ShareChat
click to see wallet page
*पाठवणीच्या वेळी नववधूने लग्नाला दिला नकार !!* लग्न पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला होता. नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली, मग ती आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती. नवरदेव अविनाश आपला मित्र विकाससोबत गप्पा मारत होता. विकास म्हणाला, "यार अविनाश, एक काम कर… घरी पोचताक्षणी 'अमृतबाग' हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू… इथे तुझ्या लग्नात काही मजा आली नाही जेवणात." तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हटला, " पनीरची भाजी पण काही खास नव्हती…आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता. खूपच पांचट जेवण होते रे " आणि मोठ्याने हसायला लागला. अविनाशही हसत म्हणाला – "जाऊ आपण अमृतबागला, जे पाहिजे ते खा… इथे काही चवच नव्हती… पुऱ्यापण गरम नव्हत्या." मामा व मावस भाऊ, मावस बहिणी म्हणाल्या की आपण झोमॅटो वरून काहीतरी इथे चटपट मागून घेऊ. हे सगळं ऐकून, नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की ती अचानक मागे वळली, डोईवरचा पदर काढून कंबरेला खोवत तडक वडिलांकडे आली आणि त्यांचा हात हातात घेत म्हणाली, "मी या लग्नाला नकार देते बाबा… माझं हे लग्न मला मान्य नाही!" सगळे थक्क झाले… नेहाच्या सासरच्यांना तर धक्काच बसला… कोणालाच काही कळेनासे झाले.. सगळे तिच्याजवळ जमले. सासरे श्यामराव पुढे आले. "अगं सुनबाई, असं झालं तरी काय ? लग्न पार पडलं आहे… आता अचानक का नाही म्हणतेस?" अविनाशही धावत आला, त्याचे मित्र, भावंडं सर्वजण… नेहा सासऱ्यांना म्हणाली, "मामंजी, माझ्या आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून माझं शिक्षण, माझं भविष्य घडवलं… वडिलांनी किती रात्रंदिवस जागून या लग्नासाठी तयारी केली… आईनं नवीन साडीही घेतली नाही, दुसऱ्याची साडी घालून लग्नात उभी आहे… वडील १५० रुपयांचा शर्ट घालून उभे आहेत… त्या शर्टच्या आत शंभर भोकं असलेलं बनियन आहे! आणि माझ्या नवऱ्याला पुऱ्या थंड वाटल्या?? त्याच्या मित्राला पनीर आवडलं नाही?? दिराला रसगुल्ला फिक्का वाटला?? ही फक्त अन्नावर टीका नाही, माझ्या वडिलांच्या त्यागावर, मेहनतीवर आणि इज्जतीवर चिखलफेक आहे… हे जेवण कॅटररनं बनवलंय. माझ्या वडिलांनी नाही... पण त्यांच्या मनानं, मनगटानं, त्यागानं ते अन्न बनलंय… आणि त्या अन्नाची निंदा करणं म्हणजे माझ्या वडिलांचा अपमान करणं." वडिल म्हणाले – "बाळा, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी…?" नेहा म्हणाली – "ही छोटी गोष्ट नाही बाबा… माझ्या पतीच्या नजरेत जर माझ्या पित्याचा मान नाही, तर मला असा संसार नको… माझ्यात तुमचं सर्वस्व आहे, हे ज्यांना दिसत नाहीत, त्यांच्याशी माझं नातं मी जोडणार नाही." इतकं बोलल्यावर सगळे शांत झाले… अविनाश पुढे आला, हात जोडले सासऱ्यांपुढे, "माफ करा बाबा… माझी चूक झाली… मी अज्ञानीपणानं बोललो…" श्यामराव पुढे आले, डोळ्यात पाणी होतं "बेटा, मी सुन घेऊन जायचो म्हणत होतो, पण मला मुलगी मिळाली… माझं नशीब की ईश्वराने तुला माझी कन्या बनवली… माफ कर मला… मला पूर्ण खात्री आहे की तू माझं घर उजळवशील." नेहाने त्यांच्या पायाला स्पर्श् केला… " मामंजी …" ते म्हणाले – "नाही, आता फक्त 'बाबा' म्हण." दोघेही भारावून गेले... शंकरराव अभिमानानं पाहत होते… आपली कन्या आज खऱ्या अर्थाने मोठी झाली होती... आता नेहा सासरी रवाना झाली… मागे राहिलं फक्त तिचं घराभोवतीचं रिकामं झालेलं अंगण, आई-बाबांचे अश्रूंनी भरलेले डोळे… आणि एक मोठा संदेश.... "जेव्हा आपण कुणाच्या मुलीच्या लग्नाला जाऊ, तेव्हा भाजी बेचव, पुऱ्या थंड , रसगुल्ला कोरडा वाटल्यासारखी टीका करू नका… कारण त्या अन्नासाठी एका वडिलांनी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो, त्या जेवणाला बनायला केवळ २ तास लागले असतील, पण त्या अन्नामागे मुलीच्या पित्याचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो… *"लेक" ही परकं धन नसते,* *ती आई-वडिलांची शान असते.* जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल, तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा… लेकीचा मान ठेवा... एका वडिलाच्या स्वप्नांचा आदर ठेवा.. #मुलगी #मुलगी #मुलगी झाली हो साजिरी #बाप आणि मुलगी #बाप आणि मुलगी👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👦
मुलगी - R@ज R@ज - ShareChat

More like this