ढग फुटलेल्या आभाळाला
आता थोडे सांगायचे !
परतीच्या पावसाने
आता असते आवरायचे..
आज जाईल उद्या जाईल
म्हणून वाट बघतो !
जात तर नाहीच
उलट तो वाढतो..
सततच्या पावसाने
बळीराजा दुखावला !
त्याच्या स्वप्नावर
नांगरच फिरवला..
परतीच्या पावसा तू
आता जा निघून !
उरल्या सुरल्या पिकांना
ठेव तूच वाचवून.....
#kavita charoli #kavita