सोनम वांगचुक
कुठं चुकले ?
पहिली चूक.
चीनने कुठवर अतिक्रमण करून आपली जमीन हडपली आहे आणि किती भूभागावर बांधकाम केलेली आहेत हे वांगचुक यांनी दाखवून दिलं,त्या विरोधात आवाज उठवला.
चीन अतिक्रमित भागात जाण्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी केल्यावर सरकारने परवानगी नाकारली.
जर एखादा भूभाग ,गाव आपल्या देशाच्या हद्दीत असेल तर तिथं आपल्याला जायला अडचण का असावी ?
राजा नागडा आहे हे वांगचुक यांनी सिद्ध केलं ही पहिली चूक.
दुसरी चूक
मौल्यवान पशमीना लोकर देणाऱ्या मेंढ्या जिथं चरायला जातात ती जमीन मालकांच्या मालकांना सोलर प्लांट लावायला द्यायची आहे.
शेकडो एकरावर सोलर प्लांट लावले तर तापमान वाढेल.
तापमान वाढलं तर आधीच हवामान बदलाने वितळणाऱ्या हिमनद्या आणखी वेगाने वितळून लडाख मधील जनजीवन विस्कळीत होईलच पण संपूर्ण उत्तर भारतावर प्रतिकूल परिणाम होईल.
म्हणून या सोलर प्लांटला वांगचुक विरोध करताहेत.
वांगचुक सुशिक्षित आहेत.
भलेही त्यांनी सोलर तंबू लष्करासाठी बनवला असला तरी एखादं तंत्रज्ञान किती अतिरेकी प्रमाणात वापरायचे की नाही याची जाण त्यांना आहे.
राजा नागडा आहे हे त्यांनी सांगणे आणि राजाच्या मालकाला विरोध करणे हे दोन प्रमाद वांगचुक यांनी केलेत.
#🔴सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक #बनाना रिपब्लिक