समाजात अनेक लोक असे असतात जे त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्यासोबत चांगले वागतात. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मनासारखे वागता, त्यांच्या मताशी सहमत होता, तोपर्यंत ते तुमच्याशी गोड बोलतील. पण, जेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारांवर ठाम राहता, त्यांच्या मताच्या विरुद्ध जाता, तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो. अशा वेळी ते तुम्हाला मदत करणे तर दूरच, साधी विचारपूसही करत नाहीत. हा अनुभवातून एक महत्त्वाचा धडा मिळतो की, लोकांना खुश ठेवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या तत्त्वांनुसार जगा.
#❤️Love You ज़िंदगी ❤️