फॉलो करा
Suresh Khade
@357387397
2,046
पोस्ट
3,589
फॉलोअर्स
Suresh Khade
501 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
आपला देश आहे म्हणतात कृषीप्रधान काय सांगाव दादा शेतकऱ्याची कथा शेतकऱ्याच जिवन म्हणजे दुःख नि व्यथा उसनपासन कर्ज काढून पेरतो या शेत शेतात गेल्यावर रिकामा नसतो हात ll शेतकरी नि शेताच जिवाभावाचा नातं शेतीशिवाय त्याला क्षणभर नाही गमत माहीत त्याला शेतीचा काना नि कोपरा तरी कधीच नसतो त्याचा सातबारा कोरा ll एवढ करूनही हातात काही नाही उरत कष्ट धन जीव लावून रिकामाच असते पोत फवारा निंदन डवरे मारूनही तण असे जोमात पिक आणि शेतकरी नेहमी असते कोमात ll शेतकऱ्याच दुःख व्यथा ऐकत नाही देव सरकारलाही येतं नाही दुःख पाहून चेव शेतकऱ्याने शेतात कोणतही पेराव पिक   येत नाही हातात तोपर्यंत जीव करे धाकधुक ll शेतकरी जेंव्हा शेतात पेरतो ऊस कापूस निंदन डवरे फवारे मारून तोंडाला येतो फेस कापूस वेचायला आता होणारं सुरूवात काय सांगाव दादा पाऊस येतो ना जोरात ll साऱ्या वावरात जिकडे तिकडे पाणीच पाणी पाण्यात वावर पाहून शेतकरी करतो म्याटावाणी सुचत नाही उपाय, काहींच करता येतं नाही डोळ्या देखत भरलेलं वावर वाहून जाई ll देवाचा करतो धावा जोडतो हात देवाला वावर पेरून म्हणे देवा मी काय गुन्हा केला पावसाला जोडे हात करे मनापासून नवस परंतु त्याच्या जिवनात येईना चांगले दिवस ll पेरून बघतो उडीद मुग ज्वारी आणि मका ऐन कापणीच्यावेळी पाऊस देतो त्याला धोका पेरतो केळी पपई संत्रा वांगे भेंडी तूर सोयाबीन कितीही घ्या काळजी जाते पाण्याने वाहून ll शेती म्हणजे लॉटरी वरली मटका नि जुगार दर पिकाला खेळतो मात्र मानत नाही हार सोन्यासारखा भाव जर मिळाला मालाला तो सुध्दा सुखी आंनदी ठेवू शकतो जगाला ll शेतकऱ्यासारखा मोठ्या मनाचा नाही कोणी शेतात कोणी आलं तर जावू देईना रित्या हातानी आपला देश आहे म्हणतात कृषीप्रधान येवो कोणत्याही पक्षाचे सरकार देईना ध्यान ll #🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🤗 जुन्या आठवणी #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒
See other profiles for amazing content