३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करा!
#HappyNewYear2026
#NewYearCelebration
🔸सध्या नववर्षारंभ सर्वत्रच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला साजरा केला जातो. नववर्षारंभ साजरा करण्याच्या या पद्धतीस विकृत स्वरूपही प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत खार्या, गोड्या जेवणावळी, मद्यपान करून ध्वनीवर्धकाच्या तालावर हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे, धिंगाणा घालणे, मारामार्या करणे, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने हाकणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, अश्लील शब्दांत बोलणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, महिलांची छेड काढणे, यांसारखे अनेक गैरप्रकारही होतात. यांमुळे नव्या वर्षाचा प्रारंभ शुभ होण्याऐवजी अशुभ पद्धतीने होते.
🔸१ जानेवारी हा ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ
१ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘१ जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्रे आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करून आहेत. त्यांचे नववर्ष १ जानेवारीला चालू होत नाही. भारतीय संस्कृतीतर या सर्वांहून प्राचीन संस्कृती आहे.
🌸भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे. आपल्याला आपल्या महान अशा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. पाश्चात्त्य प्रथा मानवाला नीतीहीन बनवतात, तर हिंदु संस्कृती संयमी आणि सदाचारी बनवते !
१. ३१ डिसेंबराला रात्री नववर्षारंभ साजरा करणे, ‘पार्ट्या’ करणे पाश्चात्त्य प्रथा टाळा; कारण ते वैचारिक धर्मांतरच आहे !
२. ‘१ जानेवारी’ ला नववर्षाच्या शुभेच्छा देऊ नका वा स्वीकारू नका !
३. गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा आणि हिंदु संस्कृती जोपासा !
४. नववर्ष पाश्चात्त्यांप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करा !
५. हिंदूंनो, १ जानेवारीला नववर्ष साजरे करून किती काळ इंग्रजांच्या दास्यत्वात रहाणार ?
६. गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे म्हणजे स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे !
आज हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
🌸हिंदु धमार्र्त सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ब्राह्ममुहुर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ वस्त्रे व अलंकार परिधान करून, धार्मिक विधीने करतात. त्यामुळे व्यक्तीवरही त्या वातावरणातील सात्त्विकतेमुळे चांगले संस्कार होत असतात.ज्या प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र रावणवधानंतर अयोध्येला आले आणि तेथे गुढी उभारून विजयदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदूंनो, या रावणरूपी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारून आपले धर्मकर्तव्य बजावा !
🔸 नववर्षारंभ ३१ डिसेंबरला साजरे करून महान भारतीय संस्कृतीचे हनन करण्याचे पातक ओढवून घेऊ नका !
३१ डिसेंबर आणि १ जानेवारी साजरे करण्यामागे असे काहीतरी कारण असेेल, असे वाटत नाही. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजाळलेल्या लोकांनी १ जानेेवारीला नववर्षारंभ करून आपल्या संंस्कृतीचे हनन केलेलेे जिकडे तिकडे दिसते.
३१ डिसेंबर साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करणे, हा आपला उद्देश असेल, तर ३१ डिसेंबरला धर्मशास्त्रात कुठे आधार आहे का ? जसे रामनवमी, हनुमान जयंती, दिवाळी, दसरा इत्यादी हिंदूंचे सर्व सण साजरे करण्यामागे काहीतरी ऐतिहासिक, पौराणिक किंवा धार्मिक (आध्यात्मिक) कारणे आहेत. हे सण साजरे केल्याने आपली संस्कृती जोपासली जाईल, सर्व लहान-थोरांवर सुसंंस्कार होतील. सदगुणांची जोपासना होऊन आपल्या मरगळलेल्या मनाला तजेला आणि त्यातून वैयक्तिक आनंद, राष्ट्रीय उन्नती, संघभावना वृद्धींगत होईल.
#🌻आध्यात्म 🙏 #🌹देवी देवता🙏 #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status