पत्रास कारण की...
एक काळ होता ना..आपण पत्र लिहायचो..
मोबाईल नव्हता तेंव्हा..पत्रानेच खुशाली कळायची..
पाठवलं ते एकदा की..काही दिवस लागायचे..
मग उत्तर यायचं आपल्याला..अनेक उत्तर मिळायची..
पत्रास कारण की..||
पत्रास कारण की..अशी त्याची सुरुवात असायची..
त्यात तब्बेत भांडण काळजी..चौकशी व्हायची..
अगदी सविस्तर लिहीत असू..शब्दात भावना मांडून..
अन पोस्टमन काकांची..डोळे लावून वाट पाहायची..
पत्रास कारण की..||
बहीण जायची नांदायला..किंवा लेक सासरी..
कधी बायकोही माहेरी..रुसून जायची..
चार दिवस वाट पाहून..मग पत्र उपयोगी पडायची..
घाई मिरवायची..अन तीला परत आणायची..
पत्रास कारण की..||
मुलगा शिकायला जेंव्हा..बाहेरगावी असायचा...
कोणी देशसेवेसाठी तेंव्हा..सीमेवरती जायचा..
आई बाप जेंव्हा काळजीत..पत्र यायचं उपयोगी..
एक आनंद अन समाधान..याच पत्रात असायचा..
पत्रास कारण की..||
आधुनिक जग झालं..पत्र लुप्त झाली दिसत नाही..
मोबाईल आला तस..लोक जवळ आली मन दुरावली..
झटक्यात होत सगळं..सहज अस उपलब्ध..
पण ती बात च और होती..वाटत ओढ हिरावली..||
होय..आम्ही तो काळ पाहिलाय..अभिमान आहे..
उगीच म्हणत नाहीत..जुन ते सोन..
जगलोय आम्ही ते दिवस..अन त्या आठवणी..
पूर्वीच जग अन जीवन म्हणजे..लाखमोलाच सोन..
पत्रास कारण की...|| #जुन ते सोन #जुन ते सोन😍☺️✨💯 #जुन ते सोन #जुन ते सोन #जुन ते सोन...love
![जुन ते सोन - 34/[n3ಹ4ooLKUI 2424 06 अन्तर्देशीयःपत् कार्ड ٣٥٧ ٥ ٥٨٥ 00 9!!] VMIDIE` িন PIN 8 g ಗ೯ TIRD Foto i 9J 192 1939 डन पत्र के भीता फुछ न रतिए NO ENCLOSURES ALLOWED ೫೧ # 61 m13 ೯ನ WRITE PIN CODE IM ADDRESS रमफ कानाम आरपता : SENDERS NAhEANDADDREss F PIN 34/[n3ಹ4ooLKUI 2424 06 अन्तर्देशीयःपत् कार्ड ٣٥٧ ٥ ٥٨٥ 00 9!!] VMIDIE` িন PIN 8 g ಗ೯ TIRD Foto i 9J 192 1939 डन पत्र के भीता फुछ न रतिए NO ENCLOSURES ALLOWED ೫೧ # 61 m13 ೯ನ WRITE PIN CODE IM ADDRESS रमफ कानाम आरपता : SENDERS NAhEANDADDREss F PIN - ShareChat जुन ते सोन - 34/[n3ಹ4ooLKUI 2424 06 अन्तर्देशीयःपत् कार्ड ٣٥٧ ٥ ٥٨٥ 00 9!!] VMIDIE` িন PIN 8 g ಗ೯ TIRD Foto i 9J 192 1939 डन पत्र के भीता फुछ न रतिए NO ENCLOSURES ALLOWED ೫೧ # 61 m13 ೯ನ WRITE PIN CODE IM ADDRESS रमफ कानाम आरपता : SENDERS NAhEANDADDREss F PIN 34/[n3ಹ4ooLKUI 2424 06 अन्तर्देशीयःपत् कार्ड ٣٥٧ ٥ ٥٨٥ 00 9!!] VMIDIE` িন PIN 8 g ಗ೯ TIRD Foto i 9J 192 1939 डन पत्र के भीता फुछ न रतिए NO ENCLOSURES ALLOWED ೫೧ # 61 m13 ೯ನ WRITE PIN CODE IM ADDRESS रमफ कानाम आरपता : SENDERS NAhEANDADDREss F PIN - ShareChat](https://cdn-img.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_139705_3a7b9b04_1749137136859_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=859_sc.jpg)