#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 हे सर्वांचेच असते व प्रत्येकला भोगावेच लागते मग...प्रारब्ध हसत हसत स्वीकारा .....कारण ते मलाच ते भोगायच आहे.....आणि हेच सत्य आहे!
आपण जे काही देवाच म्हणून करीत असतो त्यात दररोज ची पूजाअर्चा, पारायण नामजप, भजन कीर्तन , प्रवचन अस अजून बरच काही व हे सुद्धा करण्या मागे अशी इच्छा असते की , मला कुठल्याही प्रकारचे दुःख होऊ नये.
मला भौतिक सर्वे गोष्टी मिळाव्यात ,पैसा अडका, मान पान, माझ्यावर परमेशवरने कुठलीच संकट आणू नये, मला नेहमी सुखात ठेवावे.
हीच अपेक्षा असते,पण आपल्या प्रारब्ध कर्मा नुसार दुःख हे येतच, त्यावेळी मग ईश्वरा विषयीच मनात विकल्प येतो, माणुस म्हणतो एवढं मी देवाचं करतो तरी माझ्यावर संकट का आली.
परमेश्वर कधीच कुणावर संकट आणीत नसतो , कुणालाही त्रास देत नसतो,कुणाचंही वाईट करीत नसतो. परमेश्वराची सातत्याने निरपेक्ष उपासना करा .किंबहुना आपण त्याचे अनुसंधानात राहा..परमेश्वराचे अभिवचन..योगक्षेम वाहम्याहं..
जो त्याच्या जवळ गेला त्याला त्याच्या सारख करतो म्हणजे , *ईश्वर कसा आनंदी आहे,तो आपल्या भक्ताला फक्त आनंद देत असतो . बाकी काही देत नसतो.
आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडत असते त्याला फक्त आपण जबाबदार असतो दुसरा कोणीही नाही .आपले कर्मच याला जबाबदार आहे हेथां समजा.
आधी ह्या सत्याचा स्वीकार करा.चांगलेच वागा इतरांना मदत करा.आपले दुःख सांगण्यापेक्षा इतरांचे दुःख समजून घ्या.
मान्य करा व त्याला सामोर जा.
ते प्रारब्ध हसत हसत स्वीकारा ,कारण ते मला भोगायच आहे. आणि हे सत्य आहे , म्हणून कधीही दुसऱ्याला दोष देऊ नका.सद्गुरू आपले कल्याण करणार हा दृढ विश्वास ठेवा.🙏🙏💐