याला खरे प्रेम म्हणायचे का?
सध्याच्या आधुनिक काळात अनेक महिला व मुली मोबाईल फोन मध्ये जास्तीत जास्त वेळ सोशल मिडीयावर असतात. आपण बघतो की, काॅलेजला जाणाऱ्या तरूण मुली तर सतत सोशल मिडीयावर असतात. मी तर आमच्याकडे अशा मुलींना पहात आहे की ज्या काॅलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा लगेच मोबाईल फोन काढतात. घराबाहेर पडल्यावर काॅलेजला जाईपर्यंत फोनवर बोलत असतात. येवढेच नाही तर काॅलेज वरून घरी येताना पण बसमधून उतरल्या की मोबाईल फोन सुरू असतो.
आमच्या येथील एक मुलगी काॅलेजला जात असते. येताना व जाताना फोनवर बोलत असते. एक दिवस ती बसमधून उतरली आणी रस्त्याने आमच्या जवळुन जायला लागली. मोबाईल वर बोलत बोलत एकदम हळु चालत जात होती. जवळुन जाताना तीचे बोलणे ऐकु आले की,
बोल ना रे, आता घर जवळ आले आहे. घरी गेल्यावर मला तुझ्यासोबत बोलता यायचे नाही. रागावलास का? ठिक आहे बाबा, उद्या आपण तु म्हणतोस तिकडे जाऊ, प्राॅमीस! पण तु असा बोलायचे बंद नको होऊस.
सर्वच काॅलेजला जाणाऱ्या मुली मोबाईलचा असा उपयोग करत असतील असेही नाही पण ते प्रमाण वाढलेले आहे. येवढे मात्र खरे. आता लग्न झालेल्या महिलांच्या बद्दल!
अनेक महिला सोशल मिडीयावर फेसबुक, व्हाॅटसएप वर असतात. फेसबुकवर तर फेसबुक अकाऊंट वरील मुली व महिलांचे फोटो पाहून अनेक जण त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात.
एक घटना
एकाने फेसबुक वरील फोटो पाहून एका महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तीने पण त्या अनोळखी मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. कारण तो मुलगा दिसायला खुप सुंदर होता.
रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याने तीला मेसेज पाठवला की,
फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद.
तीने मेसेज पाठवला- तुमचे ही आभार. डिपी मस्त आहे तुमचा. छान दिसता तुम्ही.
तो- तुमचा पण डिपी खुप सुंदर आहे. मला खूप आवडला. मी फेसबुकवर खुप स्त्रियांचे डिपी पाहीले. पण तुमच्या इतका सुंदर डिपी मी कुठेच नाही पाहिला. खुपच छान दिसता तुम्ही.
झाले. त्या सुंदर दिसणाऱ्या तरूण मुलाने एका लग्न झालेल्या दोन मुलांच्या आईचे येवढे कौतुक केल्यानंतर ती हरभऱ्याच्या झाडावर चढली नाही तरच नवल!
ती- हो का धन्यवाद! तुमच्यासोबत बोलुन छान वाटले. खूप चांगले आहात तुम्ही.
मग नंतर नवरा ऑफीसला गेला की, ती फेसबुक ओपन करून त्याच्यासोबत बोलु लागली. काही दिवस सभ्य व मोजकेच संभाषण नंतर हळुहळु मैत्रीचे बोलणे.
ती- तुमचे लग्न झालेय का?
तो- नाही अजून, मी सिंगल आहे.
ती- कोणतरी मैत्रीण असेलच ना?
तो- नाही अजून, तशी मैत्री करण्यासारखी कोणी भेटलीच नाही. प्रेयसी पण नाही.
तो- तुमच्या घरी कोण कोण असते?
ती- मी, नवरा, सासु सासरे आणी दोन मुले.
काही दिवसांनी ते मित्र बनल्यानंतर एकमेकांना अरेतुरे करतात. एक दिवस
तो- हाय डिअर कशी आहेस?
ती- छान आणी तु कसा आहेस?
तो- आहे ठिक, वाट बघत असतो की तु कधी फेसबुक वर येशील याची.
ती- हो का?
तो- तु येवढी दिसायला सुंदर आहेस म्हटल्यावर तुझा नवरा तुझ्यावर खुप प्रेम करत असेल ना?
ती- हं.
तो- का काय झाले? तु गप्प का? मला नाही सांगणार का? आपण मित्र आहोत ना? ठिक आहे. साॅरी तुझे पर्सनल विषय तुला माझ्यासोबत शेअर करायचे नसतील तर नको करू.
काही दिवसांनंतर ती स्वतःच फेसबुकवर त्याला आपली कहाणी सांगते की,
कशा प्रकारे तीचे लग्न झाले. आईवडील गरीब असल्याने सुंदर असुनही कसा नवरा मिळाला. नवरा प्रेम करत नाही. संशय घेतो. नवरा जास्त कमवत नाही. थोड्या पैशात कसे मन मारून रहावे लागते.
तो- तीची सर्व कहाणी शांतपणे ऐकतो.
त्यानंतर एक दिवस
तो- हाय डिअर, कशी आहेस?
ती- आहे ठिक.
तो- एक बोलु तुला?
ती- बोल.
तो- तु मला खूप आवडतेस. आय लव्ह यु!
ती- तुझे डोके फिरलेय काय? मी मॅरीड आहे. मला दोन मुले आहेत. असे म्हणुन ती फेसबुक बंद करते.
सात आठ दिवस तो तीला फेसबुक वर दिसत नाही. ती सतत त्याचा विचार करत असते. नकळत तीच्या मनात विचार येतो की, आपण त्याच्यासोबत येवढे तोडून बोलायला नको होते. काय वाईट बोलला तो? प्रेम आहे येवढेच म्हणाला तो आपल्याला. आपले लग्न झालेले असुनही तो आपल्याला आय लव्ह यु म्हणाला. इकडे नवऱ्याला साधा एक शब्द पण प्रेमाने बोलता येत नाही. आपण विवाहित असुनही तो प्रेम आहे असे बोलला.
विचार करून ती फेसबुक ओपन करून त्याला मेसेज पाठवते की, हाय डिअर, रागावलास का माझ्यावर, साॅरी.
मग सुरू होते फेसबुक वरील प्रेमाची कहाणी!
पुढे काय काय झाले असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता.
अनेक लग्न झालेल्या महिला फेसबुक मुळे तरूण मुलांच्या प्रेमात पडून नवरा, मुले व संसार सोडून पळुन गेलेल्या आपण वाचतो. अनेक महिला प्रेमातुन नाही नको म्हणत अनैतिक संबंधाकडे कधी व कशा वळतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही. यातुनच मग अनेक समस्या निर्माण होतात. कधी नवऱ्याला समजते. नवरा सोडून देतो तर कधी तो फेसबुक वर प्रेम करणारा फसवतो. इमोशनल ब्लॅकमेल करून भेटायला बोलावतो. मग अनैतिक संबंध! त्याचे गुपचूप काढलेले फोटो किंवा व्हिडिओ! नंतर ब्लॅकमेलिंग सुरू होते. पैसा व शरीर दोन्हींची सतत मागणी केली जाते.
अशा समस्या निर्माण झाल्यानंतर मात्र मागे परत फिरायला किंवा ही फेसबुक वरील मैत्री संपवायला मार्ग/ पर्याय शिल्लक रहात नाही. समोरच्या पुरूषाच्या हातातील बाहुली कधी व कशी बनते तेच समजत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
महिला व मुली या आपले वेगवेगळे फोटो फेसबुक वर का अपलोड करत असतात?
फोटो पाहून अश्लील किंवा कौतुक करणाऱ्या अनोळखी पुरूषांच्या कमेंट्स आल्या तर त्या कमेंट्सला रिप्लाय का देत असतात?
आपला फोटो पाहून फेसबुक वर अनोळखी पुरुषांकडून जास्तीत जास्त कमेंट्स याव्यात असे मनापासून मुली व महिलांना का वाटते?
अशा कमेंट्स आल्या की मनापासून आनंद का होतो?
सोशल मिडीयावर अनोळखी पुरूषासोबत बोलणे, मैत्री करणे त्याबरोबरच त्याला आपल्या वैयक्तिक समस्या, घरचे प्राॅब्लेम शेअर करणे कितपत योग्य आहे?
वैयक्तिक समस्या किंवा घरातील प्राॅब्लेम हे आपले आपण स्वतःच सोडवु शकत नाही काय?
एखाद्या बाहेरच्या पुरूषाला आपल्या समस्या/ प्राॅब्लेम शेअर केले तर त्याचा तो गैरफायदा घेऊ शकतो. मदत करण्याच्या बहाण्याने इमोशनल ब्लॅकमेल करू शकतो. समस्या/ प्राॅब्लेम सोडवण्यासाठी चुकीचा मार्ग सांगु शकतो. आणी आपण एका दुसर्याच मोठ्या समस्येमध्ये अडकु शकतो.
हे विचार या मुलींच्या/ लग्न झालेल्या महिलांच्या डोक्यात का येत नाहीत? त्यांना समजत का नाही? त्या कायम सावध राहून अनोळखी पुरूषासोबत ओळख वाढवण्यापासुन स्वतःला वाचवत का नाहीत? #मुली #देसी मुली #राज्यातून 3000 आधिक मुली बेपत्ता #❤❤❤मुला मुलींच्या गप्पा❤❤❤ #मुली

