#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_जानेवारी_१६६४
(शालिवाहन शके १५८५, माघ शु.५)
!! हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या एक मराठी झंजावाती वादळाचा अपघाती अस्त !!
!! ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य,
शिवबा आणि संभाजी त्यांचे फर्जंद महाराजा शहाजी राजे भोसले म्हणजेच
थोरले महाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना
अपघाती निधन झाले.
महाबली शहाजी महाराज यांचा भातवडीचा पराक्रम, त्यानंतर आदिलशाहीवर केलेले आक्रमण, एक वेळा नाहीतर तब्बल तीन वेळा स्वतंत्र होण्याचे प्रयत्न असोत,
त्याच बरोबर प्रतिनिजामशाही स्थापन करत स्वतःकडे राज्यकारभार ठेवण्याचा प्रयत्न, आदिलशाही आणि मोगलांशी दिलेला लढा यावरून सरलष्कर शहाजी महाराज यांचा पराक्रम, संघटन कौशल्य, राजकीय मुस्तद्दीपणा आणि कर्तृत्व हे अतिउच्च पातळीचे होते हे दिसून येते.
१६३६ साली दक्षिणेत गेल्यानंतर स्वतंत्र दरबारातून केलेला कारभार,
बालशिवाजी राजेंच्या शिक्षणाची केलेली व्यवस्था आणि शिवाजी महाराज बेंगलूर येथून परतताना त्यांच्या सोबत दिलेली आपली विश्वासू माणसे,
ध्वज आणि मुद्रा हे पाहता शहाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची कल्पना आपल्याला स्पष्टपणे येऊ शकते.
पराक्रम, युध्दप्रसंगाची बुध्दिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे
शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे, अनंत संकटावर मात करत
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारे स्वराज्य संकल्पक
महाबली महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरू " शहाजीराजे भोसले " यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_जानेवारी_१८९७
#नेताजी_सुभाषचंद्र_बोस_यांचा_जन्म
(मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली,
त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते.
नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता.
नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती.
अश्या या भारताच्या महान क्रांतिकारकाची आज जयंती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩