फॉलो करा
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
6,187
पोस्ट
5,714
फॉलोअर्स
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
491 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी 🙏🙏 ✔️घनजिवामृत तयार करण्याची पहिली पद्धत : कृतीः घनजिवामृत तयार करताना एकरी शंभर किलो शेण घ्यावे. देशी गाय 50 कि.लो. अधिक बैलाचे 50 कि.लो. किंवा 50 किलो. देशी गाय अधिक 25 किलो बैल, 25 किलो म्हशीचे शेण किंवा 50 किलो देशी गायीचे शेण अधिक 50 किलो. बकर्‍या, मेंढयाच्या लेंडया यातील कोणताही एक प्रकार घेणे. (जर देशीगाईला नैसर्गिक चारा खाऊ घातला तर तिचे शेण 21 दिवस ताजे राहाते पण रासायनिक चारा खाऊ घातला तर तिचे शेण 7 दिवस ताजे राहाते) ओलाव्यासाठी पाणी वापरावे. वरील पैकी कोणत्याही शेणाच्या मिश्रणात 1 किलो. गुळ किंवा 2.लि.उसाचा रस, किंवा 1 किलो. पिकलेल्या गोड फळांचा गर 1 किलो.यातील कोणतेही एक. अधिक  बेसन पिठ, हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळावे व त्याचा ढिग सावलीत लावावा.तो (थंडी असेल तर गोणपाठाचे पोते झाकावे) 48 तास ठेवा. 48 तासानंतर उन्हात पातळ थर देऊन वाळवावा. दोन वेळा खालीवर करा. संपूर्ण वाळल्यावर ढेकळ मोगरीने फोडा. नंतर चाळणीने चाळावे. पोत्यात भरून ठेवावे. जमीनीवर ठेवू नये. ही पोती सावलीत ठेवावीत. हे तयार घणजिवामृत 1 वर्षापर्यत वापरता येते. ✔️.घनजिवामृत तयार करण्याची दुसरी पद्धत : कृती एकरी दोनशे किलो उन्हात चांगले वाळलेले शेण घ्या. ते मोगरीने फोडून बारीक करावे व चाळून घ्यावे. त्यावर द्रव जिवामृत 20 लि. शिंपडावे. नंतर फावडयाने त्याला चांगले मिसळावे. नंतर सावलीत त्याचा ढिग लावावा. (थंडीची लाट असेल तर बारदाण्याणे झाकावे.) पाऊस व सूर्य प्रकाश पडू नये अशा पद्धतीने 48 तास सावलीत ढिग ठेवावा. नंतर उन्हात वाळवावा. खालीवर करा. ढेकळे असल्यास बारी करा. व पोत्यात भरून सावलीत साठवून ठेवा. एक वर्ष वापरता येते. ✔️.घनजिवामृत करण्याची तिसरी पद्धत ः कृती ः- गोबर गॅस स्लरिचा उपयोग करून. गोबर गॅस स्लरीचा उपयोग जिवामृत करून नका. कारण गोबर गॅस स्लरीत हवेशिवाय जगणारे जिवाणू असतात. आपणास हवेवर जगणारे जिवाणू हवेत. पण घनजिवामृतात गोबर गॅस स्लरीचा उपयोग करायचा असेल तर त्यासाठी गोबर गॅस स्लरी उन्हात वाळवा. ढकेळ बारीक करा. आणि त्या पैकी 50 किलो. वाळलेल्या गोबर गॅस स्लरीचे पावडर 50 किलो देशी गायीचे शेण अधिक 1 किलो. गुळ अधिक 1 किलो बेसन पिठ यात टाकावे. जास्त घट्ट असेल तर थोडे गोमुत्र मिसळावे. व ढिग करून 48 तास सावलीत ढिग लावावा. 48 तास नंतर हे सर्व मिश्रण उन्हात वाळवावे, ढेकळ फोडून चाळणीने चाळुन पोत्यात भरून सावलीत ठेवावे. एक वर्षापर्यंत वापरता येईल. धन्यवाद. 🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
501 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती *शेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या !* जेव्हा जेव्हा शेतीतील अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी हे विषय चर्चेत येतात, तेव्हा हमखास होणारा एक उल्लेख म्हणजे “स्वामिनाथन आयोग”. ह्या आयोगात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? त्यांचं महत्व काय? आज पर्यंत त्यावर काय कामगिरी झाली आहे, असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण होतात. त्यांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न. स्वामिनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, जी समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये स्वामिनाथन हे अध्यक्ष होते. *स्वामिनाथन आयोगाच्या महत्वाच्या शिफारशी या पुढील प्रमाणे आहेत* ..... १. शेतकऱ्यांना असा हमीभाव मिळावा की त्यांचा सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा. म्हणजेच एकूण विक्रीच्या ३३.३३% इतका नफा हा शेतकऱ्यांना मिळावा. २. कृषी पतधोरणाची गरज म्हणून वैद्यनाथन समितीच्या शिफारशी सहकार क्षेत्रात लागू व्हाव्यात. *वैद्यनाथन समितीने सहकार क्षेत्रात काही शिफारशी दिल्या आहेत* त्यातील महत्वाच्या पुढील प्रमाणे: * दहा जणांचा समूह करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. * शेतकरी संस्था या लहान पण सहकार तसेच व्यवसाय तत्वावर असाव्यात. * कर्जाचा कालावधी हा कर्जाचा उपयोग व कर्जधारकाची परिस्थिती यावर अवलंबून असावा. * व्याजाचा दर हा सुरुवातीला जास्तीचा परंतु इतर कर्जे देणाऱ्यांपेक्षा कमी असावा. ३. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा ४. जीवन विमा तसेच निवृत्तीवेतन ५. व्यवसायातील धोक्यांपासून संरक्षण ६. मासेमारी करणाऱ्यांसाठी मासेमारीबंदीच्या काळात निर्वाह निधी जो रुपये १५००/- दरमहा असावा. ७. जमीनधारणा सुधारणा : शेती आणि जनावरांसाठी जमीन हा महत्वाचा प्रश्न आहे. एकूण २७% जमीन ही १५ एकर किंवा अधिक जमीन असणाऱ्यांकडे आहे, ३८% जमीन ही ५ ते १५ एकर जमीन असणाऱ्यांकडे आहे, १९% जमीन ही २.५० एकर ते ५ एकर जमीन असणाऱ्यांकडे आहे, तुकड्या तुकड्यांमध्ये १३% जमीन ही १ ते २.५० एकर जमीन असणाऱ्याकडे आहे, ३.८०% जमीन ही १ एकर पर्यंत जमीन असणाऱ्याकडे आहे. यामध्ये सुधारणेची गरज आहे. जी अतिरिक्त तसेच उपजीवी नसलेली जमीन सरकारकडे आहे तिचे वाटप व्हावे. बिगरशेतीकडे जी शेतजमीन वळवण्यात येत आहे त्यावर कडक निर्बंध यावेत. गुरांना चरण्यासाठी वनजमिनींचा वापर होण्यास पूर्ण मुभा देण्यात यावी. ८. राष्ट्रीय जमीन उपयोगिता सल्लागार मंडळाची स्थापना व्हावी. हे मंडळ जमिनीचा कस, हवामान, पर्यावरण, विपणन (मार्केट) इत्यादीचा अभ्यास करून शेती विषयी सल्ले देईल. ९. शेतजमिनीची विक्री नियंत्रित करण्यासाठी यंत्रणेची उभारणी. ही यंत्रणा जागेचा आकार, विक्रीनंतरचा संभाव्य वापर तसेच खरेदीदाराची श्रेणी पाहून विक्री परवानगीचा निर्णय घेईल. १०. शेतीविषयक पायाभूत सुविधा, सिंचन, शेतजमीन विकास, जलधारणा, रस्ते, संशोधन आणि विकास यामध्ये जनतेची गुंतवणूक वाढवण्यास प्राधान्य द्यावे. ११. सूक्ष्मपोषक घटकांची कमतरता तसेच माती परीक्षणासाठी परीक्षण केंद्रांचे जाळे निर्माण करणे. १२. पाण्याचे तसेच पिकांचे संवर्धन यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे. १३. शेती उत्पादनांसाठी मध्यवर्ती शेती उत्पादन केंद्रे, उत्पादन पूर्ण झाल्यानंतर, मुल्यवार्धानासाठी तसेच विक्रीसाठी, थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सेवा देणारी उत्पादनांवर आधारित शेतकरी संस्थांची स्थापना १४. चालू आणि भविष्यातील शेती उत्पादनांचे भाव दर्शविणारी अद्ययावत अत्याधुनिक इलेक्ट्रोनिक सेवा या शिफारशी स्वीकारण्यात सरकारला अडचण आहे ती म्हणजे हमीभाव, जमीन धारणा आणि शेतजमिनीची विक्री यासंबंधी केलेल्या शिफारशींची. त्यामुळे सरकार स्वामिनाथन आयोगाचा संपूर्ण अहवाल न स्वीकारता त्यातील ज्या शिफारशी अमलात आणल्या जाऊ शकतात त्या आणण्याच्या कसोशीने प्रयत्न करीत आहे. आघाडी सरकारने सिंचन संबंधी सुधारणा अमलात आणल्या त्याप्रमाणे भाजप सरकार हे जलयुक्त शिवार तसेच आडते दूर करून काही शिफारशी अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच संपूर्ण स्वामिनाथन अहवालात कर्जमुक्तीची शिफारस आढळली नाही. केवळ कर्जाच्या कालावधीबाबत सरकारने विचार करावा अशी शिफारस मात्र वैद्यनाथन आयोगाचा हवाला देऊन स्वामिनाथन आयोगाने केलेली आढळते. हा अहवाल त्वरित अमलात आणणे हे देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाहता शक्य आहे असे वाटत नाही परंतु शेतीमाल विक्री तसेच उत्पादन नियंत्रण यावर ज्या सिफारशी आयोगाने केल्या त्या अमलात आणल्यास शेतीमालाची विक्री वाढून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारण्यास मदत होऊ शकते. परंतु ही शिफारस सरकार केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दबावामुळे स्वीकारू शकणार नाही असेही वाटते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. आंबाच्या झाडावर जशी अमरवेल वाढते त्याप्रमाणे शेतकरी नावाच्या झाडावर इतर शहरी व सामान्य नागरिकांची अमरवेल वाढत आहे. आज ती इतकी वाढली आहे कि संपूर्ण आंब्याचे झाड त्यामुळे झाकोळले गेले आहे. आंब्याच्या झाडाला यामुळे श्वास घेणे अवघड झालंय. शेतकऱ्याला संपूर्ण न्याय हा मिळायला हवाच. पण देशाच्या राजकारण हे शेतकऱ्याचा वापर करून घेते आणि त्याला उघड्यावर सोडून देते हा आजवरचा इतिहास आहे.ज्याप्रमाणे अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर सर्व राजकीय पक्षांना पूर्णपणे झिडकारून आंदोलन केले त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आंदोलन करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांचा शेतकरी आंदोलनात किंवा संपातला सहभाग हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे महत्व कमी करणारा आहे. भारतीय शेतकरी जगला तर देशच काय पण विश्वही जगू शकेल यात शंका नाही. 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
634 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी बोंड अळी का येते_* _(आता कोणत्या चुका टाळाव्यात?)_ _मागीलवर्षी लेखात गुलाबी बोंडअळीची ओळख आपण करून घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील कपाशी क्षेत्रात मोडणाऱ्या जवळपास सर्वच जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन आले. यावरूनच या किडीला आता आपण दुर्लक्षित करणार नाही हे पक्के झाले करिता कपाशी लागवड केली असल्याने आता गुलाबी बोंडअळी येवुच नये करिता कोणत्या चुका सद्या टाळाव्यात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून हा लेख लिहितो आहे._ _गुलाबी बोंड अळीसाठी कपाशी हेच एकमेव खाद्यपीक असल्याने या किडिंचा प्रादुर्भाव रोखने सहज शक्य आहे. या किडीसाठी दुसरी यजमान वनस्पतीच नाही हे विशेष आहे. म्हणुनच या किडिचा जास्त धसका न घेता खालील सहज उपाययोजना स्वतः पुरत्या जरी केल्या तरी आपण बऱ्याच अंशी यश संपादन करू शकतो._ _*१]* हंगामपूर्व (एप्रिल-मे) तसेच हंगामा नंतर (डिसेंबर-जानेवारी) सुद्धा कापूस लागवड केल्याने किडींचा जीवनक्रम चालू राहतो. करिता डिसेंबर नंतर उपड पराटी, लाव गहूचे प्रयोजन येणाऱ्या हंगामात निश्चितच करावे._ _*२]* ओलित कापूस लागवड क्षेत्रात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कोरडवाहू क्षेत्रापेक्षा हमखास जास्त जाणवतो करिता ओलित करावयाची गरजच असेल तर संरक्षित ओलीत करणे महत्त्वाचे आहे._ _*३]* ऑगस्ट महिन्यापासून पिकात कामगंध सापळे लावल्याने त्याद्वारे या आळीचे पतंग आकर्षित होऊन मरतात व त्याने अळीच्या उत्पत्तीस आळा बसतो._ _*४]* कीटनाशके, बुरशीनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये (माइक्रो न्युट्रियंट व सोल्युबल फर्टिलायझर) यांचे मिश्रण किंवा खिचडी (मजुरी खर्चात बचत व्हावी म्हणून). या किडिंचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी कारणीभूत आहे. करिता अशी खिचडी टाळावी अन्यथा हिच खिचडी गुलाबी बोंड अळीच्या वाढी करिता पाहुंणचार ठरतो._ _*५]* मोनोक्रोटोफॉस + ॲसिफेट या किटक नाशक मिश्रणाचा वापर फवारणीसाठी केल्यामुळे झाडावर नवीन पालवी फुटते अथवा पाते, शेंडे व लव लुसलूशीत होते त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे पतंग सहज अंडी देवू शकतील असें पोषक वातावरण तयार होते. या मिश्रणाचा वारंवार (२-३ वेळेस) वापर झाल्यास फुलोराअवस्था ते फळधारणा हा काळ लांबतो. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या वाढी करिता पोषक वेळ मिळतो._ _*६]* पिकाच्या सुरूवातीच्या ३ महिन्यात शक्यतोवर रासायनिक औषधीचा वापर टाळल्यास योग्यच राहिल. त्या माध्यमातून नैसर्गिक मित्र किडिंचे प्रमाण योग्य राहील व किडिंचा प्रादुर्भाव कमी करता येईल. त्याकाळाता वनस्पतीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके व परोपजीवी मित्र किड्यांचा वापर केल्यास गुलाबी बोंडअळी विरुद्ध उत्तम रिझल्ट मिळतील._ _*७]* कमीत कमी सुरूवातीच्या ३ महिन्यात तरी मोनोक्रोटोफॉस, ॲसिफेट, इमिडाक्लोप्रीड, थायोमेथोक्साम, ॲसिटामाप्रीड इत्यादी किटकनाशकांचा वापर शक्यतोवर टाळावा. ह्या कीटकनाशकामुळे वाढिची अवस्था लांबते. या कारणामुळे गुलाबी बोंड अळीच्या जिवनचक्रांच्या संखेमध्ये वाढ होते._ _*८]* गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा. युरियाचा वापर सुरूवाती च्या ४५ दिवसांतच करने योग्य राहील._ *_📍भविष्यात कोणत्या चुका टाळाव्यात_* _*१]* देशी जातींच्या तुलनेने अमेरिकन जातींवर जास्त प्रादुर्भाव येतो करिता भेंडी सारखी पाने असणारी इतर संकरित जातीचा वापर केल्यास निश्चितच फायद्याचे ठरते._ _*२]* दिर्घकाळ वाढ्णा-या (लॉंग ड्युरेशन- १८० दिवसाच्या) संकरित वाणाची लागवड टाळावी. त्याद्वारे गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते._ _*३]* कपाशीच्या वेगवेगळ्या संकरित वाणांचा एकाच क्षेत्रात उपयोग केल्यास फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा होत असल्याने किडींच्या वाढीसाठी सतत खाद्य पुरवठा होऊन जीवनक्रमांच्या (Life cycle) संख्येत वाढ होते._ *_✒️संकलन : पंकज काळे ( M.Sc. Agri )_* _निसर्ग फाऊंडेशन, अमरावती_ _*संपर्क क्र.:* ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११_
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
551 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती ?* पोलादाच्या कारखान्यात १० टक्के नफा मिळतो. परंतु उलाढाल प्रचंड असते त्यामुळे तो कारखाना नफ्यात चालतो. प्रत्येक धंद्याचं नफ्याचं गणित वेगवेगळं असतं. नफा होतो म्हणूनच उद्योग-धंदे-व्यापार सुरु असतो.कारण कोणत्याही धंद्याला जमीन,भांडवल,तंत्रज्ञान,बाजारपेठ आणि संयोजक असतो. शेतीतही हेच सर्व घटक असतात. मात्र उत्पादनावर शेतकरी संपूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे बाजारपेठही त्याला हुलकावणी देते. उत्पादनाची जोखीम शेतकर्‍याच्या पाचवीला पुजलेली असते. कारण बिगर मोसमी पाऊस,तापमानातील घट वा वाढ,अश्या अनेक घटकांवर त्याचं नियंत्रण नसतं. मी आज सोयाबीन लावलं तर ते चार महिन्यांनी कापणीला येतं. मी ऊस लावला तर वर्ष वा दीड वर्षाने तो कापणीला येतो. हळद 10 महिन्यात,तुर 6 महिन्यात,गहू,हराभरा चार महिन्यात हातात येते. हीचं गत बहुतेक पिकांबाबत असते. तीन वा चार महिन्यांनंतर बाजारपेठेत कोणत्या पिकाला मागणी असेल ह्याचा केवळ अंदाजचं शेतकरी लावू शकतो. बाजारपेठेत मागणी नसेल तर मी सोयाबीनचं उत्पादन कमी करू शकत नाही वा मागणी आहे म्हणून उसाचं उत्पादन वाढवू शकत नाही. मार्केट वा बाजारपेठेचीही जोखीम शेतकरी घेतो. तिसरा मुद्दा असा की शेतकरी रोज उत्पादन करत नसतो. त्याने पेरलेलं बी 3 किंवा 4,6,10,12,किंवा 18 महिन्यानंतर फळ देतं. कोल्हापूर उसासाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या पत्रकारांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना कळलं की वर्तमानपत्रांचा खप दुधाच्या धंद्यामुळे वाढला. कारण दुधाचे पैसे शेतकर्‍य़ांना दर आठवड्याला मिळायचे. ऊस एक वा दीड वर्षानंतर पैसे देतो. पोलादाचं उत्पादन दररोज होतं. कारचं उत्पादन दररोज होतं. कंप्युटर्स दररोज बनवले जातात. वीजेचे बल्ब वा ट्यूब लाईट्स रोज बनवल्या जातात. शेती उत्पादन दररोज होत नाही. शेळी वा मेंढी वा मासे वा कोंबड्या दररोज विकता येत नाहीत. केवळ दुधाचं रोज उत्पादन होतं. याचा अर्थ असा की शेतीमध्ये उत्पादन आणि बाजारपेठेची जोखीम उद्योगापेक्षा वा सेवा उद्योगापेक्षा अधिक आहे. त्याचा एक परिणाम असा की शेतीला कर्ज सुलभपणे मिळत नाही. "द हिंदू" या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार नाबार्ड (नॅशनल बँक ऑफ एग्रीकल्चर अँण्ड रुरल डेव्हलपमेंट) या बँकेने सर्वाधिक कर्जाचं वाटप मुंबई व नवी मुंबईत केलं. शीतगृह आणि गुदामांच्या उभारणीसाठी. हे कर्ज शेतकर्‍यांना मिळालेलं नाही तर उद्योगांनी शेतीच्या नावावर घेतलं. मुद्दा काय तर शेती नफ्यात सोडाचं पण निदान उत्पादनखर्च भागवण्याएवढी उत्पन्न देऊ शकत नाही. कोणीही शेती करून श्रीमंत होऊ शकत नाही. शेतकरी आणि त्याला सेवा पुरवणारे बलुतेदार व अलुतेदार,यांच्या शोषणाशिवाय शेती करणं अशक्य आहे. श्रीमंत शेतकरी असू शकत नाही. शेतकर्‍याची श्रीमंती कोणत्या तरी अन्य घटकांमुळेच शक्य आहे. शेतकर्‍याचा भाऊ सरकारी नोकरीत असेल,उद्योगात असेल,शेतकर्‍य़ाकडे पेट्रोलपंप वा अन्य उत्पन्नाची साधनं असतील तरच तो श्रीमंत होऊ शकेल अन्यथा नाही. पुढचा पेच आणखी गुंतागुंतीचा आहे. शेतकर्‍याने शेती करणं सोडलं तर त्याला सामावून घेईल अशी औद्योगिक व्यवस्था नाही. कारण त्यासाठी केवळ भांडवलच नाही तर बाजारपेठही हवी. युरोप व अमेरिकेने ही बाजारपेठ मिळवली. ती केवळ संशोधन म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान या आधारे मिळवलेली नाही तर लष्करी सामर्थ्याच्या जोरावर मिळवली. म्हणजे भारतासारख्या देशांना वसाहती शोधाव्या लागतील. उदाहरणार्थ आफ्रिकेतील देश. जिथे अजूनही शेती वा उद्योगाचा विकास झालेला नाही. याचा अर्थ असा की कोणाचं तरी शोषण केल्याशिवाय शेती करणं अशक्य आहे. मात्र सध्या हाही पर्याय फारसा उपलब्ध नाही. भारताच्या लष्करी सामर्थ्याला मर्यादा आहेत. मात्र मोदी म्हणतात की ते शेतकर्‍याचं उत्पन्न दुप्पट करतील. त्यावर अनेक कृषीअर्थतज्ज्ञ विश्वासही ठेवतात. त्यांचं समर्थनही करतात. हा गाढवपणा आहे. परंतु मोदी-भाजप-संघ परिवारामुळे गाढवपणा हा गुण मानला जातो.
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
597 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती *शेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या !* जेव्हा जेव्हा शेतीतील अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी हे विषय चर्चेत येतात, तेव्हा हमखास होणारा एक उल्लेख म्हणजे “स्वामिनाथन आयोग”. ह्या आयोगात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? त्यांचं महत्व काय? आज पर्यंत त्यावर काय कामगिरी झाली आहे, असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण होतात. त्यांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न. स्वामिनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, जी समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये स्वामिनाथन हे अध्यक्ष होते. *स्वामिनाथन आयोगाच्या महत्वाच्या शिफारशी या पुढील प्रमाणे आहेत* ..... १. शेतकऱ्यांना असा हमीभाव मिळावा की त्यांचा सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा. म्हणजेच एकूण विक्रीच्या ३३.३३% इतका नफा हा शेतकऱ्यांना मिळावा. २. कृषी पतधोरणाची गरज म्हणून वैद्यनाथन समितीच्या शिफारशी सहकार क्षेत्रात लागू व्हाव्यात. *वैद्यनाथन समितीने सहकार क्षेत्रात काही शिफारशी दिल्या आहेत* त्यातील महत्वाच्या पुढील प्रमाणे: * दहा जणांचा समूह करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. * शेतकरी संस्था या लहान पण सहकार तसेच व्यवसाय तत्वावर असाव्यात. * कर्जाचा कालावधी हा कर्जाचा उपयोग व कर्जधारकाची परिस्थिती यावर अवलंबून असावा. * व्याजाचा दर हा सुरुवातीला जास्तीचा परंतु इतर कर्जे देणाऱ्यांपेक्षा कमी असावा. ३. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा ४. जीवन विमा तसेच निवृत्तीवेतन ५. व्यवसायातील धोक्यांपासून संरक्षण ६. मासेमारी करणाऱ्यांसाठी मासेमारीबंदीच्या काळात निर्वाह निधी जो रुपये १५००/- दरमहा असावा. ७. जमीनधारणा सुधारणा : शेती आणि जनावरांसाठी जमीन हा महत्वाचा प्रश्न आहे. एकूण २७% जमीन ही १५ एकर किंवा अधिक जमीन असणाऱ्यांकडे आहे, ३८% जमीन ही ५ ते १५ एकर जमीन असणाऱ्यांकडे आहे, १९% जमीन ही २.५० एकर ते ५ एकर जमीन असणाऱ्यांकडे आहे, तुकड्या तुकड्यांमध्ये १३% जमीन ही १ ते २.५० एकर जमीन असणाऱ्याकडे आहे, ३.८०% जमीन ही १ एकर पर्यंत जमीन असणाऱ्याकडे आहे. यामध्ये सुधारणेची गरज आहे. जी अतिरिक्त तसेच उपजीवी नसलेली जमीन सरकारकडे आहे तिचे वाटप व्हावे. बिगरशेतीकडे जी शेतजमीन वळवण्यात येत आहे त्यावर कडक निर्बंध यावेत. गुरांना चरण्यासाठी वनजमिनींचा वापर होण्यास पूर्ण मुभा देण्यात यावी. ८. राष्ट्रीय जमीन उपयोगिता सल्लागार मंडळाची स्थापना व्हावी. हे मंडळ जमिनीचा कस, हवामान, पर्यावरण, विपणन (मार्केट) इत्यादीचा अभ्यास करून शेती विषयी सल्ले देईल. ९. शेतजमिनीची विक्री नियंत्रित करण्यासाठी यंत्रणेची उभारणी. ही यंत्रणा जागेचा आकार, विक्रीनंतरचा संभाव्य वापर तसेच खरेदीदाराची श्रेणी पाहून विक्री परवानगीचा निर्णय घेईल. १०. शेतीविषयक पायाभूत सुविधा, सिंचन, शेतजमीन विकास, जलधारणा, रस्ते, संशोधन आणि विकास यामध्ये जनतेची गुंतवणूक वाढवण्यास प्राधान्य द्यावे. ११. सूक्ष्मपोषक घटकांची कमतरता तसेच माती परीक्षणासाठी परीक्षण केंद्रांचे जाळे निर्माण करणे. १२. पाण्याचे तसेच पिकांचे संवर्धन यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे. १३. शेती उत्पादनांसाठी मध्यवर्ती शेती उत्पादन केंद्रे, उत्पादन पूर्ण झाल्यानंतर, मुल्यवार्धानासाठी तसेच विक्रीसाठी, थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सेवा देणारी उत्पादनांवर आधारित शेतकरी संस्थांची स्थापना १४. चालू आणि भविष्यातील शेती उत्पादनांचे भाव दर्शविणारी अद्ययावत अत्याधुनिक इलेक्ट्रोनिक सेवा या शिफारशी स्वीकारण्यात सरकारला अडचण आहे ती म्हणजे हमीभाव, जमीन धारणा आणि शेतजमिनीची विक्री यासंबंधी केलेल्या शिफारशींची. त्यामुळे सरकार स्वामिनाथन आयोगाचा संपूर्ण अहवाल न स्वीकारता त्यातील ज्या शिफारशी अमलात आणल्या जाऊ शकतात त्या आणण्याच्या कसोशीने प्रयत्न करीत आहे. आघाडी सरकारने सिंचन संबंधी सुधारणा अमलात आणल्या त्याप्रमाणे भाजप सरकार हे जलयुक्त शिवार तसेच आडते दूर करून काही शिफारशी अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच संपूर्ण स्वामिनाथन अहवालात कर्जमुक्तीची शिफारस आढळली नाही. केवळ कर्जाच्या कालावधीबाबत सरकारने विचार करावा अशी शिफारस मात्र वैद्यनाथन आयोगाचा हवाला देऊन स्वामिनाथन आयोगाने केलेली आढळते. हा अहवाल त्वरित अमलात आणणे हे देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाहता शक्य आहे असे वाटत नाही परंतु शेतीमाल विक्री तसेच उत्पादन नियंत्रण यावर ज्या सिफारशी आयोगाने केल्या त्या अमलात आणल्यास शेतीमालाची विक्री वाढून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारण्यास मदत होऊ शकते. परंतु ही शिफारस सरकार केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दबावामुळे स्वीकारू शकणार नाही असेही वाटते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. आंबाच्या झाडावर जशी अमरवेल वाढते त्याप्रमाणे शेतकरी नावाच्या झाडावर इतर शहरी व सामान्य नागरिकांची अमरवेल वाढत आहे. आज ती इतकी वाढली आहे कि संपूर्ण आंब्याचे झाड त्यामुळे झाकोळले गेले आहे. आंब्याच्या झाडाला यामुळे श्वास घेणे अवघड झालंय. शेतकऱ्याला संपूर्ण न्याय हा मिळायला हवाच. पण देशाच्या राजकारण हे शेतकऱ्याचा वापर करून घेते आणि त्याला उघड्यावर सोडून देते हा आजवरचा इतिहास आहे.ज्याप्रमाणे अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर सर्व राजकीय पक्षांना पूर्णपणे झिडकारून आंदोलन केले त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आंदोलन करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांचा शेतकरी आंदोलनात किंवा संपातला सहभाग हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे महत्व कमी करणारा आहे. भारतीय शेतकरी जगला तर देशच काय पण विश्वही जगू शकेल यात शंका नाही. 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
558 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी बोंड अळी नियंत्रणाकरिता तिची ओळखच महत्त्वाची_* _आजमितीस मला ब-याच कपाशी लागवड करणा-या शेतकरी बांधवांच्या एकाच प्रश्नाला वारंवार सामोरे जावे लागते आहे. तो प्रश्न *गुलाबी बोंड अळी आली काय?त्यासाठी आता काय फवारायचे.* करिता हा लेख मी लिहितो आहे._ _सैतानाला (गुलाबी बोंड अळी) धास्तावुन न जाता त्याची ओळख करून घेणे महत्वाचे आहे. याच आपल्या घबराहटीचा फायदा घेत मोठ्या मोठ्या गब्बर जमाती आपण तयार केलेल्या आहेत. अशीच भिती घालत उत्पादना पुर्वी व उत्पादन आल्यानंतर सुद्धा शेतकरी नागवल्या जातो. तेंव्हा जरूर ओळख करून घेवुया गुलाबी बोंड अळीची._ *_🎯गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम_* _कोणत्याही अळीवर्गिय किटकांच्या जिवनचक्रात ४ अवस्था असतात. अंडी, अळी, कोष, पतंग. त्यानुसार गुलाबी बोंड अळी आपल्या क्षेत्रात आली किंवा नाही त्याबद्दलची प्रत्येक अवस्थेतील ओळख (रंग, आकार, स्थान व काळ) शेतकऱ्याला होने आवश्यक आहे. करिता हा लेख चित्रांसह देत आहे._ *_🎯अंडी अवस्था_* _गुलाबी बोंड अळीची मादी पहिल्या पावसा नंतर किंवा कपाशीच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पाते धरायच्या अगोदर तिच्या पहिल्या पिढीची सुरूवात कोवळे शेंडे व पात्यांवर अंडी देवुन करते त्यामुळे जून-जुलै दरम्यान पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले, कोवळी बोंडे उपलब्ध नसतात त्यामुळे अश्या अंडीतुन निघालेल्या अळ्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा आत्मघाती उदय (suicidal emergence) असे म्हणतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची पुढची उत्पत्ती रोखता येते. हंगामी कापूस पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यास मोठा फायदा होऊ शकतो. त्यानंतरच्या पिकांच्या अवस्थेत दुसऱ्या पिढीपासुन अंडी सरळ नवीन कोवळ्या बोंडावर व पुष्प कोषावर दिल्या जातात. मादी पतंग जिवनात १००-२०० अंडी एकल किंवा ४-५ अंडी समुहाने बारीक फटीत अलग अलग लांबोळी, पांढरी, गोल, चपटी अंडी घालते._ *_🎯अळी अवस्था_* _सर्व साधारण ३-५ दिवसात अंडी उबतात. या पक्व झालेल्या अड्यांतून पांढरी रंगाची १ मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पडते, अशा अळ्या रात्री पात्यामध्ये डोमकळ्याच्या माध्यमातून बोंडात शिरतात यासाठी ५ ते ६ दिवस लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते. म्हणुनच तीला गुलाबी बोंडअळी म्हणतात. अळी अवस्था सुमारे ८ ते २१ दिवसांच्या दरम्यान असते._ *_🎯कोष अवस्था_* _कोष सुमारे ८ ते १० मि.मी. लांब व बदामी रंगाचा असतो. कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग रात्री किंवा पहाटेच बाहेर येतात. खाद्य वनस्पती अभाव व प्रतिकुल परिस्थितीत कोष अवस्था ६ महिने ते २ वर्षापर्यंत सुद्धा राहू शकते._ *_🎯पतंग अवस्था_* _*१]* पतंगा सुमारे ८ ते ९ मि.मी.चा असतो व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात. पतंगावस्था सुमारे ५ ते ३१ दिवस राहते. हे पतंग निशाचर (अंधार प्रिय) असतात त्यामुळे ते दिवसा मातीत किंवा जमिनीच्या फटीत दडुन बसतात. हेच कारण आहे कि या पतंगाचा मिलन व अंडी देण्याचा काळ अंधारी रात्री म्हणजेच अमावसेच्या काळात जास्त होतो._ _*२]* मागील वर्षी मोठे-मोठे हॅलोजन कपाशी क्षेत्रात लावन्यात आले होते, त्यावेळेस आपण किती मोठा मुर्खपणा केला होता ते जाणवेल. कारण याद्वारे बिना कामाची असंख्य किड मारली ज्याचा आपल्याला काहिच त्रास नव्हता व मौल्यवान विद्युत शक्ती सुद्धा विनाकारण वाया घालवली. मंद प्रकाशाच्या निळ्या (अल्ट्रा व्हायोलेट) बल्बवरच बोंड अळीचे पतंग येत असतात. प्रखर प्रकाशावर ते केव्हाच येत नाहीत_ *_✒️संकलन : पंकज काळे ( M.Sc. Agri )_* _निसर्ग फाऊंडेशन, अमरावती_ _*संपर्क क्र.:* ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११_
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
501 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी (सल्फर)* *भाग १* पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे. गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये गंधकाचे प्रमाण १०% टक्के असते. १००% टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे. गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यास मदत होते. कृषिमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनाची भरीव वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन वाढण्यास व प्रत सुधारण्यास मदत होते. *गंधकाचे पिकांमधील कार्य -* १) गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते. २) गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्‍यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे. ३) गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते. ४) भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा ८०% टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो. ५) गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्‍लेषणामध्ये वाढ होते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते. *जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे -* १) मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याद्वारे होणारी गंधकाची कमी. २) गंधकविरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर. ३) जमिनीतून पिकांद्वारे सातत्याने, गंधकाचे होणारी उचल. ४) शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर. *गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारी लक्षणे -* १) पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते. नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात. २) द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते. तृणधान्य वर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो. फळे पूर्णपणे पिकत नाहित्. 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
651 जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती (सल्फर)* *भाग २* पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य सल्फरचा पुरवठा करणारे सेंद्रिय पदार्थ हे मुख्यत्वे करुन जमिनीच्या वरच्या थरातच असतात. इलिमेंटल सल्फर (जे आपण बाजारातुन सल्फर आणतो तेच) हे पिक तोपर्यंत शोषुन घेवु शकत नाही जोवर त्याचे रुपांतर सल्फेट (SO4) स्वरुपात होत नाही, आणि हे होण्यासाठी जमिनीत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया असणे गरजेचे आहे. सल्फेट हे ऋण भार असलेले मुलद्रव्य असल्या कारणाने ते जमिनीत लवकर नत्रा पेक्षा ५०% टक्के जास्त वेगाने वाहुन जाते. *सल्फर चे कार्य:-* प्रथिने आणि पेप्टाईड चा एक अविभाज्य घटक नत्राचे (इनऑरगॅनिक नत्र) रुपांतर प्रथिनांत करण्यासाठी उपयुक्त हरितलवक निर्मितीत संप्रेरक म्हणुन कार्य करते. द्विदल धान्य पिकांतील मुळांवरिल उपयुक्त गाठी तयार होण्यात कार्य करते. विविध इन्झाइम्स चा घटक ज्या रसायनांमुळे कांदा, मोहरी आणि लसणास वास आणि विशिष्ट चव येते त्या रसायनांचा घटक. पिकाच्या खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी गरजेचे अन्नद्रव्य जमिनीचा सामु कमी करण्यासाठी हल्ली सल्फ्युरीक आम्लाची शिफारस केली जाते आहे, खालिल तक्त्यात आपल्यास दिसुन येईल की, सल्फ्युरीक आम्लामधिल सल्फर चे प्रमाण हे केवळ ३२ टक्के इतकेच आहे, त्या उलट सल्फर मधिल त्याचेप्रमाण ९०% टक्के आहे. म्हणजेच ज्याठिकाणी ४५ किलो सल्फर टाकुन काम होईल त्या ठिकाणी १३८ किलो सल्फ्युरीक असिड लागेल. जमिनीचा सामु हा जर कमी करावयाचा असेल तर त्यात सल्फर घालणे गरजेचे आहे जे सल्फर (इलिमेंटल सल्फर) किंवा सल्फ्युरीक आम्लातुन मिळते ज्यापैकी इलिमेंटल सल्फरचा वापर हा सुरक्षित आणि स्वस्त देखिल आहे.जमिनीचा सामु सल्फर वापरुन कमी करा. रासायनिक खतसल्फर चे प्रमाण सल्फर ९०% अमोनियम सल्फेट २४% अमोनियम थायोसल्फेट २६% कॅल्शियम सल्फेट १५-१७% फेरस सल्फेट १२% पोटॅशियम सल्फेट १७.५% पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट २२% सल्फ्युरीक असिड ३२% 🙏🏻🙏🏻
See other profiles for amazing content