सासू आणि सून
31 Posts • 8M views
*रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा सगळ्यांचे लाडके व्हाल, सासू आणि सुनेने तर ही गोष्ट करावीच !* एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर रमेश नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर राहात असतो. त्याचे मेघा नावाच्या मुलीवर प्रेम जडते. मेघा सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असते. त्या दोघांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांना दिवसातले 10 ते 12 तास घराबाहेर राहावे लागे. रमेशचे वडील अजून रिटायर झाले नव्हते त्यामुळे घरातली बरीचशी कामे रमेशची आई करायची. सकाळी सगळ्यांसाठी डबा बनवणे, घरातले सगळे बाहेर गेल्यानंतर घरातली छोटी मोठी कामे करणे. संध्याकाळी मेघा घरी आल्यानंतर घरातला स्वयंपाक करायची. पण सॉफ्टवेअर क्षेत्रात असल्यामुळे कधी कधी तिला घरी यायला खूप उशीर होत असे. तेंव्हा रमेशची आई तक्रार न करता स्वयंपाक करून ठेवायची. एक दिवस मेघाच्या कंपनीमध्ये 8 मार्च महिला दिनानिमित्त एक स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या स्त्रीने महत्वाचा वाटा उचलला याबद्धल लिहून द्यायचे होते. म्हणजे लेख लिहून द्यायचा असतो. मग कंपनीतले बरेचजण आपल्या आईबद्धल लिहितात, कोण आपल्या बायकोबद्धल लिहतो, तर कोण आपल्या बहिणीबद्धल लिहते. तेंव्हा मेघा विचार करते, तिच्या आईचा तिच्या आयुष्यात मोठा वाटा आहे यात शंकाच नाही पण सध्या सगळ्यात मोठा वाटा ज्या स्त्रीने उचलला आहे तो म्हणजे तिची सासू. कारण तिच्या सासूने घरची जबाबदारी घेतली नसती तर तिला जॉब आणि घर सांभाळायला अवघड झाले असते. तेंव्हा मेघा आपल्या सासुबद्धल एक लेख लिहते. त्या लेखाचा थोडासा भाग मी इथे लिहत आहे. मेघाने आपल्या सासूसाठी लिहलेले शब्द, आज अशाच एका स्त्रीबद्धल थोडक्यात लिहणार आहे जिने लग्नानंतर माझ्या आईची जागा भरून काढली. ती स्त्री म्हणजे माझ्या लाडक्या सासूबाई. थोडं आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे सत्य आणि वास्तव आहे. जेंव्हा कंपनीचा इमेल आला की तुमच्या आयुष्यामधल्या सर्वात महत्वाच्या स्त्रीबद्धल प्रसंग सांगायचे आहेत पण त्याच्यामध्ये सासू या नावाचा उल्लेख नव्हता. म्हणजे आजही मुलींना आपल्या सासुबद्धल काय लिहावे अथवा लिहुच नये किंबहुना विचारच करू नये असे वाटत असावे. पण माझ्या सासूबाईंबद्धल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. मी त्यांना आई म्हणून बोलावते. कारण त्या खरंच माझ्याशी आईसारख्या वागतात. किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेतात. माझे लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत त्या कधीही माझ्याशी भांडलेल्या नाहीत किंवा तिरस्कारने वागल्या नाहीत, किंवा त्या सासू आणि मी सून आहे या दृष्टिकोनातून कधीच त्यांनी माझ्याकडे बघितले नाहीत. स्वतःच्या मुलीपेक्षही त्या मला खूप मान देतात, प्रेम देतात. बऱ्याचदा असे झाले आहे की जेवणात भाजीमध्ये मीठ कमी पडले किंवा भाजी तिखट झाली किंवा स्वयंपाकामध्ये काही बिघडले आणि अशावेळी जर घरामध्ये सासरे किंवा नवरा बोलला तर त्या नेहमी माझीच बाजू घेऊन बोलतात. आणि नंतर व्यवस्थित समजावून सांगतात. मी जॉब करते जवळपास 10 ते 12 तास घराबाहेर असते त्यामुळे घरात वेळ द्यायला स्वयंपाक करायला किंवा इतर घरातील कामे आवरायला मला वेळ नसतो तरीही त्या सगळी कामे रोज चीड चीड न करता आनंदाने करत असतात. माझा आणि घरातील सर्वजणांचा दुपारच्या जेवणाचा डबा त्याच बनवतात. एवढेच नव्हे तर मला कधी उशीर झाला तर डबा पिशवीमध्ये भरून ठेवतात. असे एक नाही तर अनेक दैनंदिन जीवनामध्ये अनुभव आहेत. मित्रांनो या लेखाला पहिले पारितोषिक मिळाले. ज्यावेळेस मेघाच्या सासूला समजले की मेघाने तिच्याबद्धल लेख लिहिला आहे तेंव्हा तिच्या सासूच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू येऊ लागले. आतापर्यंत तिच्या कामाची स्तुती कोणीच केली नव्हती. एवढे वर्षे कष्ट केले त्याचे चीज झाले होते. ती त्या लेखाचा प्रिंटआऊट येईल त्याला दाखवत होती. जिथे जाईल तिथे हा प्रिंटआऊट घेऊन जात होती. आपल्या नात्यातल्या प्रत्येकाला दाखवत होती. मित्रांनो कौतुकाच्या दोन शब्दांनी मेघाच्या सासूचे आणि मेघाचे आयुष्य बदलले. आज परिस्तिथी खूप अवघड झाली आहे. कोणाची निंदा करायची असेल तर लगेच आपण तयार असतो पण कोणाचे कौतुक करायचे असेल तर आपण तिथे कमी पडतो. कंजूसपणा दाखवतो, तिथे आपला अहंकार आडवा येतो. आपली प्रतिष्ठा आडवी येते. पण मित्रांनो तुम्ही उद्यापासून फक्त एक मिनिटे अगदी मनापासून तुमच्या जवळच्या व्यक्तीची स्तुती करायला सुरुवात करा. मग तो तुमचा ड्रायव्हर असेल, तुमच्या सोसायटीचा वॉचमन असेल, तुमच्या ऑफिस मधला तुमचा सहकारी असेल. किंवा तुमच्या घरातले तुमचे वडील, तुमची बायको, तुमचा भाऊ, तुमचे नातेवाईक, तुमचा मित्र, कोणीही असेल पण तुम्ही त्याची अगदी मनापासून स्तुती करा. व्हाट्सएपवर कोणाच्या चांगल्या मेसेजची स्तुती करा. एखाद्याच्या चांगल्या स्टेटसची स्तुती करा. फेसबूकवर एखाद्या फोटोवर मनापासून कमेंट करा. मित्रांनो स्तुती, प्रोत्साहन हे सगळ्यांना आवडते. तुम्ही ज्याची स्तुती करता, ज्याला प्रोत्साहन देता तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतो. तुम्ही हा प्रयोग करा. तुम्ही रोज असे एक मिनिट एका माणसासाठी केले तर महिन्याला 30 माणसे होतात. वर्षाला 365 माणसे होतात. विचार करा, एका वर्षात तुम्ही 365 लोकांचे आवडते व्हाल. ही लोकं आयुष्यात तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. तुम्ही कधीही या लोकांना भेटाल तर ते तुमचा आदर करतील कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी एक वेगळीच जागा असेल. या प्रयोगामुळे तुमच्या मनाला लोकांमधले चांगले गुण बघायची सवय लागेल. दोष बघायचे बंद होईल, म्हणजे फक्त दिवसातला हा एक मिनिट तुमचं आयुष्य बदलेल. प्रयोग करून पहा. मला माहिती आहे हे थोडं अवघड आहे, थोडा वेळ लागेल पण याचे फायदे तुम्हाला काही महिन्यांनी बघायला मिळतील. मित्रांनो हा लेख जास्तीत जास्त सासू सूनांपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांना एकमेकींची किंमत कळेल. आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते बनायला सुरुवात होईल... #👫नवरा बायको / सासू सून #सासू सून friendship😂😂😂 #सासू आणि सून 🍀 #सासू सून #सासू आणि सून
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
8 likes
18 shares