🙏शिवदिनविशेष📜
61K Posts • 318M views
🆔Official_Sagar 💞💤👑
1K views 19 hours ago
🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २९ सप्टेंबर १६३५ स्वतः शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजी राजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला. सत्तेच्या संघर्षात सर्वांनाच मराठ्यांची गरज भासू लागल्यामुळे काळाचे काटे मराठ्यांच्या बाजूने फिरू लागले. आत्तापर्यंत वेगवेगळ्या बादशहांच्या पदरी चाकरी करून मराठ्यांना आता रणभूमीबरोबरच सत्तेच्या दरबारी राजकारणाचीदेखील चांगलीच ओळख झाली होती. ‘बळी तो कान पिळी’ हा सत्ताप्राप्तीचा मंत्रदेखील मराठ्यांना चांगलाच उमगला होता. पण हा मंत्र सर्वप्रथम प्रत्यक्षात अमलात आणला तो शहाजीराजांनी. शाहजहानने निजामशाही बुडवत आणली तेव्हा निजामशाहीची खिळखिळी अवस्था आणि आदिलशाहीची राजकीय मजबुरी जाणून असलेल्या शहाजीराजांनी स्वत:लाच निजामशाहीचा संरक्षक जाहीर केले. नावाला एक कठपुतळी निजामशाहीचा अल्पवयीन वारस शोधून त्याला गादीवर बसवून निजामशाहीची सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. आत्तापर्यंत मराठ्यांनी पुष्कळ लढाया वेगवेगळ्या बादशहांसाठी मारल्या होत्या. परंतु ‘बादशहा’च होण्याचे धाडस कोणी केले नव्हते. परकीय आक्रमकांच्या भारतावरच्या एक हजार वर्षांच्या इतिहासात शहाजी राजांनी हे धाडस प्रथमच केले परंतु, एक स्थानिक एतद्देशीय स्वत:ला पातशहा घोषित करू पाहतो, या घटनेमागचा मथितार्थ दिल्लीचा शाहजहान व विजापूरच्या आदिलशहाच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मुघल आणि आदिलशाहीने शहाजी राजांचे बंड मोडून काढण्यासाठी कंबर कसल्यानंतर शहाजी राजांना तीन वर्षांतच शरणागतीचे निशाण फडकवावे लागले. शहाजी राजांच्या या उठावाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एतद्देशीय जनमानसांत शहाजी राजांना एवढे स्थान मिळाले की शरणागती पत्करल्यावर त्यांची गर्दन मारता येणे प्रत्यक्ष शाहजहान व अदिलशाहला देखील अवघड होऊन बसले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २९ सप्टेंबर १६८० मराठ्यांच्या २०० मावळ्यांचा उंदेरीवर हल्ला. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
42 likes
39 shares