काल एक महिला भेटली. एका शासकीय खात्यात कर्मचारी आहे. वय ५५ वर्षं. निवृत्तीला अजून ३ वर्षं बाकी आहेत. तिने ३० लाखांची गाडी घेतली आहे. स्वतःला चालवता येत नाही म्हणून ड्रायव्हर ठेवला आहे. आयुष्यभर पायपीट आणि ऑटोने प्रवास करत आली. पण आता म्हातारपणी गाडी घेणं तिच्या कुटुंबीयांना पसंत पडलेलं नाही.
पती आणि मुलगा–सून तिला सतत बोल लावत आहेत की, "इतकी उधळपट्टी का केलीस?”
तिचा नवरा आयुष्यभर बेरोजगार होता. कधीच काही काम केलं नाही, पगाराचा सर्व हिशोब नवऱ्याच्याच हातात असायचा.
मुलगा शासकीय नोकरीत आहे. सूनही शासकीय सेवेत आहे.
महिलेच्या निवृत्तीच्या वेळी सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत आणि सगळ्यांच्या नजरा त्या पैशांवरच आहेत.
ती महिला म्हणाली,
“मी आयुष्यभर जबाबदाऱ्या पार पाडल्या. नवऱ्यासाठी आणि मुलासाठी स्वतःच्या इच्छा गाडून टाकल्या. लोकांकडून लिफ्ट घेतली, ऑटोने, पायी प्रवास केला. आता निवांत आयुष्य सुरू होतंय, म्हणून गाडी घेतली. पण गाडी घेतल्यापासून घरचे सगळेच मूकबधीर झालेत! कुणी नीट बोलतही नाही. नवरा म्हणतो, ‘३० लाख खर्च करायचं काय कारण? ४–५ लाखातसुद्धा गाडी आली असती.’
मुलगा आणि सून तर गेल्या महिनाभरात माझ्याशी बोललेही नाहीत. त्यांना आता भीती वाटते की मी निवृत्तीनंतरचे पैसेही हौसमौजेसाठी खर्च करेन.
मुलगा त्या पैशातून जमीन घेऊन बंगला बांधायचे स्वप्न पाहतोय.
पण खरं सांगू का? आता मीही ठरवलंय मी पै पै स्वतःसाठी वापरेन. कुणालाच दोन कवडीही देणार नाही. नवऱ्याने साथ दिली तर ठीक, नाही दिली तर एकटीही जगेन.
पण आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. कारण हे उमगलंय की सगळी नाती 'स्वार्थी' असतात.”
ही बाई चुकीची आहे का?
#वास्तव
#Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #स्त्री #सासू आणि सून 🍀 #सासू सून #सासू आणि सून