सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
497 views • 3 hours ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २७ सप्टेंबर इ.स.१६६५
( भाद्रपद वद्य चतुर्दशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, बुधवार )
छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने फर्मान व मानाचा पोशाख पाठविला!
मुघलांशी पुरंदर तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणात आदिलशाही सरदार इखलासखानाबरोबर लढा देत होते. या दरम्यान पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजेंच्या छावणीत शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान आले आणि पाठोपाठ पुरंदरच्या तहाला मान्यता देणारे औरंगजेबाचे फर्मानही येत असल्याचे मिर्झाराजेंना समजले. मिर्झाराजेंनी राजगडावर निरोप पाठवून शंभुराजेना बोलवून घेतले. शंभुराजेनी फर्मान स्वीकारले,शंभुराजे मुघली मनसबदार बनले. शंभुराजेंना यावेळी पोशाख व रुप्याचा साज चढवलेला हत्ती भेट देण्यात आला. यानंतर शंभुराजे राजगडावर परतले. पुरंदर तहाला मान्यता देणारे अधिकृत फर्मानही मिर्झाराजेंच्या छावणीत आल्याचे शिवाजी महाराजांना समजले. महाराज यावेळी तळकोकणात होते. फर्मान पोशाख स्वीकारण्यासाठी ते पुरंदरच्या रोखाने निघाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/dCKGW_I7Uyw
📜 २७ सप्टेंबर इ.स.१६८७
गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने २२ सप्टेंबर ला फितुरीने जिंकून घेतली.पण त्यापूर्वीच वेढा दिलेला गोवळकोंडा लवकर ताब्यात येत नसल्याचे पाहून औरंगजेबाने कुतुबशहाचा कर्नाटकातील प्रदेश जिंकण्यासाठी आपले सरदार व सैन्य रवाना केले होते. मूळचा कुतुबशाही सरदार असणारा कासीमखान हा नंतर मुघलांना सामील झाला.त्याची नेमणूक कर्नाटक प्रांत जिंकण्यासाठी करण्यात आली.बादशाहाने गोवळकोंडा जिंकण्यापूर्वीच कासीमखानाने जुलै महिन्यात बेंगलोर जिंकले होते.खानाला रोखण्यासाठी हरजीराजे महाडिक व केशव त्रिमल हे मराठे सरदार गेले होते पण ते तिथे पोहोचेपर्यंत खानाने बेंगलोर काबीज केले होते.त्यामुळे ते परत फिरले.मुघल सैन्याने भेद करून पिलकोंडा हा किल्ला घेऊन मच्छलीपट्टणम पर्यंत लूटमार केली होती.मुघल सरदार कासीमखानाने भेद करून पिलकोंडा हा किल्ला घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २७ सप्टेंबर इ.स.१७०७
शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले.
रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने परत दिल्याशिवाय देशमुख, कुलकर्णी समजत नाहीत व मुलुख आबाद होत नाही हे जाणून वतने देण्यास सुरुवात केली.
मराठेशाही समूळ नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास रामचंद्रपंत - शंकराजी नारायण यांचा मुत्सद्दीपणा व संताजी - धनाजी यांचा गनिमीकावा या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे अखेर नमते घ्यावे लागले आणि त्याच्या पश्चात मराठ्यांनी दिल्लीपावेतो धडक मारून मोगलांनाच आपले अंकित बनवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २७ सप्टेंबर इ.स.१७२९
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनास्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मराठा सरदारांमध्ये कार्यक्षेत्राची वाटणी झाली त्यात खानदेशात बागलाण आणि गुजरातचा सुभा सेनापती दाभाडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता .खंडेराव दाभाडे यांनी भिल्ल कोळी या नव्या वन्य जातीची दोस्ती संपादन करून सैन्याचे संघटन केले.१७१९ मध्ये सुरतेवर स्वारी करून मोगली फौजांचा पराभव केला. सोनगड येथे कायमचे ठाणे स्थापन केले .तेथून पुढे हळूहळू दाभाडे यांनी गुजरात वर चौथाई आणि खंडणी लागू केली. खंडेराव दाभाडे यांनी गुजरात वर अनेक वेळा स्वाऱ्या करून एवढ्या खंडण्या वसूल केल्या की गुजरातमधील मोगलांची सत्ता खिळखिळी होऊन मोडकळीस आली.खंडेराव दाभाडे यांनी गुजरात ची केलेली दुरावस्था पाहून बादशहाने हैदर कुलीखान म्हणून नवीन सुभेदार गुजरातवर पाठवला. त्यानंतरही गुजरातमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर राहिली .राजकीय स्थिरता गुजरातला कधीच प्राप्त होऊ शकली नाही. राजकीय अस्थिरता हा गुजरातचा जणू स्थायीभावच होऊन बसला .
खंडेराव दाभाडे एकनिष्ठपणे स्वामी सेवा करत असत. खंडेराव हे स्वामीनिष्ठ तर होतेच पण कायम छत्रपतीच्या आज्ञेचे पालन करीत.
वाढत्या स्वार्या आणि दगदगीने खंडेराव दाभाडे आजारी पडले. दिनांक २७ सप्टेंबर १७२९ रोजी सेनापती खंडेराव दाभाडे आजारी पडले व यांचा मृत्यू झाला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
15 likes
20 shares