#🍲रेसीपीज् #🍱 मराठी जेवण #🥗आजची झटपट रेसिपी😍 सार ___ साहित्य : एक चमचा खोबऱ्याचे कुट , एक चमचा शेंगदाण्याचे कुट, अर्धी वाटी आमसुलाचे कोळ , एक टेबलस्पून गुळ , दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ,एक टेबलस्पून चण्याचे पीठ , अर्धा चमचा लाल तिखट, फोडणी साठी तेल जिरे, कढीपत्ता हिंग मीठ. कृती ___ प्रथम आमसुलाच्या कोळामधे बेसनपीठ टाकून गुठळ्या न ठेवता मिक्स करावे , पातेल्यात तेल तापऊन जिरं कढीपत्ता , हिंग घालावा हिरवी मिरची टाकून परतून घ्यावी , नंतर आमसुलाचे मिश्रण ओतावे , सार चांगले ढवळावे, आता शेंगदाण्याचे कुट खोबऱ्याचे कुट गुळ लाल तिखट मीठ घालून पाहिजे तेवढे पाणी ओतावे, आणि मिश्रण एकत्र करुन एक दोन उकळी येऊ द्यावी . त्यानंतर गॅस बंद करावा गरमागरम सार वाढतांना वरून कोथिंबीर सजऊन सर्व्ह करावे .🍲