⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १ जानेवारी इ.स.१३९९
शके १३२१ च्या पौष व. ९ रोजी तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणे रक्तपात करून आपल्या मायदेशी गेला.
दिल्ली शहर हस्तगत झाल्याबरोबर तैमूरच्या सैन्यांत विजयोत्सव सुरू झाले. पकड, लूट, मारहाण या प्रकारांना ऊत आला. पंधरा दिवसपर्यंत तैमूरलंगाचा मुक्काम दिल्लीस होता. भारतांतील कलाकौशल्यावर तो फार खुष होता. कित्येक कारागीर त्याने स्वतःबरोबर धेतले. जाता जाता ही त्याने पुष्कळच अनन्वित प्रकार केले. मिरत शहरी त्याच्या सैन्याची थट्टा कोणी केली म्हणून त्यानें सर्वोची कत्तल केली. आग्नि व तरवार यांच्या साह्याने तैमूरचा तुफानी प्रचार होत होता. हरद्वार येथे आल्यावर त्यास समजलें कीं, गोमुखांतून गंगा पडते. या 'पारवंडीपणा 'वर तो खूपच संतापला आणि त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारांना कडक शासन भोगावे लागले. लक्षावधि लोकांना त्याने मृत्यु- लोकांत पाठविले.
मनुष्यजातीचे महान् शत्रु म्हणून इतिहासांत जे नांवाजलेले आहेत त्यांच्यांत तैमूरची गणाना केली जाते. तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडावून मागणी करीत असे. नंतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी. सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी. अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान् असतील तर तो त्यांना निवडून दूर करी. इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिरांचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यांत येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे एकशेवीस झाले होते. केव्हां केव्हा जिवंत माणसांना चुन्याने व विटांनी चिणून त्यांचा तट बांधण्याचे काम तैमूरचे कुशल कारागीर करीत."
हिंदुस्थानांत मुंगली जुलभास व्यवस्थितपणे सुरुवात तैमूरनेच केली. त्याच्या नांवाने बादशाहीहि चालू होती. तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नांवानें खुत्बा वाचण्यांत येत असे. तैमूरलंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी क्षोभच भारतीय लोक समजत असत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६६२
पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.
(मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/JGULDVH_rrc?si=eHkIrwSvN1834Z31
📜 १ जानेवारी इ.स.१६६५
(पौष वद्य दशमी शके १५८६ संवत्सर क्रोधी वार रविवार)
महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामी!
डिसेंबर इ. स. १६६४, रोजीच्या शेवटच्या आठवड्यात महाराजांनी डचांची वेंगुर्ल्याची वखार साफ लुटली. मात्र याच काळात धुमकेतू दर्शनामुळे जनमानसात खळबळ माजली होती, त्या पाठोपाठ येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराजांनी आपली इतर कामे बाजूला सारून ग्रहण निवारणार्थ पर्वणी साधण्यासाठी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे आले. सूर्यग्रहणाच्या या पर्वावर महाराजांनी मनोमन माँसाहेब जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला करण्याचे ठरविले. या सगळ्याची आवश्यक ती तयारी करण्यासाठी महाराज महाबळेश्वर येथे मुक्कामी आले. याच काळात महाराजांनी पुढे ग्रहणानिमित्त पर्वणी साधून सुवर्णतुलेचा योग घडवून आणला.
📜 १ जानेवारी इ.स.१६७५
इ.स. १६७३ मध्ये महाराजांनी कर्नाटकातील हुबळी येथे घातलेल्या छाप्यात इंग्रजांचीही वखार लुटली गेली. यात इंग्रजांचे सुमारे पाऊण लाख रुपयांचे नुकसान झाले. हुबळी आणि राजापूर इथल्या लुटीची नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर ऑनजिअर याने महाराजांकडे पुष्कळवेळा आर्जव केले. पण महाराजांनी ते मान्य केले नाही. मे १६७३ मध्ये मुंबईहून टॉमस निकल्स नावाचा वकील महाराजांना भेटायला रायगडावर आला, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. निकल्स हात हलवत परत फिरला. पुढे इ.स. १६७४ च्या ४ एप्रिलला मुंबईहूनच हेन्री ऑक्झेंडन हा वकील महाराजांच्या भेटीसाठी आला. त्याने बरोबर येताना वीस कलमी मसुदा तयार करून आणला होता. त्यात बाकीची सर्व कलमे ही व्यापारविषयक होती. पण शेवटचे कलम होते, ते म्हणजे मराठ्यांच्या राज्यात इंग्रजांची (कंपनीची) नाणी चालावीत. पण महाराजांनी नेमके हेच कलम रद्द करून बाकीची कलमे मान्य केली. यावेळेस मराठे आणि इंग्रज यांच्यात समझोता झाला असतानाही दि. १ जानेवारी १६७५ रोजी खुद्द महाराजांच्या फौजेने व-हाड-खानदेशातील मोगलांवरील स्वारीच्या वेळी इंग्रजांची धरणगावास असणारी वखार लुटली. याची चौकशी करण्याकरता, खरंतर जाब विचारण्याकरता आणि नुकसानभरपाईसाठी इंग्रजांचा ऑस्टिन नावाचा माणूस रायगडावर आला. पण महाराजांनी त्याला स्पष्टपणे सांगितले, 'आम्ही शत्रूच्या मुलुखात युद्ध करीत असता, कोणाचेही नुकसान झाले तरी ते भरून देण्यास आम्ही बांधील नाही!' बिचारा ऑस्टिन मुकाट्याने परत फिरला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६८१
इंग्रजांच्या आश्रयाने मराठी मूलखाला त्रास देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी आपला वकील मुंबईला पाठवला.संभाजीराजेंचे वकील आवजी पंडित यांनी इंग्रजांना सांगितले की शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे इंग्रजानी जर सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांशी युद्ध पुकारतील. आवजी पंडित मुंबईत आल्याचे पाहून मराठ्यांच्या आरमाराला तोंड द्यायची तयारी नसल्याने सिद्दीने आपले आरमार बंदराच्या बाहेर नांगरले. त्यानंतर शंभुराजेंच्या आणि पर्यायाने मराठ्यांच्या सामर्थ्याची पुरेपुर माहिती व परिणामांची त्यांना असलेली भीती इंग्रजानी पत्र पाठवून लंडनला कळवली होती. "संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री राखण्यासाठी तयार असले तरी ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीचा मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालू राहिली तर संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी डिचोलीच्या सुभेदाराची बदली केली आणि शिवाजी फडनाइकांची नेमणूक केली. ही बातमी समजल्यावर विजरई येसाजी गंभिरराव यांस कळवितो की, "आमचे या दोन्ही राज्यांत सलोखा निर्माण व्हावा ही तळमळीची इच्छा आहे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१६८३
शके १६०४ च्या पौष शु. १३ रोजी समर्थपंचायतनांतील प्रसिद्ध सत्पुरुष भागानगरकर केशवस्वामी हे समाधिस्थ झाले !
महाराष्ट्रातील संतांत तीन पंचायतने प्रसिद्ध आहेत. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व चांगदेव हे ज्ञानेश्वर-पंचायतन, एकाजनार्दन, रामजनार्दन, जनी- जनार्दन, विठा रेणुकानंद व दासोपंत हे एकनाथ -पंचायतन व रामदास, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, केशव स्वामी व आनंदमूर्ति हे रामदास-पंचायतन. या शेवटच्या पंचायतनांतील केशव स्वामी खेरीज इतर सर्व संत प्रांतांत शेजारी शेजारी राहत असत. त्यामुळे त्यांच्या वारंवार गांठी-भेटी होत असत परंतु केशव स्वामींचे वास्तव्य मात्र हैद्राबादेस असे. केशव स्वामी मूळचे कल्याणीचे. आत्मारामपंत कुलकर्णी व गंगाबाई या सच्छील दांपत्याच्या पोटी केशवस्वामींचा जन्म झाला. असे सांगतात की, केशवस्वामी वयाच्या पांचव्या वर्षापर्यंत बोलतच नव्हते. परंतु पुढे श्रीमत् आचार्य यांच्या कृपेवरून केशवस्वामी बोलूं लागले. संमर्थीप्रमाणें यांना ही गाण्याची अत्यंत आवड होती. केशवस्वामी ' स्वामी असले तरी प्रपंची होते. ते व त्यांची पत्नी नेहमी भगवभक्तीत दंग असत. जनतेत धर्मश्रद्धा निर्माण' करण्यासाठी, हे स्वतः कविता रचून कर्तिने करीत असत. त्यांच्या पद्यांतून वरवर शृंगाराची छटा असे. गीतगोविंदकतें जयदेव कवि यांचेच अवतार म्हणून ही लोक यांना समजत. यांच्या काव्याबद्दल राजा- राम प्रासादी भक्तमंजरीमालेत म्हणतात.
"जगत्रं जाली कीर्ति । धन्य कृपाळु केशवमूर्ती ॥
उद्घारावया यया जगतीं । जयदेव कवि अवतरला ॥
पूर्वी शृंगार देवाचा । वर्णितां लाचावली वाचा ।
तोचि अभ्यास पडता साचा । अनुकार कवनाचा तोचि पै ॥
अध्यात्मयुक्त शृंगारिक । भाषण जयाचें नेमक ।
जाहलें काव्य तेंचि चोख । प्रासादिक सकल जनां ।
" केशवस्वामींची कविता श्री. नरहरशास्त्री स्वरशीकर यांनी प्रसिद्ध केली आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१७०१
परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळविला. येथे बादशहाने आपल्या शहाजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास पाठविले. त्यांनी त्याप्रमाणे केले व त्यामुळे त्यास व त्यांचे घोड्यांस भरपूर दाणागोटा मिळाल्यामुळे ते आनंदित झाले. बादशहा ३० ऑगस्ट १७०० ला खवासपुरी येथे जाऊन राहिला. तेथे असताना माण नदीस अचानक मोठा पूर आल्याने चार-पाच हजार लोक, हत्ती, घोडे, वगैरे वाहून गेले व लष्कराचे फार नुकसान झाले. नंतर १६ डिसेंबर १७०० ला बादशहाने मिरजेस जाण्यासाठी आपला तळ हालविला व १ जानेवारी १७०१ ला बादशाही सैन्य मिरजेस आले. त्यानंतर तो २ महिने तिथेच मुक्काम ठोकून राहिला. त्या मुदतीत त्याने पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरविले. त्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील ताज्या दमाची फौज व सामानसुमान मिरजेस येऊन पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१८१८
कोरेगाव भिमाची लढाई
ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 १ जानेवारी इ.स.१८४८
महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झालेतरी अंगावर दगडी पडतात. सगळ्यात या दगडी खाण्याची हिम्मत असतेच असे नाही, मनात खूप असते ओ पण समाज काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातचं विरून जातात. पण क्रांतीज्योती कधीच डगमगली नाही, नावाप्रमाणेचं महात्मा जोतीबा फूलेंनी अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी सुरवात केली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀


![📜इतिहास शिवरायांचा - The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors - ShareChat 📜इतिहास शिवरायांचा - The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors The Great Maratha Warriors] Iu GuIIl ` 444=9!0 YSHESHEREATED B1 Bois P4 The Vaxrid Ked $ शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६५ 9 छत्रपती शिवाजी महाराज सहपरिवार महाबळेश्वर येथे मुक्कामास आले. theqreat maratho uarriors the great marathawarriors the qreat marathauarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_890677_13f34621_1767230882629_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=629_sc.jpg)