सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views • 7 hours ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६२७
४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन.
(जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६५७
औरंगजेबने राजगादीसाठी हलचाली सुरु केल्या
शहाजहान आजारी पडल्याने शहाजहान आजारी आहे इथपासून शहाजहान मेला इथवर बातम्या पसरु लागल्या. दारा ही बाब गुप्त राखू इच्छित होता ती जास्त लपवणे आता शक्य नव्हते. उरलेल्य तीनही मुलांकडे ही बातमी हस्ते - परहस्ते पोहोचलीच. कारण त्यांना शहाजहानच्या शिक्याची पत्रे मिळत होती. ही पत्रे खरच शहाजहान पाठवत आहे की दाराने सगळा कारभार आपल्या हातात घेतला आहे आणि तोच ह्या चाली खेळत आहे हे उरलेल्या तीन शहजाद्यांना समजत नव्हते. त्यामुळे औरंगजेबाने आपली पाऊले टाकायला सुरुवात केली. मीर जुम्ल्याला परींडा किल्यावरती हल्ला करायला पाठवले. नगरमधील अधिकार्यांना "सिवा भोसले" विरुद्ध कारवाई करायचे आदेश दिले. कल्याणीकडून तो बिदर मध्ये आला तिथे किल्याची मजबुती करुन तो औरंगाबादला आला. २८ ऑक्टोबर रोजी त्याने नर्मदेवरील टपाल चौक्या ताब्यात घेतल्या. मुदार आणि शुजाशी त्यानी संपर्क केला. पण शुजाने अत्यंत घाईघाईने राज्याभिषेक करवून घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६६७
२७ ऑक्टोबर रोजी शिवपुत्र शंभूराजे यांची शहजादा मुअज्जम सोबत भेट झाली. आग्रा प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काही काळ स्वराज्यात शांतता हवी होती त्यामुळे महाराजांनी मोघलांशी तह करायचे ठरवले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहआलमशी वाटाघाटी सुरु केल्या. २८ ऑक्टोबर १६६७ रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि जसवंतसिंग यांची भेट झाली...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६७५
पदमदुर्ग किल्याच्या बांधकामास प्रारंभ....
जंजी-याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.
हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती. परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती. किल्याची रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजी-याची मोहीम काढली या मोहिमेत मचव्यावरून तोफांचा मारा जंजी-या वर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंत यांनी जंजी-याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्म्दुर्गावर काम करणा-या अष्टगारातील सोनकोळ्याच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहका-यांसह पद्मदुर्ग मधून बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेत जंजी-याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारक-याची वाट पाहीत राहिला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही हा पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्मदुर्ग गाठला.
लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव “पालखी” ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण, व दर्या किनारीची “सरपाटीलकी” दिली.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोंबर इ.स.१६७९
केजविन लिहतो की २८ ऑक्टोंबरला शत्रुच्या होड्या आमची नजर चुकवून कितीही काळजी घेतली तरी बेटावरील दिव्यांच्या खालून सहज निघून जातात तोच परत १ नोव्हेंबर ला लिहतो की शिवरायांचे आरमार इतके चपळ आहे की ते आमच्या पुढून सहज जातात कारण त्यांच्या लहान होडग्या आम्हाला सहज आणि आश्चर्यरीत्या चुकवतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६८०
जयराम पिंड्येच्या काव्यात उमराणीच्या युद्धात प्रतापराव गुजरांसोबत जे महत्त्वाचे १४ सरदार होते, त्यात कृष्णाजी भास्करांचा उल्लेख येतो. आता कोणी हा मुद्दा काढील की, सुभेदारपदाचा माणूस युद्धात लढायला कशाला जाईल, पण हा मुद्दा गौण आहे. खुद्द महाराजांचा कानुनजाबिता पाहिला तर त्यात अष्टप्रधानांपैकी सात प्रधानांना "युद्धादी प्रसंग करावे" अशी स्पष्ट आज्ञा आहे. तेव्हा सुभेदारपदी असलेला माणूस मोहिमेत नक्कीच असू शकतो. यानंतर संभाजीराजांच्या कारकीर्दीतील २ पत्रांचा येथे उल्लेख करायला हवा. दि. २८ ऑक्टोबर १६८० रोजी संभाजी महाराजांनी राजश्री कृष्णाजी भास्कर यांना लिहिलेले पत्र - असून त्यात संभाजी महाराजांनी त्यांना चाफळच्या यात्रेत "मुसलमान अथवा हरकोणाचा उपद्रव न लगे" अशी व्यवस्था करण्याबद्दल आज्ञा केली आहे. याअर्थी हे कृष्णाजी भास्कर या भागाचे सुभेदार अथवा मोठे अधिकारी होते. त्यामध्ये मलकापूर आणि पन्हाळ्याच्या संबंधीच्या पत्रात कृष्णाजी भास्करांचा उल्लेख आहे, त्याअर्थी हे त्यावेळेस कोल्हापूर प्रांतीत असं दिसतं. यानंतर १७१२ मध्ये एका कृष्णाजी भास्करांचा उल्लेख येतो. पण हे ते नसावेत असं दिसतं कारण, अफजलप्रसंगी जे कृष्णाजी भास्कर होते ते "वकील" म्हणून आले, म्हणजे जाणते असणार, असं जरी मानलं तरी पुढे त्यांना मारल्याचे एक "वाई परगण्याचे यादीनामे" सोडता त्याला संदर्भ म्हणून बाकीचे ठोस पुरावे सापडत नाहीत. शिवाय अफजलकडचे कृष्णाजी भास्कर हे वाई परगण्याचे हवालदार होते. हे माहीत असल्याने महाराजांनी पुढे त्यांना प्रथम "वेलवंड खोऱ्याचे" सुभेदार केले असावे असं दिसतं. कारण वाई आणि वेलवंड खोरे हे भाग अगदी जवळजवळ आहेत. केवळ एक डोंगररांग ओलांडायचा अवकाश सुभेदारपदी असणारा माणूस तितकाच अनुभवी असतो. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. यानंतर प्रतापराव-उमराणी प्रसंगी कृष्णाजी जत सांगली भागात असल्याचे उल्लेख मिळतात. अशातच १६८० मध्ये चाफळच्या संबंधी शंभूराजांचे पत्र असल्याने कृष्णाजींचा या कालखंडात या भागातील वावर स्पष्ट करतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६८४
(अश्विन वद्य अमावस्या शके १६०६ रक्ताक्ष संवत्सर वार मंगळवार)
रिचर्ड केजविनचे इंग्लंडच्या राजास पत्र!
रिचर्ड केजवीन मुंबईचा गव्हर्नर झाल्यानंतर केजविनने आपल्या इंग्लंडच्या राजाला पत्र लिहून कळवले. छत्रपती संभाजी महाराजांनी करंजा व एलिफंटा ही बेटे घेतली. जवळजवळ ४०, चाळीस मैलाचा प्रदेश छत्रपती संभाजी महाराजांनी पादाक्रांत केला आहे. तहाची बोलणी सुरू असून जवळजवळ ६, सहा महिने मराठे चौलवर लढत होते. इंग्लंडच्या राजाला केजविनने हे पत्र लिहिले
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६८५
इ.स.१६८५ साली इंग्रज आणि मुघलांचे संबंध बिघडले होते. त्यामुळे इंग्रजांना शंभुराजेंशी मैत्रीचे नाते राखून त्यांची मुघलांच्या विरोधात मदत घ्यायची होती. त्यामुळे थॉमस ग्रॅहम आणि रिचर्ड केजविन च्या सल्ल्यावरून हिंदुस्थानाच्या राज्यकाराभरातील संभाजीराजेंचे महत्व ओळखून लंडनहून सुरतेला संभाजीराजेंशी चांगले संबंध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ते पत्र असे, You should enter into close Confederacy and friendship with Sambhajee Rajah and maintain always strict friendship with him and then you need not feare the anger of the mogol or the Portuguese having Sambhajees country and his arms always to friend. या पत्रातुन लंडनहून सुरतेला कळवण्यात आले की तुम्ही शंभुराजेंशी मैत्रीचे संबंध राखले तर तुम्हाला मुघल किंवा पोर्तुगीजाना भिण्याचे काही कारण नाही. या पत्रावरून आपल्या लक्षात येते की त्या काळी इंग्लंडमध्ये सुद्धा संभाजीराजेंच्या पराक्रमाची किती चर्चा होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१६८९
शंभुराजेंच्या हत्येनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात जाण्यापूर्वी छत्रपती राजाराम महाराज तिथून सुखरूपणे निसटून प्रतापगड मार्गे पन्हाळा किल्ल्यावर आले. मुघलांचा वेढा पन्हाळ्यालाही आल्याने महाराजांनी शत्रूला चुकवून 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री मानसिंग मोरे,प्रल्हाद निराजी,निळो-बहिरो मोरेश्वर,खंडो बल्लाळ,बाजी कदम,खंडोजी कदम आणि इतर निष्ठावंत सहकाऱ्यांसह पन्हाळगड सोडला आणि ते जिंजीकडे निघाले. शिवाय मार्गात पूर्वनियोजित योजनेप्रमाणे बहिर्जी आणि मालोजी हे घोरपडे बंधू संताजी जगताप व रुपाजी भोसले ही मंडळीही त्यांना मिळत गेली. मुघलांचा पाठलाग चुकवत आणि शिमगा व बेंगलोर या मुक्कामात आलेल्या अडचणींना तोंड देत पुढे मार्गक्रमण करत ते अंबुर इथे आले. अंबुरजवळच मराठ्यांचा बाजी काकडे हा सरदार छावणी करून होता. त्याला राजाराम महाराज आल्याची बातमी समजताच तो त्वरेने त्यांना भेटायला आला. त्याच्याजवळचे सैन्य घेवून आपल्या सहकाऱ्यांसह राजाराम महाराज अंबुरच्या ईशान्येस असणाऱ्या वेल्लोर या किल्ल्यात आले. 33 दिवसांचा प्रवास करून राजाराम महाराज वेल्लोरच्या किल्ल्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१७५९
सदाशिवभाऊ पेशव्यांवर पुण्यात खूनी हल्ला
दिनांक २८ ऑक्टोबर १७५९ रोजी गारपीरावरील छावणीत (हल्लीचे ससून रुग्णालय) मुज्जफरखानामार्फत हैदरखानाने सदाशिवभाऊंवर खुनी हल्ला केला. शिरेवर घाव बसून मोठी जखम झाली. सुदैवाने भाऊसाहेब यातून बचावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१७८०
अहिल्याबाई स्वसंरक्षणास किती दक्ष होत्या हे त्यासंबंधी हरिपंत फडके आणि महादजी शिंदे यांना २८ ऑक्टोबर १७८० मध्ये त्यांनी पाठविलेल्या पत्रावरून कळून येते.
"तुम्हास कळो असू द्या की अद्याप तुकोजीबाबांनीही कोठे पराक्रम करून अधिकोत्तर मेळविले नाही. सुभेदाराचेच मेळविले खातात. महादजीबाबांनीही अधिकोत्तर काही मेळविले नाही. राणोजी शिंद्याच्याच दौलतीवर उड्या मारितात. जयाजी शिंदे मेल्यावर दत्ताजी शिंद्याने कशी लढाई केली. तदोत्तरही कसे पराक्रम केले, तसे तुम्ही अगर तुकोजीबाबांनी कोठे काय पराक्रम केले आहेत? इतके बोलवयास कारण हेच की, तुकोजीबाबांचे इतके दिवस वाकडे पाऊल पडले नाही. परंतु चार पाच वर्षे उभयताच देशी होते तेथे उभयतांची मसलत जशी झाली असेल तशी यांची पावले पडत जातात. असो, काय चिंता आहे? तुमचे मानस असेल की बाईस चहुकडून उपद्रव झाल्याने, सारेच बंदोबस्त आपण केल्यावर बाईंनी काय करावयाचे आहे? परंतु तुम्हांसही कळले असू द्या, मी सुभेदाराची सून आहे. केवळ तुकोजीबाबाच दौलतीचे धनी व मी कशास काही नाही असे समजू नका. तुकोजीबाबा हे माझे हातचे कामास लावलेले आहेत. त्यांनी निमकहरामीचे फंद केल्यास, पुढे सुखरूप दौलत करू म्हणतील, तर त्या गोष्टी दुरापास्त आहेत. फार खराब होतील. आज काल पाटीलबाबांचा दम तुकोजीबाबा फार राखितात आणि पाटीलबाबांच्याही चित्तात फार फंद असेल. उभयताही फौजसुद्धा मजवर चालून यावे. सुभेदराचे पुण्यप्रताप येथेही कोणी बांगड्या लेवून बसले नाही. श्री मार्तंड समर्थ आहे. ते ईश्वर घडविल ते खरे."
यावरून अहल्याबाईंचे राजकारणात पुरेपूर लक्ष होते हे दिसून येते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ ऑक्टोबर इ.स.१८११
राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा आज स्मृतिदिन...
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..💐💐
होळकर घराण्यातील एक थोर शूरवीर पुरुष. यशवंतराव हे महादजी शिंदे यशवंतराव होळकर यांच्या खालोखाल मराठे सरदारांतील एक कर्तबगार वीरपुरुष होते. यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई यांच्यापासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला. शिंदे यांच्याकडून दुसरे मल्हारराव यशवंतराव होळकरभांबुर्ड्याच्या लढाईत मारले गेल्यानंतर (१४ सप्टेंबर १७९७) यशवंतराव व विठोजी हे पुण्यातून उत्तरेकडे पळून गेले. तत्पूर्वी यशवंतरावांनी चिमाजीच्या दत्तक प्रकरणात परशुरामभाऊंचा जुन्नरजवळ पराभव केला(ऑक्टोबर १७९६). दुसरे मल्हाररावांचे पुत्र खंडोजी यांच्या नावे राज्यकारभार करण्याचे भासवून सर्व होळकरांना एकत्र येण्याचे आवाहन यशवंतरावांनी केले. यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले. पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली. दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.
दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदेव पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि मराठ्यांची राजधानी पुणे लुटली. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला (१८०२). तेव्हाइतर मराठे सरदारांच्या मदतीने यशवंतरावांनी दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव यास पेशवेपदी बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शिंदे व नागपूरकर भोसले यांना मदतीचे आवाहन केले (१८०३) पण त्यांनी प्रत्यक्ष मदत केली नाही. इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आवाहन केले (५ फेब्रुवारी १८०४). त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले.
यशवंतरावांनी आपल्या पराक्रमाने होळकरांच्या दौलतीची मालकीमात्र सिद्ध केली. अहिल्याबाईंनी सर्व संपत्ती मिळविली. यशवंतरावानी अहिल्याबाईंचा महोवरचा खजिना हस्तगत करून फौज वाढविली.आपल्या नावाचा शिक्काही त्यांनी तयार केला. इंग्रजांना या भूमीतून उखडून टाकण्याचा एकच ध्यास त्यांना शेवटपर्यंत होता. तसेच त्यांच्या मागणीला – दोआब आणि बुंदेलखंडमधील प्रदेश द्यावा यास – ब्रिटिशांनी नकार दिला तेव्हा होळकरांच्या सैन्याने पुष्कर आणि अजमीर (अजमेर) लुटले. तसेच यशवंतरावांनी आपल्या सैन्यातील तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना( व्हिकर्स, डॉड व रियन) कंठस्नान घातले (१८०४). ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव केला. यशवंतरावांनी गनिमी युद्धतंत्राने इंग्रजांना हैराण केले. त्यांच्याकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. त्यांचा सेनापती हरनाथ सिंग याने दिल्लीवर हल्ला केला पणयश आले नाही. फरुखाबाद येथे यशवंतरावांचा लेकने नोव्हेंबर १८०४ मध्ये पराभव केला. तेव्हा ते रणजित सिंगांकडे मदतीसाठी गेले आणि डिगच्या किल्ल्यात आश्रयार्थ राहिले तथापि यशवंतरावांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरून त्यांना ब्रिटिशांबरोबर अखेर तैनाती फौजेचा तह करावा लागला (डिसेंबर १८०५). त्यानुसार त्यांस बुंदी टेकड्यांच्या उत्तरेकडील प्रदेश व टोंक, रामपुरा व इंदूर मिळाले. स्थिरस्थावर झाल्यावर यशवंत-रावांनी सैन्यात सुधारणा करून निरुपयोगी फौज काढून टाकली. बाणपुरा येथे तोफा ओतविण्याचा कारखाना काढला (१८०७). सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, तापट स्वभाव यांमुळे यशवंतरवांचा बुद्धिभ्रंश झाला. या व्याधीतच भानपुरा येथे त्यांचे निधन झाले. त्या काळात (१८०९–११) त्यांची उपस्त्री तुळसाबाई हीच सर्व राज्य चालवीत असे मात्र राज्य-कारभारात अनागोंदी माजली तेव्हा तिने यशवंतरावाचा औरस पुत्र तिसरे मल्हारराव (कार. १८११–३३) यांच्या नावे राज्य केले.
यशवंतराव हे विक्षिप्त, क्रूर, धाडसी व शूर होते. त्यांस दिल्लीच्या बादशहात्यांस दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
29 likes
52 shares