ShareChat
click to see wallet page
२७ ऑक्टोबर २०२५ *विचारधारा* मुलांनो, सुप्रभात!😊 आपण सर्वजण एकमेकांशी संवाद साधत असताना क्वचित प्रसंगी दुसऱ्याचे मन दुखावले जाते. कधी बोलण्यातून तर कधी वागण्यातून. अशा वेळेस पटकन माफी मागणे कधीही योग्य. Sorry म्हटले की काम झाले असे नसते. आपल्याकडून झालेली चूक मान्य करून मनातून ती साफ करणे म्हणजे माफी मागणे. माफी मागल्याने फक्त समोरच्या व्यक्तीलाच बरे वाटते असे नाही तर माफी मागणाऱ्याचे मन पण हलके होते. मुलांनो, नुसते तोंडाने माफी मागणे पण मनातून राग किंवा चीड असणे यामुळे मन तसेच गढूळ राहते. मन स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते.म्हणून झालेल्या चुकीची माफी मागून आपण आपल्या मनाची पण स्वच्छता करू. जयहिंद!🇮🇳 _~ सौ. स्नेहलता स. जगताप._ #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹

More like this