🚩शिवरायांचे भक्त
208K Posts • 1866M views
🆔Official_Sagar 💞💤👑
5K views 13 hours ago
🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २० ऑक्टोबर १६७१ शिवरायांनी दंडाराजपुरीवर आरमारी हल्ला केला. जंजिरा किल्ल्यावर सिध्दी चिवटपणे सत्ता राबवत होता. महाराजांनी देखील जंजिऱ्यावर सतत हल्ले चालु ठेवले होते. जंजिराच्या समोरच दंडा राजपुरी होती, ती महाराजांकडे होती. महाराज रायगडाहुन निघाल्याचे कळताच सिद्दीने बेसावध क्षणी दंडाराजपुरीवर हल्ला करून हे ठाणे आपल्या ताब्यात घेतले. महाराज येताच दंडाराजपुरीवर आरमारी हल्ला केला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 २० ऑक्टोबर १६७३ छत्रपती शिवराय कोकणातील जैतापूरास आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २० ऑक्टोबर १६९३ सिद्धगड मुघलांच्या ताब्यात १६९३ च्या ऑक्टोबर महिन्यात मातबरखानाने आपले लक्ष माहुली गडापासून बारा कोसांवरील सिद्धगड जिंकून केंद्रित केले. मराठे सैनिकांनी सिद्धगडावर आपले बस्तान बसविले होते आणि त्याच्या आश्रयाने माहुलीवर हल्ला करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांपासून मोगल सैनिक सिद्धगड हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होते. २० ऑक्टोबर १६९३ रोजी मोगल लष्करातील लोमाणजी मावळा याने आणि इतर सैनिकांनी संधी साधली. रात्रीच्या सरत्या प्रहारात त्यांनी सिद्धगडाच्या तटाच्या भिंतीवर दोर फेकले आणि ते किल्ल्याच्या भिंती चढून गेले. तेव्हा गडावर तुंबळ युद्ध झाले. त्या चकमकीत सिद्धगडाचा किल्लेदार जखमी झाले आणि मोगलांच्या हाती लागले. सिद्धगड जिंकून घेण्यास मोगल सैनिक यशस्वी झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २० ऑक्टोबर १७५५ सावनूरवर स्वारी मुजफरजंगाची चिथावणी सावनुरकर नवाबास मिळाल्यावर त्याने मुरारराव घोरपडे यास आपल्या पक्षात ओढले. कर्नाटकातून पेशव्यांची सत्ता उखडून टाकणे हा यांचा डाव पेशव्यास कळताच स्वतः नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊसह २० ऑक्टोबर १७५५ सावनूरवर जाण्यास निघाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 २० ऑक्टोबर १८०० निझामाने इंग्रजांबरोबर मैत्रीचा करार करून इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली. आपले राज्य नेहमीसाठी संरक्षित केले. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
50 likes
109 shares