फॉलो करा
Abhijit Chinchkar
@abhijit_143
1,045
पोस्ट
3,700
फॉलोअर्स
Abhijit Chinchkar
1.3K जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
*🔸 पाणी...!🔸* Consult with Dr Rashmi Joshi for your health related issues as per clinic timings. *भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो.* *वयानुसार कुणी किती पाणी प्यायला हवं?* *आयुर्वेदानी सांगितली योग्य पद्धत आणि वेळ!* *सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळेच देतात. अशात आज एका रिपोर्टनुसार, 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत.* *मनुष्याचं साधारण 72 टक्के शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. पाणी शरीरातील पेशींना पोषक तत्व देण्याचं आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम करतं. पाण्यात अनेक पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवतात. पाण्याशिवाय जगणं याचा विचारच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवं.* *भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. पाणी किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं.* *तुम्हाला कदाचित माहीत नसेल मेंदुचा 85 टक्के भाग पाण्यापासून बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदुची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीसोबत इतरही समस्या वाढू शकतात. अशात तुम्ही तुमच्या वजनानुसार दिवसातून पाणी पाणी प्यायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला हवं.* *रोज किती पाणी प्यावं?* *रोज एका व्यक्तीने किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की, वजन, वय, लिंग आणि तुम्ही कोणतं काम करता. प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण एकसारखं असू शकत नाही. पण सामान्यपणे एका व्यक्तीने दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.* *एक निरोगी व्यक्तीला प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी दर दिवसाला जवळपास 35 मिलीलीटर पाण्याची गरज असते. म्हणजे जेवढं जास्त तुमचं वजन असेल तेवढं जास्त पाणी तुम्हाला प्यावं लागेल.* *50 किलो वजन असणाऱ्यांनी रोज जवळपास 1.7 लीटर पाणी प्यावं.* *60 किलो वजन असणाऱ्यांनी रोज साधारम 2.1 लीटर पाणी प्यावं.* *70 किलो वजन असलेल्या व्यक्तींनी रोज साधारण 2.4 लीटर पाणी प्यावं.* *80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तींनी रोज जवळपास 2.8 लीटर पाणी प्यावं.* *शारीरिक मेहनत जास्त असेल तर जास्त पिणं प्यावं.* *जे लोक जास्त शारीरिक मेहनतीचं काम करतात किंवा जास्त व्यायाम करतात किंवा उष्ण भागात राहतात त्यांना घाम जास्त जातो. अशात त्यांना जास्त पाणी प्यावं लागतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं.* *आयुर्वेदातील पाणी पिण्याचे नियम.* *भरपूर पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. पण पाणी पचवणंही तेवढंच महत्वाचं असतं.* *घाम, बद्धकोष्ठता, तोंड कोरडं पडणे आणि लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर जास्त पाणी प्यावे.* *जेवण केल्यावर लगेच पाणी न पिता साधारण 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. याने पचन चांगलं होतं.* *वाताने पीडित लोकांनी जेवण केल्यावर 30 मिनिटांनी आणि जास्त वजन असलेल्या लोकांनी जेवणाच्या 30 मिनिटांआधी पाणी प्यावे.* *उभं राहून पाणी पिणं टाळलं पाहिजे. नेहमीच बसून पाणी प्यावे. तेव्हाच त्याचे फायदे मिळतील.* *पाणी कधीही ढसाढसा किंवा घाईने नाही तर एक एक घोट करून प्यावे.* *फ्रिजमधील थंड पाणी पिणं टाळा. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिल्यास जास्त फायदे मिळतील.* *पाणी स्टोर करण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा कमी आणि स्टीलच्या भांड्याचा जास्त वापर करा.* #🎓जनरल नॉलेज
Abhijit Chinchkar
438 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
*बोधकथा* *मनःशांती* एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते. विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे? सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.' *लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.* 🙏🏻🙏 #🙏प्रेरणादायक / सुविचार
Abhijit Chinchkar
470 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
सुनबाई लिपस्टीक ठीक करत आरशात बघत म्हणाली...“आई, तुम्ही तुमचं जेवण करून घ्या हं… आम्हाला आज पार्टीला जायचंय! 😌💄” माऊली शांतपणे म्हणाली... “बाई, मला गॅसची चूल पेटवायला येत नाही गं… 😔” तेवढ्यात मुलगा म्हणाला.. “आई, आज मंदिरात भंडारा आहे, तु तिथे जा ना. मग जेवण बनवायची गरजच नाही पडणार… 🙄” आई शांतपणे चप्पल घालून मंदिराच्या दिशेने चालू लागली… 👵🚶‍♀️ हे सगळं 10 वर्षांचा रोहन ऐकत होता. पार्टीला जाताना रोहन म्हणाला— “पप्पा, मी मोठा झालो ना, तर मी माझं घर मंदिराजवळच बांधणार… 🙁” बापाने विचारलं— “का रे?” रोहन म्हणाला— “कारण कधीतरी मला सुद्धा पार्टीला जावं लागलं तर तुम्ही पण मंदिरात भंडाऱ्याचं जेवण खायला जाऊ शकाल… आणि मला हे नकोये की तुम्हाला लांबच्या मंदिरात जावं लागावं… 😢💔” हे ऐकून बापाच्या डोळ्यात पाणी आलं… दोघांनी ठरवलं.. “घरी जाऊन लगेच आईचे पाय धरून माफी मागायची.” ❤️ कार पार्क करून दोघे वर गेले. पण… घरातून मोठ्या आवाजात म्युझिक, हशा, गप्पांचा आवाज येत होता! 🎶😂 दरवाज्याची बेल वाजवली. आतून आवाज— “शारदा, दार उघड! आज पिझ्झा लवकर आला वाटतं!” 🍕😄 दार उघडलं तर शारदा काकू उभ्या. आत बघितलं तर… आई जीन्स आणि पिवळा टॉप घालून मस्त फिरत होती! 👖💛 बिल्डिंगमधल्या तिच्याच वयोगटातील मंडळी जमा झाली होती. हातात पेप्सीचे ग्लास 🥤 आणि स्पीकरवर “पानी पानी…” गाण्यावर सगळे थिरकत होते! 💃🕺🎶 आई थोडी दचकल्यासारखी झाली, पण लगेच हसून म्हणाली.. “काय रे, तुमची पार्टी कॅन्सल झाली का? काही हरकत नाही, आमच्या पार्टीत जॉईन व्हा! मी अजून तीन पिझ्झा ऑर्डर करते! 😄🍕🎉” --- बोध- बिध काही नाही! 😎 आजचे ज्येष्ठ कमजोर नाहीत, लाचार नाहीत. तुम्ही ज्या शाळेत शिकताय, त्या शाळेचे ते कधीकाळी हेडमास्तर होते! 🎓🔥 तेही मस्त मजा करतात, हसतात, नाचतात… आणि “लोक काय म्हणतील? मुलं काय म्हणतील?” हे सगळं त्यांनी कधीच मागे टाकलंय! 😉 जीवन मस्त जगा… आनंद साजरा करा… आणि स्वतःला कधीच कमी लेखू नका! #🙏प्रेरणादायक / सुविचार
See other profiles for amazing content