MNS PWD Corruption : अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बनंतर मनसेनेही 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत 'हा' घोटाळा केला उघड
सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. पूर्वी कामासाठी निश्चित रक्कम ठरलेली असायची आणि त्या रकमेतून ठराविक टक्केवारी घेतली जायची. मात्र आता परिस्थिती बदलली असून प्रत्येक वेगळ्या कामासाठी स्वतंत्र पैसे मागितले जात असल्याचा दावा त्यांनी केला. विभागातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे कामकाजाची विश्वसनीयता आणि पारदर्शकता धोक्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले., महाराष्ट्र News, Times Now Marathi