ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
2K views • 3 days ago
💔 *“बायोडाटा परफेक्ट*… पण समजूत *झिरो*!”
💔 “शिक्षणानं नातं नाही टिकत… समजुतीनं टिकतं!”🔥
आजकाल लोक लग्न करताना बायोडाटा, पदवी, आणि पगार बघतात… पण “ *माणूसकी* ” नावाचा शब्द विकून खाल्ला आहे, असं वाटतं!
अभिजीत आणि नेहा — दोघंही जास्त शिकलेले, चांगल्या घरचे, सर्व बाबतीत परफेक्ट.
त्यांचं लग्न प्रेमाने नाही, तर एकमेकांचा बायोडाटा बघून ठरलं होतं.
आई-वडिलांच्या दृष्टीने सगळं योग्य — शिक्षण, नोकरी, घर, प्रतिष्ठा.
पण एक गोष्ट मात्र कोणीच बघितली नाही — “समजून घेण्याची तयारी.”
लग्नाच्या काही महिन्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले.
नेहाला वाटायचं — “मी शिकलेली, माझं म्हणणं नेहमी बरोबरच.”
अभिजीतलाही वाटायचं — “ती इतकी शिकलेली असूनही समजून घेत नाही…”
दोघंही आपापल्या अहंकारात खूपच अडकलेले.
एका दिवशी वाद झाला आणि नेहा बॅग भरून माहेरी निघून गेली.
आई-वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगत होती —
पण प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची नसते,कारण काही गोष्टी आपल्या नात्यात राहूनच सोडवायच्या असतात,
बाहेर गेल्यावर त्या फक्त “बातम्या” बनतात.हे दोघं गरीब नव्हते, परिस्थिती वाईट नव्हती, संसार चालवायला सगळं होतं…
पण समजूत नव्हती.
आणि जेव्हा शिक्षणापेक्षा अहंकार मोठा होतो,तेव्हा कितीही शिकलेलं असलं तरी नातं तुटतंच.
आजच्या काळात लग्न म्हणजे स्पर्धा झाली आहे —
“त्या मुलाला एवढा पगार आहे का?”, “तो किती शिकलेला?”,
“मुलगी किती स्मार्ट दिसते?”, “त्यांचं घर मोठं आहे का?”
अपेक्षांच्या नावाखाली आता मुलां-मुलींमध्ये व्हरायटी आणि स्पर्धा ओझ्यासारखी लादली गेलीय.
लग्न करताना फक्त पदवी नाही, माणूसकीही बघा.
कारण पदवीने नातं सजतं, पण *माणूसकीने* नातं टिकतं.
“आजकाल काही मुली आणि त्यांचे घरचे लग्न करताना शिक्षण, पैसा,शेती, पगार, घर याचं गणित मांडतात…आणि त्या गणितात ‘माणूसकी’ नावाचा शब्द कुठेतरी विकून खाल्ला जातो.
म्हणूनच लग्नं होत आहेत, पण संसार टिकत नाहीत...आजकाल सरासरी दहा पैकी फक्त दोन लग्न (संसार)टिकतात.... #लग्न #भारतीय लग्न #लग्न #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻
22 likes
22 shares