी वापरली तर हे अशा धमक्या तुम्ही देणारच नाही. आणि नाही असं वाईट वागणार. तो/ती शहाण्या व्यक्तिला धमक्या द्यायची गरजच नसते,कारण स्वभाव,कदर हेच परिपक्व. तो/ती वारंवार धमक्या देणं म्हणजे अपमान करणं, आणि नात्याचा पाया हादरवणं. आणि हे पण लक्षात ठेवा, तुम्ही काही Miss World नाही आहात,की सगळे तुमच्या हट्टापायी डोकं खाली घालतील.आणि हे पण लक्षात ठेवा तुम्ही काही सुपरहिरो नाही आहात,की ती धमकीने जगेल.घर टिकवणं, नातं सांभाळणं ही खरी सुंदरता आहे.धमक्या देऊन कुणी मोठं होत नाही.महिला असो किंवा पुरुष, धमक्या देणं, वाईट वागणं, कलह करणं, हे चूकच. मुलांनी पण एकदा ठाम निर्णय घ्यायला हवा जर बायको सतत धमक्या देत असेल,जे व्यक्ती तुमच्यावर इतक्या साऱ्या केसेस लावते.कायद्याच्या धमक्या देणं किंवा खूप साऱ्या केसेस तुमच्यावर लावणं तुमच्या घरच्यांवर हे प्रेम नसतंच आणि मनात प्रेम नसतंच त्यामुळे त्या व्यक्तीला सोडून देणंच गरजेचं असतं. तर त्या व्यक्तीला तिला सोडून द्यावं.आणि हेच मुलींच्या बाबतीतही.जे नातं धमक्यांवर, cases वर, त्रासावर टिकतं ते नातं नसतं. अशा नात्यापासून दूर जाणंच खरं शहाणपण आहे.अशा वेळी त्या व्यक्तीला सोडून देणं गरजेचं असतं, सोडून द्या अशा वेळेस त्या व्यक्तीला. म्हणून सतत धमक्या देणाऱ्यांनी आधी आरशात बघावं.मला दोन तीन जणांनी प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी हा लेख लिहिला आहे, त्यामुळे मला जेवढं समजतं तेवढं मी लिहिलं.आणि हा लेख सर्व लग्न झालेल्या लोकांसाठी आहे.मग ती बाई असो किंवा पुरुष यात बाकी लोकांचं काहीही नाही. आणि हा लेख ज्यांना लागेल किंवा ज्यांना वाटेल माझ्याच बाबतीत होतं. तर ते चुकीचे वागतात. मध्ये महिला असो किंवा पुरुष.इतकही चुकीचं वागू नका, वाईट वागू नका की तो लेख तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतः त्या लेखामध्ये स्वतःला पहाल किंवा स्वतःला लागेल.कृपया नोंद घ्यावी.यात बाकीच्या लोकांना ओढू नका. #घटस्फोट ##घटस्फोट.. #भारतीय लग्न #लग्न