#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 ) जायफळ खराब होऊ नये , किंवा त्याला किड लागू नये म्हणून ते रांगोळीच्या डब्यात ठेवावे म्हणजे ते खराबही होत नाही आणि त्याचा वासही टिकून राहतो .2 ) भाजी मध्ये मीठ जास्त पडल्यास एक उकडलेला बटाटा कापून टाकावा 3) पालक पुऱ्या बनवतांना पालकाच्या भाजी सोबत एक वाटी चिरलेली कोथिंबीर वापरावी म्हणजे पुरीला थोडी वेगळी चव येईल .4 ) तेल वा तूप गरम करतांना ते तडतडू नये म्हणून त्यात चिमूटभर मीठ टाकावे , 5) खव्याचे गुलाबजाम करतांना त्यात थोडीशी पीठी साखर मिसळावी म्हणजे गुलाबजाम मऊ होतील 6) अळूच्या वड्या बनवितांना अळूच्या शिरा काढून पानांना आधी तेलाचा हात लावावा मग बेसनाचे मिश्रण लावावे म्हणजे अळूच्या वड्या कुरकुरीत बनतील 7) भाजी बनवितांना पाणी कमी वापरावे , 8 ) भाजीत अधिक झालेले पाणी फेकून देऊ नये कारण त्या पाण्यातही भाजीतील पोषक तत्वे मिसळलेली असतात .9 ) एकदा तयार झालेली भाजी परत परत गरम करू नये ,10) भाजी शक्यतो मोठ्या तुकड्यात कापावी ,11) भाज्यांना अधिक वेळ भिजत ठेऊ नये , 12 ) भाज्या वाफेवर कमी प्रमाणात शिजवाव्यात ,13) फ्रिज मध्ये ठेवलेली शिळी भाजी खाणे शक्यतो टाळावेच . 🥗
