फॉलो करा
Datta Paymode
@157186583
35
पोस्ट
120
फॉलोअर्स
Datta Paymode
817 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
अरावली पर्वताने आपला जीव वाचवण्यासाठी काय करावे! . तो बिचारा भाजपातही जाऊ शकत नाही. . पर्यावरणात निवडून येण्याची गुणवत्ता नसते. नाशिकची तपोवनातली झाडे कधी निवडणूक निधी थोडीच देणार आहेत. आरेचे जंगल , तिथली वनसृष्टी यांना मत देण्याचाही अधिकार नव्हता! . अजूनही कुठच्या झाडावर बसलेली एक चिमणी आई, चिमणा बाबा ! त्यांनी काडीकाडीने बांधलेल्या घरट्यात, उडू न शकणारे पिलू! . स्वतःला सुरक्षित समजणारे. आईच्या चोचीने खाणारे! . पडणार आहे ते पिल्लू! . ते कोसळून, डोके आपटून मरणार ! माणसांचा विकास होण्यासाठी , हायवेज होण्यासाठी ते मेले पाहीजेच! तेच नव्हे वारूळमुंग्या , सर्प , किटक, पशू-पक्षी कोणीकोणी म्हणून दिसू नयेत. पर्वत दिसू नयेत, नद्यादेखील राजकारण्यांनी बुजवून टाकाव्यात. मासेदेखील मेले पाहीजेत. माणसांचा विकास सुरू आहे. . या देशाच्या कानाकोप-यात, इंचाइंचात माणसेच माणसे दिसू द्या, हायवेज बॅकवेट हॉल्स होऊ द्या, प्रकल्प होऊ द्या महाकायचे महाकाय! . सृष्टी जगवून मंत्री काय करणार? झाडे, गायराने , तलाव , वने, उनवारापाऊस काय करायचाय! . पुढची तर नाही पण त्यापुढच्या पिढीतला कोणीतरी हा लेख वाचेल. अन , मी या पिढीतच जन्म घेतलेला असूनही मला माफ करील. . माझ्या, अजूनही भूतलावर न आलेल्या वंशजांनो, आमची पिढी तुमच्यासाठी एक इंचही पर्यावरण राहू न देण्याची शपथ खाऊन आली आहे. मी लिहून ठेवतोय. मी देखील याच पिढीतला आहे. पण, माणसांनी हैवान होऊन, जंगलांची, नदीची, पर्वताचीही जागा बळकावून "विकास" उर्फ बांधकामे करावीत, या मताचा नाही. . अन, माझ्या या मतांना काडीइतकीही किंमत कधी मिळणार नाही! . देव माणूस नावाच्या जमीनलोभी ,हडपू जनावराला सद्बुद्धी देवो! #फडणवीस #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
Datta Paymode
613 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
😭अतिवृष्टीने बेहाल झालेला बळीराजा, उदासीन शासनव्यवस्था, निष्क्रिय अधिकारी, आणि लाचार मिडिया.. ✍️अतिवृष्टीने बेहाल झालेल्या बळीराजाला शासनाने वाऱ्यावर सोडलय. मिडिया लाचार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर झाल्या. मिडियामध्ये इच्छुक उमेदवाराच्या चर्चा रंगू लागल्या. इकडे बळीराजा अस्मानी संकटात सापडला असताना. लाचार मिडियाने त्याच्याकडे पाठ फिरवली. अतिवृष्टीच्या काळात लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फोटो काढलेत.इतक सारं होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही अनुदान पडल. नाही. शेतकरी संकटात सापडलेला असूनही शासन कर्जमाफी बद्दल एक शब्दही काढत नाही. मिडिया, शासन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत इतके गुंतून गेले आहे की त्यांना इथल्या परिस्थितीचा विसर पडला आहे. इतके दिवस होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे मागे लोकप्रतिनिधीनी, शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे शे.... उपटीले का असा संंतप्त सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. ✍️DAP #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #फडणवीस ✍️
Datta Paymode
862 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
Datta Paymode
623 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
#व्यसन मुक्त भारत अभियान #व्यसन मुक्तीसाठी उपाय #व्यसन व्यसनं सगळीच जिवघेणी तुला काहीच का न कळे इतके अनमोल शरीर तुझे त्यांच्यासवे जळे... म्हणे तंबाखू आणि चुण्याचा चांगलाच जमतो मेळ पण आयुष्याचा माञ तुमच्याच होतो खेळ... फॅशन म्हणून तुम्ही उगीच खाता बार निरर्थक पैसा खर्चून कुटुंबावर टाकता भार... खाणाऱ्यांना वाटे आपली इतरांवेगळी स्टाईल मग का म्हणून चेहऱ्यावरची तुमच्या गायब झाली स्माईल... देशी असो की विदेशी घाणच असते दारू हळूहळू तिच तुमचे आयुष्य लागते सारू.. पंग झाले की तुम्ही करू लागता चॅलेंज लोकाचं काय जातं हो तुमचाच बिघडतो बॅलेन्स... विडी, सिगारेट, गांज्या तुम्ही हौसैने घेता कॅन्सर सारख्या रोगाला उगीच निमंत्रण देता... आता तरी एकदा विचार करा पक्का "निर्व्यसनी माणूस" असा मिळविण्यासाठी शिक्का... ✍️दत्ता आसाराम पायमोडे✍️
See other profiles for amazing content