फॉलो करा
Mr. Vik@s
@36832142
35,885
पोस्ट
89,926
फॉलोअर्स
Mr. Vik@s
537 जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
#दुर्गेचे_चवथे_रूप#कुष्मांडा सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च। दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।। दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏जय माता दी
Mr. Vik@s
546 जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना, तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात . माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातुनच खरा कळतो. चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी एक वेळेस चालेलं . पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही . आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत, हे फक्त दोघानांच माहीत असते ..एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा ! त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका , एक "मनाचं बालपण " आणि दुसरे "अंतःकरणातील देवपण "! हे संपलं कि माणूस संपला ! #🙏श्री गुरुदेव दत्त💐
Mr. Vik@s
691 जणांनी पाहिले
19 तासांपूर्वी
#🙏जय माता दी दिनांक 25 सप्टेंबर 2025 शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके 1947 च्या तृतीया वृद्धी तिथीला नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मातंगी रूपात सजली आहे . दशमहाविद्यापैकी मातंगी ही संगीत देव विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे ज्या वेळेला भंडासूरदैत्याचा संहार करण्यासाठी सर्व देवांच्या आवाहनानुसार भगवती ललिता प्रगट झाली त्यावेळेला विषङ नावाच्या दैत्याला मारण्यासाठी राजश्यामला अर्थात मैत्रिणी देवीचा अवतार झाला. पुढे हिमालयाने आपल्या घरी आदिशक्तीने कन्या रूपात अवतार घ्यावा म्हणून जगदंबेची उपासना केली त्यावेळेला भगवती ललिता पार्वती रूपाने हिमालयाच्या घरी अवतीर्ण झाले. हिमालयाचा मित्र असणाऱ्या मातंग मुनींनी ललितेची प्रिय सखी असणाऱ्या राजशामलेची उपासना याच कारणासाठी केल्यानंतर भगवती राजश्यामला त्यांची कन्या रूपात प्रगट झाली मातंग ऋषींची कन्या म्हणून ती मातंगी. हे मातंगी संगीत विद्येची देवता मानली जाते तिच्या उपासकात संगीतविद्येला तसेच ती विद्या असणाऱ्या गायक वादकांना प्रचंड सन्मान दिला जातो कारण वाद्यांचा किंवा संगीताचा अपमान हा मातंगीचा अपमान मानला जातो. मातंगी याच रूपान भगवती पराशक्तीच्या प्रत्येक अवताराच्या वेळेला अवतार धारण करत असते रेणुका अवतारात मातंगीचे मस्तक जळवूनच रेणुका पुनर्जीवित करण्यात आली. भवानीच्या अवतारात देखील मतंग नावाच्या दैत्याच्या संहारासाठी देवी मातंगी स्वतः युद्ध करायला आली असा उल्लेख तुरजा महात्म्य ग्रंथात आहे. श्री मातंगीची अनेक आयुध वर्णन उपलब्ध असली तरी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई हातामध्ये ढाल अंकुश चंद्रहास खड्ग आणि पाश धारण केलेल्या रूपामध्ये सव्य ललिता सणात विराजमान आहे. महन्मंगल भगवती मातंगीच्या कृपेच्या सुरांनी तुमचे आमचे आयुष्य सुरेल व्हावे हीच करवीर निवासिनी चरणी प्रार्थना श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः
Mr. Vik@s
514 जणांनी पाहिले
20 तासांपूर्वी
#🙏जय माता दी पगडी म्हणून बसली तर *मुलगी...* मनगटावरती हक्काने बसली तर *बहीण...* चुलीजवळ मायेनी बसली तर *आई...* तिजोरीवर स्वस्तिक म्हणून बसली तर *बायको...* अंगणातील तुळस म्हणून बसली *सून...* चहात ईलायची म्हणून पडली तर *मैत्रीण...* गोष्टींच्या दुनियेत घेऊन गेली तर *आजी...* आणि मंदिराच्या गाभाऱ्यात बसली तर *देवी...* *इतकी सोप्पी आहेत तिची विविध रूपे...* *राम कृष्ण हरी, खरचं किती सोपी आहे समजायला ती*🙏🏻🌹 स्त्री शक्तीस सलाम.... एकंदरीत बायकांच्या मुडचा थांग लावणे तसे महाकठीणच. अगदी ऍडमला देखील इव्हच्या मनातले कळलं असेल की नाही हे त्या ब्रम्हदेवास सुद्धा सांगता येणार नाही. ब्रम्हदेवावरून आठवलं त्याला या सृष्टीचा निर्माता असे म्हणतात, त्याचा उल्लेख केल्यावर ब्रम्हा, विष्णू आणि महेश अशी त्रिमूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पण मला वाटते ही त्रिमूर्ती नसून मागचा भाग तेवढा आपल्याला दिसत नाही आणि हा न दिसणारा भाग म्हणजे स्त्रीस्वरूप आदिशक्ती असावी. या सृष्टीच्या निर्मितीसाठी या आदिशक्तीचा देखील तितकाच सहभाग असावा अशी मला दाट शंका आहे. स्त्री म्हणजे एकाच वेळी अनेक भूमिका साकारणारी हरहुन्नरी कलावंतच. आई, बहीण, मुलगी, मैत्रीण, शिक्षिका, सहकारी, प्रियसी, पत्नी आदी भूमिका ति लीलया निभावत असते. आजच्या आधुनिक युगात अगदी शेतमजूर पासून ते अंतराळवीर अशा सर्वच क्षेत्रांत ती कुठेही मागे नाही. अशा या तमाम स्त्रीयांना, या नवदुर्गांना, आदिशक्तीला माझे नमन आणि या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा... जगदंब!जगदंब!! जगदंब!!! जिजाऊ.....
Mr. Vik@s
503 जणांनी पाहिले
20 तासांपूर्वी
#🙏जय माता दी जगातील एकमेवाद्वितीय मूर्ती जी बनवताना तीन धातू :-चांदी, तांबे आणि पितळ एकत्र वापरले गेले. इथे देवीचे मुख चांदीचे, उर्व रित शरीर तांबे आणि वस्त्र पितळ धातू वापरून बनवन्यात आले आहे.विशेष म्हणजे ह्या तिन्ही धातूंचे Melting point भिन्न आहेत.तरीही ह्या मूर्ती वरती कुठेही वेल्डिंग नाही, जोड दिलेला नाही ही अखंड मूर्ती आहे . हेच वैशिष्ट्य देवीच्या खाली असणारया सिंहाचे आहे, पूर्ण शरीर तांब्याचे आणि त्याची आयाळ पितळी आहेत. आज पर्यंत अशी दुसरी मूर्ती बनवन्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.* *🌸कोल्हापूर च्या श्रीअंबाबाई ची उत्सवमूर्ती🌸*
Mr. Vik@s
553 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस, या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप असलेल्या चंद्रघंटाची विधिवत पूजा केली जाते. शास्त्रानुसार माता दुर्गेचे हे रूप अत्यंत शांत आणि लाभदायक आहे. देवीच्या कपाळावर घंटाच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, म्हणून मातेचे नाव चंद्रघंटा पडले. प्रचलित कथेनुसार, जेव्हा राक्षसांची दहशत वाढू लागली होती तेव्हा दुर्गा देवीने चंद्रघंटाचा अवतार घेतला होता. त्यावेळी महिषासुर आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू होते. महिषासुराला देवराज इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते. स्वर्गीय जगावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो हे युद्ध करत होता. देवी चंद्रघंटाचा वाहन सिंह आहे. कमळ आणि कामदंड याशिवाय दहा हातात चार शस्त्रे आहेत. त्यांच्या कपाळावरचा अर्धचंद्र ही त्यांची ओळख आहे. त्याच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे आणि वर रत्नजडित मुकुट आहे. चंद्रघंटा माता युद्धाच्या मुद्रेत बसलेली असते. पूजेचे फायदे- देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने मनाला शांती मिळते असे मानले जाते. देवी दुर्गेच्या तिसर्‍या रूपाची उपासना केल्याने व्यक्तीला परम शक्तीचा अनुभव येतो. असे मानले जाते की चंद्रघंटा मातेच्या पूजेमध्ये दूध वापरणे अत्यंत फायदेशीर आहे. मंत्र-पिंडजप्रवरारुधा चण्डकोपस्त्रकार्युता । प्रसादम् तनुते मह्यम् चंद्रघण्तेति विश्रुता । पूजा पद्धत-सकाळी प्रथम स्नान करून मातेचे ध्यान करावे.दुर्गेला फुले, अक्षत आणि पूजा साहित्य अर्पण करा आणि देवीची आरती करावी.आरतीच्या वेळी शंख आणि घंटा वाजवा, असे मानले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.केशराची खीर आणि दुधापासून बनवलेली मिठाई चंद्रघंटाला अर्पण करावी. याशिवाय देवीला पंचामृत, साखर आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जातो.
Mr. Vik@s
4.3K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🌹देवी देवता🙏 तुळजाभवानी मातेच्या चलमूर्ती चा मूळ फोटो आणि थोडक्यात माहिती..!! तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे साडेतीन फूट आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. ही एक अनोखी प्रथा आहे. साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते. वीरांची देवता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. फोटो सौजन्य - श्री स्वामी समर्थ सेवा मासिक (दिंडोरीप्रणित) मे २०१८
Mr. Vik@s
707 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक ! १. साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे. २. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. ३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. ४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणा-या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही. ५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. ६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे. ७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात. ८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय. ९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात. १०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो. ११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते. १२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. १३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. १४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय. १५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. १६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. १७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल.......... तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. १८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. १९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. २०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी. २१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात. २२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो. २३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते. २४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही. २५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. २६. गुरुमंत्राचा जप करणा-याचीच आध्यात्मिक उन्नती होते. २७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो. २८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु ! २९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. ३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो. ३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात.. POST from Mr santosh sundar mehata दत्त माझा । मी दत्ताचा ।।
See other profiles for amazing content