▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली.*
*🚩११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यातील 'खांदेरी किल्ल्याची बांधणी पूर्ण. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन विलियम मिचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रैडबरी, फ्रान्सिस थॉर्प नाविक अधिकार्याना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत केला. मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग- थळच्या । किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेब उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही. वार्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खो पाण्यात न्यावी लागली. छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव्ह नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून सागरगडावर डांबले. या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलय वा इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धा कमाल केली. मराठे रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान पोहचते करीत, खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.*
*🚩११ जानेवारी इ.स.१६८८ &मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती*
*🚩११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग यांची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठांचे आँढा, त्रिंबकगड, कवनी,त्रिंगलवाडी,मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांनी जिंकून घेतला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩*
#🙏शिवदिनविशेष📜