सक्षम ताटे हत्याकांडानंतर कुटुंबांची सुरक्षा वाढवली; आंचल आणि ताटे परिवाराला 24 तास पोलीस संरक्षण
नांदेडतील सक्षम ताटे हत्याकांडानंतर ताटे परिवार आणि आंचल मामीडवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. कुटुंबियांना संभाव्य धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांनी तातडीने संरक्षणाची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना 24 तास सशस्त्र सुरक्षा दिली असून सक्षमच्या घराबाहेर सहा शस्त्रधारी कर्मचारी तैनात केले आहेत., महाराष्ट्र News, Times Now Marathi