खरच बापू देशासाठी
तुम्ही किती केलं
फोटो सहित नाव तुमचं
नोटे वरती आलं
नाही ज्यांच्याकडे त्यांनाच
कळते तुमची किंमत
जपून ठेवायचं तूम्हा म्हणून
बापू होतच नाही हिंमत
घामाच्या प्रत्येक थेंबाचा
हिसाब आमच्या होतो
रात्रंदिवस राबतो तेव्हाच
चेहरा तुमचा दिसतो
खरच बापू नाव तुमचं
किती मोठं हो झालं
खऱ्या अर्थाने बापू आज
महत्त्व तुमचा कळाल #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹