#🙏शिवदिनविशेष📜 ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६७ (मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शके १५८१, संवत्सर प्लवंग, वार बुधवार) महाराजांचा डिचोलीस मुक्काम! बारदेशचा सोक्षमोक्ष लावायचाच हा एकमेव विचार करून महाराज डिचोली येथे मुक्कामास राहीले. कारण पोर्तुगीज रामाजी शेणवी कोठारी हा वकील तहाची याचिका घेऊन येणार असल्याचा महाराजांना निरोप आला. 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६८ (कार्तिक वद्य पंचमी शके १५९० संवत्सर किलक वार शुक्रवार) गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास शुभारंभ. महाराज वेंगुर्ल्यावरून भतग्राम महालातील नारवे या गावी गेले. नारवे येथील श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय प्राचीन काळापासून विख्यात होते. कोकणच्या ६ प्रमुख दैवतांमध्ये श्रीसप्तकोटीश्वराची गणना होत होती. पंचगंगेच्या तीरावरील श्रीसप्तकोटीश्वर कदंब राजाचे कुळदैवत होते. यावनी काळात या शिवमंदिराची दुर्दशा झाली त्यावेळी, विजयनगरच्या बुक्करायाने त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर पोर्तुगीज अंमलात पुन्हा हे मंदीर ऊद्धवस्त करण्यात आले. श्रीसप्तकोटीश्वराचे शिवलिंग पोर्तुगिजांनी एका विहिरीच्या काठाला बसविलेले होते. त्यावर पाय ठेवून क्रिस्ती लोक पाणी ओढीत! पुढे भतग्रामच्या देसायाने ते गुप्तपणे काढून नेले व नारवे येथे त्याची स्थापना केली. महाराज श्रीसप्तकोटीश्वराच्या दर्शनार्थ गेले आणि या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना झाली. लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेत
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती