फॉलो करा
Ashwini Annapurna kitchen
@4323972071
22
पोस्ट
455
फॉलोअर्स
Ashwini Annapurna kitchen
1.5K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
कुरकुरीत मुरमुऱ्याची झटपट कुरकुरीत चिक्की ✨ फक्त 2 साहित्य – चवदार, हेल्दी आणि खूपच कुरकुरीत! 😍 📝 साहित्य : • गरम मुरमुरे – 3 कप १०० ग्रॅम • गूळ – 200 ग्रॅम (बारीक चिरलेला) 👩‍🍳 कृती : 1️⃣ कढई मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात बारीक चिरलेला गूळ घाला. 2️⃣ गूळ वितळू द्या. चमच्याने ढवळत राहा. 3️⃣ गूळ पूर्ण वितळून एकजीव झाल्यावर पाक तयार झाला आहे का ते पाहा. (थोडासा पाक पाण्यात टाकल्यावर तो कडक झाला पाहिजे.) 4️⃣ आता लगेचच त्यात गरम मुरमुरे घालून पटकन मिसळा. 5️⃣ मिश्रण तुपाचा हात लावलेल्या पाटावर ओता व पातळ थापून घ्या. 6️⃣ थोडेसे थंड झाल्यावर सुरीने काप करा. ✨ टीप : ✔️ मुरमुरे गरम आणि कोरडे असतील तर चिक्की जास्त कुरकुरीत होते. ✔️ गूळ जास्त शिजवू नका, नाहीतर चिक्की कडू होऊ शकते. #🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #🍛 मराठी खानपान #🍱 मराठी जेवण
See other profiles for amazing content