सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १ डिसेंबर इ.स.१६६१ छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/8qlDkcbXDPo?feature=share 📜 १ डिसेंबर इ.स.१६६३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला शाहिस्तेखान शिवछत्रपतींच्या भीतीने बंगालकडे रवाना...!! छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथील लाल महालात मुक्कामी असलेल्या शाहिस्तेखानावर योजकतेने हल्ला चढविला. पळून जाताना त्याची बोटे छाटली गेली. खानास त्यामुळे कायमची आठवण राहिली, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. निवडक सैन्याच्या साहाय्याने मावळे लाल महालात घुसले आणि त्यांच्या नियोजनबद्ध कृतीने शाहिस्तेखानास जरब बसली. शाहिस्तेखानाचे सैन्य बळ आणि त्याची ताकत पाहता, हे आव्हान महाराजांनी स्वीकारले आणि त्यामध्ये अपूर्व विजय संपादन करण्याचा विक्रम केला. नियोजन, व्यवस्थापन आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. एप्रिल १६६३ मधील लाल महालावरील हल्ल्याच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत २०० निवडक मावळे होते. लग्नाच्या वर्‍हाडासोबत हे मावळे पुणे शहरात घुसले. शाहिस्तेखानाचा अंगठा व बोटे कापली गेली. त्याचा मुलगा व जावई त्यात दगावला ह्याचा तर दुःख सागर त्याच्या मनात होताच पण शिवछत्रपती पुन्हा त्याला ठार करायला येतील म्हणून त्याने तडक छत्रपती संभाजी नगर म्हणजेच खडसी (औरंगाबाद ) कडे पळून गेला त्याच्या ह्या डरपोक पनास बघून शेवटी औरंग्याने शाहिस्तेखानाची बंगालला बदली केली, त्याची नामुष्की झाली. शिवचरित्रातील हा प्रसंग उत्कृष्ट नियोजन व नेतृत्व गुणाचा प्रत्यय आणून देणारा आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १ डिसेंबर इ.स.१६७५ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीमध्ये छत्रपती शिवराय अजिंक्यतारावर आजारी पडले होते. त्यावेळी तब्बल दोन महिने त्यांनी येथे विश्रांती घेतली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ डिसेंबर इ.स.१६८३ (मार्गशीर्ष वद्य अष्टमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार शनिवार) छत्रपती संभाजी महाराजांची सालशेतला धडक पोर्तुगिजांचे धिंडवडे काढले. पोर्तुगिजांचे धर्मांधतेचे वेड फारच वाढले होते. त्याबरोबर स्त्रियांवरचे अत्याचार ननरीज व मोनेस्टीजमध्ये पोर्तुगिजांचा अत्याचार महाभयानक असाच होता. छत्रपती संभाजी महाराजांची एक तुकडी सालशेतमध्ये घुसली तर दुसरी बारदेश वर चालून गेली. मुळात छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य या भागात नवीन त्यात पोर्तुगिजांचा तोफखाना चांगला. शिवाय मजबूत अशी शिबंदी असूनही मराठी सैन्य तटाला भगदाड पाडून घोडदळासकट आत शिरून पोर्तुगिजांना पळवून लावले. पोर्तुगीज सैनिकांची यथेच्छ पिटाई करीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने १० दिवसाच्या प्रयत्नानंतर थिव्हीमचा किल्ला घेतला. इतर दोन किल्ले पोर्तुगीज सैन्य न लढल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात आले! पुढील २ ते ३ दिवसांत चापोरा गड देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात गेला. या चारही गडावरील अत्याचारी १४० पोर्तुगीज फादर्सना मराठी सैन्याने त्याच्या अंगावरील झगे काढून हात मागे बांधून उघड्या पाठीवर कोरडे काढत जेवढी करता येईल तेवढी मानखंडना करून कैदेत ठेवले. महाराजांनी साधारणततः महिण्याभरात सालशत व बारदेश प्रांत लुटून जाळून फस्त केला. या संबंध धामधुमीत छत्रपती संभाजी इतकी दहशत निर्माण केली की या संपूर्ण कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यापुढे उभे राहण्यासही कोणी धजावला नाही. सोबत बारदेशच्या किल्ल्यांतून तब्बल ४६ तोफा छत्रपती संभाजी महाराजांनी नेल्या! 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १ डिसेंबर इ.स.१६९७ संताजींच्या मृत्यूनंतर झुल्फिकार खानाच्या सैन्याने इ. स. १६९७ व्या पावसाळ्यात जिंजीस वेढा घातला. यावेळी राजाराम महाराजांकडे सैन्य नव्हते म्हणून रामचंद्रपंतास धनाजींस सैन्यासह ताबडतोब पाठविण्यास लिहिले. नंतर आणखी आणीबाणीची पत्रे पाठविली. परंतु महाराष्ट्रातून सैन्य लवकर येण्याची शक्यता न वाटल्यामुळे राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाबरोबर तहाचे बोलणे लाविले. बोलणी करण्यासाठी आपला दासीपुत्र कर्ण यांस कारकुनासह वांदिवाशला रवाना केले. २ ऑगस्ट १६९७ रोजी राजा कर्ण व कारकून मंडळी बांदिवाशला गेली. त्यांचे बोलणे ऐकून घेऊन झुल्फिकार खानाने ते बादशहास कळविले. ह्या बोलण्यात राजाराम महाराज मोगलांचे स्वामित्व पत्करण्यास तयार असून त्याप्रमाणे तह घडून यावा असा आशय त्यांत होता. परंतु औरंगजेबाने तहास मान्यता न देता जींजी काबीज करण्याचाच कडक आदेश दिला. तेव्हा झुल्फिकार खानाने कर्ण यांस परत पाठविले. यानंतर ८ नोव्हेंबर १६९७ त झुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा कडक केला. किल्ल्याभोवती ठाणी बसवून ती सरदारांत वाटून दिली. दाऊदखान चिखली दुर्गाच्या पायथ्याशी ठाणी बसवून होता. त्याने धाडसाने चमार टेकडीवर हल्ला चढविला आणि एका रात्रीत त्याने किल्ला जिंकून घेतला. झुल्फिकार खानाने मनात आणले असते तर तो जिंजीला ज्या दिवशी पोचला त्याचदिवशी तो किल्ला हस्तगत करू शकला असता पण राजारामास सुखरूपपणे जिंजीहून पळून जाण्यासाठी त्याने मुद्दाम मोहीम लांबविली. राजाराम महाराजांपाशी युद्धसामग्री पुरेशी नव्हती. चमार टेकडी हातची गेली होती हे सर्व पाहून राजाराम महाराज घाबरले. त्यांनी खंडोबल्लाळ यांजला खानाकडे बोलणी करण्यास पाठविले. आपण कोणत्या बाजूने हल्ले करणार, तुम्हास बाहेर निघून जाण्यास कोणीकडुन कशी संधी ठेविली आहे इत्यादी प्रकार खानाने खंडोबल्लाळ मार्फत राजाराम महाराजांस कळविले. खानाच्या सैन्यांत गणोजी शिर्क सरदार होते. त्यांजला खंडोबल्लाळ भेटले आणि छत्रपतींच्या आणि त्याच्या कुटुंबीयांचा बचाव करण्याविषयी त्यांस त्यांनी गळ घातली. गणोजी शिर्के यांना दाभोळीच्या देशमुखीचे वतन हवे होते ते राजाराम महाराजांनी खंडोबल्लाळास दिले होते.खडोजींनी ते वतन लगेच गणोजींच्या हवाली करण्याचे कबुल केले आणि छत्रपतीकडून त्याच्या लेखी सनदा लिहून घेऊन शिरक्यांच्या हवाली करण्याचे कबूल केले. नंतर शिर्के यांनी राजाराम महाराजांस बुरख्याच्या पालखीत बसवून आपल्या आप्तांच्या बायका असे सांगून स्वतःच्या गोटांत आणिले. दुसरे दिवशी शिकारीचे निमित्त सांगून शिर्के राजाराम महाराजांस बरोबर घेऊन बाहेर पडले. जवळच धनाजींची फौज आली होती, तिच्या हवाली राजाराम महाराजांस केले तेथून राजाराम महाराज वेलोरास दि. १ डिसेंबर १६९७ रोजी गेले. वेलोरचा किल्ला मराठयांच्या ताब्यात होता. मानाजी मोरे नावाच्या किल्लेदाराने राजाराम महाराजांची सर्व व्यवस्था नीट ठेवली. अशा रीतीने राजाराम महाराजांची सुटका करवून झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी मैत्री जोडण्यात त्याचा अंतिम हेतू बादशहाच्या मृत्यूनंतर गोवळकोंड्याचे राज्य घ्यावयाचे व राजाराम महाराजांस विजापूरचे राज्य द्यावयाचे हा होता किंवा काय हे समजण्यास पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - gie RA THAl WABRI 0 R S నన C R 34 1 [9ldidoicoio १ डिसेंबर इःस. १६६३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला मुघल सरदार शाहिस्तेखान महाराजांच्या भीतीने बंगालकडे रवाना... Iprenlnnmn uauurrlou: Iranrrvlmomibauirrlora I ಚrcnl-orumiturlum gie RA THAl WABRI 0 R S నన C R 34 1 [9ldidoicoio १ डिसेंबर इःस. १६६३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला मुघल सरदार शाहिस्तेखान महाराजांच्या भीतीने बंगालकडे रवाना... Iprenlnnmn uauurrlou: Iranrrvlmomibauirrlora I ಚrcnl-orumiturlum - ShareChat
लक्ष्या नावाचं वादळ शांत भावपूर्ण श्रद्धांजली #💥🔹नाद फक्त एकच बैलगाडी शर्यत🔹💥 ##जगात लय भारी बैलगाडी #नाद 1 कच बैलगाडी शर्यत #बैलगाडी शर्यत शौकीन #शारदा पाटील बैलगाडी शर्यत ग्रुप पुणे कुंडल महाराष्ट्र
💥🔹नाद फक्त एकच बैलगाडी शर्यत🔹💥 - शिजंघीः.! சgரீ पपछात पाफिल्स +9 ज्या बलान बैलगाडा शर्यत क्षव्ात आपल्या चेगाच्या जोरावर संपूर्ण हिंदुस्थानात नावलौकिक केला असा जीवन गौरव पुरस्कृत महाराष्ट्राचा लाडका वेगाचा बेताज बादशाहा amlsl [নিরনঞমহী सप्त क्षेत्रातील देव ल४्य 7 MaqdoLL ORAPHICS (00606656403| अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य शोकाकुल VVವ लक्ष्या नावाचं वादळ शांत भावपूर्ण श्रद्धांजली शिजंघीः.! சgரீ पपछात पाफिल्स +9 ज्या बलान बैलगाडा शर्यत क्षव्ात आपल्या चेगाच्या जोरावर संपूर्ण हिंदुस्थानात नावलौकिक केला असा जीवन गौरव पुरस्कृत महाराष्ट्राचा लाडका वेगाचा बेताज बादशाहा amlsl [নিরনঞমহী सप्त क्षेत्रातील देव ल४्य 7 MaqdoLL ORAPHICS (00606656403| अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य शोकाकुल VVವ लक्ष्या नावाचं वादळ शांत भावपूर्ण श्रद्धांजली - ShareChat
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६५६ मुअज्जमने दिल्ली सोडली मुहम्मद आदिलशाहचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याचा मुलगा अली याला उत्तराधिकारी घोषित करुन बडी बेगम व वझीर मुहम्मद खानने गादीवर बसवला. त्यावेळी अली आदिलशाह फक्त आठरा वर्षांचा होता. आदिलशाही सरदारांमधे ह्या घटनेनंतर लगेच अंतर्गत कलह सुरु झाला. कर्नाटकातील छोट्या राजांनी ह्या संधीचा फायदा घेऊन हातून गेलेले काही प्रांत पुन्हा जिंकले. त्याचवेळी मुघलांनाही ह्यात त्यांची पोळी भाजून घ्यायची होती. ९ नोव्हेंबर १६५६ ला औरंगजेबला आदिलशाहच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आले. त्याने हा निरोप शाहजहानला पाठविला व आदिलशाहीविरुद्ध कारवाईसाठी कुमक मागवली. २५ नोव्हेंबर १६५६ ला शाहजहानने त्याचा मुलगा मुअज्जम ह्याला वीस हजार सैन्यानिशी औरंगजेबकडे जायला सांगितले. ३० नोव्हेंबर १६५६ ला मुअज्जमने दिल्ली सोडली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/xo0ROBI6HQs?feature=share 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदराजवळील दुर्गाडी कोटाचे बांधकाम सुरू केले...!! हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर) च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर इ. स. १६५७ मध्ये घेतला. त्यावेळी महाराजांनी कल्याणबरोबर भिवंडीही ताब्यात आणली. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खोदतांना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळावी ही दुर्गादेवीचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले. दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या करीता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६६४ एक डच व्यापारी आपल्या आधिकार्याला लिहीतो- "खवासखानाच्या सैन्यास पोचविण्यासाठी कॅपटन घोरपडे ह्याच्या ताब्यांत विजापूरच्या राजानें जी रोकड रक्कम दिली होती तिच्यीवर बालेघाटांत अकस्मात हल्ला करुन व इतर काहीं जहाजें लुटून शिवाजी राजांनी लूट मिळविली, ती ८ लाख होन असावी असा अंदाज आहे आणि खुष्किच्या मार्गाने त्यांनी ह्या शिवाय २० लाखांचा माल लुटला असावा. कॅपटन घोरपडे ह्याला त्या शिवाजीराजांनी आकस्मात गांठून त्याच्यावर जो विजय मिळविला तो विजय खवासखानाच्या कल्पनेपेक्षां फार निराळ्या प्रकारचा आहे, कारण घोरपडे एक उत्तम सेनापतींपैकी होता. त्याला इतकी जबर दुखापत झाली की, तो लौकरच मेला आणि पैशांखेरीज घोरपड्यांचे दोनशे लोक मारले गेले." 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० नोहेंबर इ.स.१६६७ हिंदूधर्माच्या व लोकांच्या रक्षणासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज कसे वागत याचे एक उदबोधक उदाहरण म्हणजे ३० नोहेंबर इ.स.१६६७ रोजी गोव्याहून लिहिलेल्या इंग्रजी बातमीपत्रांत आले आहे. यावेळी गोव्याच्या व्हाईसरॉयने ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कंकण पुन्हा बांधले व तेथील चार पादऱ्यांचा बारदेशांतून बाहेर पडूनजवळच्या मुलुखातील हिंदूंना पेचात पकडून ख्रिस्ती करण्यास व जे तसे करण्यास तयार नसतील त्यांचा नाश करण्यास सुरुवात केली. हे ऐकून छत्रपती श्री शिवाजी महाराज संतापले व त्यांनी त्या प्रदेशावर स्वारी करून पोर्तुगिजांना दहशत बसविण्यासाठी पुष्कळ ख्रिस्ती लोकांना त्यांनी ठार मारले आणि पुष्कळांना कैद केले. चार पादऱ्यांचा शिरच्छेद करविला, ही बातमी ऐकून गोवा हाईसरॉयला धडकी भरली व त्याने आपली हिंदूंचा नाश करणारी धर्मज्ञा मागे घेतली. छत्रपती शिवाजी महाराज धर्माच्या बाबतीत दुराग्रही नव्हते पण स्वधर्मनिष्ठ खास होते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६८६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकून घेण्यासाठी स्वराज्यावर चालून आला. महाराजांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यापासून त्यांनी मुघलांना सर्वच आघाड्यावर टक्कर दिली होती. पण शंभुराजे स्वराज्यासाठी लढत असतानाच स्वराज्यातीलच काही लोक मुघलांना आणि पोर्तुगीजांना सामील होत होते. इंग्रजांच्या बातमीनुसार फेब्रुवारी १६८५ मध्ये गोव्याजवळ राहणारा देसाई संभाजीराजेंना सोडून पोर्तुगीजाना मिळाला होता. कारवारच्या बाजूलाही देसाई व सावंत यांनी बंडखोरी चालू होती. याच दरम्यान मुघल सैन्य खेळणा,पन्हाळा,मिरज व बेळगाव या भागात शिरण्याचा आक्रमक प्रयत्न करत होते.एप्रिल १६८६ च्या दरम्यान मिरजेचा आदिलशाही किल्लेदार असदखान याने मिरजेचा किल्ला मुघलांच्या हवाली केला. हा किल्ला हाती आल्याने मुघलांना तिथे राहण्यासाठी जागा मिळाली. त्यामुळे मुघलांनी अधिक आक्रमक होत कोल्हापूर,पन्हाळा,बेळगाव या भागात हालचाली सुरू केल्या. याच दरम्यान इंग्रजानी स्वाली मरीन हुन लंडनला पाठवलेल्या पत्रात मुघलांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिल्याचा उल्लेख केला आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६९४ संताजी घोरपडे शंकराजीपंतांचा निरोप घेऊन जिंजीला जाण्याच्या उद्देशाने प्रथम हैद्राबाद प्रांतात घुसले. पण औरंगजेबने आपल्यावर फौजबंद सरदार रवाना केले आहेत हे समजल्यावर त्या सरदारांस चकविण्यासाठी त्याने हैद्राबाद प्रांतातून जाण्याचे सोडून ते विजापूरच्या भागांत गेले. औरंगजेबने हिंमतखान बहादूर संताजी घोरपडेंच्या पाठीवर सोडला. पण हिंमतखान बहादूर याजपाशी संताजींचा मोड करण्याएवढे सैन्य नव्हते म्हणून त्याच्या मदतीस गाजिउद्दीनखानास पाठविण्यात आले. ३० नोव्हेंबर (१६९४) रोजी हिंमतखानाने संताजी घोरपडेंशी बाणूर गावाजवळ (भूपाळ गडजवळ, खानापूर तालुका, सांगली जिल्हा) लढाई केली. यात संताजींना माघार घ्यावी लागली. जानेवारी १६९५ च्या पहिल्या आठवड्यात रायचूरजवळ हिंमतखान बहादूर आणि संताजींचे युद्ध झाले. त्यांत दोन्हीकडील माणसे जखमी व घायाळ झाली. हिंमतखानाशी संताजींच्या ज्या लढाया झाल्या त्या निर्णायक नव्हत्या. धावपळीच्या लढाया होत्या. गनिमीकाव्यांने शत्रूशी धावत पळत लढत दिल्याचे दिसते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१७१५ व्हिसेरेईने सुरत येथील पोर्तुगीज प्रतिनिधीला पाठविलेल्या पत्राची नोंद! आंग्रे यांचे पारिपत्य करण्यासाठी मोगल बादशहाने असगरअली खान या नावाच्या सरदाराची रवानगी केली. ही बातमी व्हिसेरेईला कळताच त्याला मोठा आनंद झाला. परंतु असालअली खानाने आंग्रे यांचे पारिपत्य केल्याची माहिती पोर्तुगीज कागद पत्रांत आढळत नाही. उलट हा सरदार लांचलुचपतीला बळी तर पडणार नाही ना अशी शंका व्हिसेरेईने सुरत येथील पोर्तुगीज प्रतिनिधीला पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तो म्हणतो. "लांचलुचपतीला बळी पडणे हे मानवी स्वभावाला अनुसरून आहे. त्यामुळे सरदार असगरअली खान हा आंग्रे यांच्या लांचेस बळी पडणार नाही असे सांगता येत नाही.आंग्रे यांच्यापाशी सोने विपुल आहे त्याच्या बळावर तो मोगल सरदाराला वश करून घेऊन त्याला बादशहाचे हुकुम तहकूब करून ठेवावयास लावण्यास कमी करणार नाही". 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ३० नोव्हेंबर इ.स.१८७० श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज साहेब (कोल्हापूर) यांचे ३० नोव्हेंबर १८७० रोजी फ्लॉरेंस(इटली)मध्ये निधन झाले त्या वेळी त्यांची फ्लॉरेंस येथे समाधी बांधली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - THE [REA=' MaTIIIAI WATTTIIః MARA W A RR TH ] GRE A  0 RS शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | ३० नोव्हेंबर इ.स. १६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदराजवळील कोटाचे बांधकाम सूरू केले..! दुर्गाडी ; great_maratha warriors ine ' Ihe qreal marathauarriors the great marathawarriors THE [REA=' MaTIIIAI WATTTIIః MARA W A RR TH ] GRE A  0 RS शिवदिनविशेष SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | ३० नोव्हेंबर इ.स. १६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदराजवळील कोटाचे बांधकाम सूरू केले..! दुर्गाडी ; great_maratha warriors ine ' Ihe qreal marathauarriors the great marathawarriors - ShareChat
⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳ 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१६५९ ( मार्गशीर्ष वद्य दशमी, शके १५८१, संवत्सर विकारी, मंगळवार ) काल जिंकलेला किल्ले पन्हाळा बघायला शिवराय रात्रीच निघाले. कालच्या दिवशी स्वराज्यात दाखल झालेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी, महाराज काही मावळ्यांसह पन्हाळगडावर हजर. प्रतापगडावर अफझलखान रुपी राक्षसाचा खात्मा करून राजांनी कोणतीही उसंत न घेता थेट वाई, कराड , सातारा आणि नंतर कोल्हापूर भाग स्वराज्यात दाखल करून घेतला त्यातच किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून राजे पन्हाळ्याला पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/z9EUFm4fye8?feature=share 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१६९४ व्हिसेरेई कौंट द व्हिलाव्हर्द हा पोर्तुगिजांकडील जुना मोगल वकिल शेख महंमद याला लिहीलेल्या पत्राची नोंद! "आपणाला माहिती आहेच की, छत्रपती शिवाजी महाराजांशी आमचे युद्ध झाले तेव्हा पासून त्यांचा आणि आमचा तह झालेला नाही. त्यांना आम्ही आमच्या बंदरात कधीच येऊ दिले नाही. इतकेच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आणि आमच्या चकमकी उडतात. मग त्या जमिनीवर असोत वा समुद्रावर असोत. गेल्या वर्षी त्यांनी आमच्या काही नौका आमच्या युद्ध नौका शिरल्या व त्यांनी तेथील अनेक नौका जाळून टाकल्या. पकडल्या म्हणून त्यांच्या १ बंदरात शिवाय त्यांचे १ खेडे आणि १ प्राचीन देऊळ त्यांनी जाळून टाकले. मी चौलच्या कॅप्टनला त्यांची शक्य ती हानी करण्याची सुचना देत आहे". व्हिसेरेई कौंट द व्हिलाव्हर्द हा पोर्तुगिजांकडील जुना मोगल वकिल शेख महंमद याला लिहीलेल्या पत्राची तारीख होती २९ नोव्हेंबर इ.स. १६९४. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१७२१ ठरल्याप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीझ एकत्रितपणे मराठ्यांच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईहून निघाले. मोहिमेची योजना प्रत्यक्षात आणून पहिला हल्ला मात्र त्यांनी २४ डिसेंबरला केला.आंग्र्यांच्या नेतृत्वाखालच्या मराठी आरमारापुढे इंग्रज आणि पोर्तुगीझ यांच्या संयुक्तफौजांचे सुद्धा काही चालले नाही. ४ दिवसात धूळधाण उडून इंग्रज मुंबईला परत गेले तर पोर्तुगिझान्ना पेशवे थोरले बाजीराव यांच्यासह तह करावा लागला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१७२१ २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यान गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१७२८ दोन्ही सैन्यसागर (मराठयांचे आणि गिरीधर व दया बहाद्दूर )२९ नोव्हेंबर १७२८ ला आमझेरा आणि तिरला याच्यामधल्या सपाट मैदानी प्रदेशावर एकमेकांवर आदळले. लढाईला तोंड लागले. गिरीधर बहाद्दूर आणि दया बहाद्दूरच्या तुलनेत अननुभवी असलेल्या चिमाजीअप्पांच्या फौजा जिवावर उदार होऊन गनिमीवर कोसळल्या. त्यांचा आवेश इतका भयंकर होता की, शत्रूची फळी फुटली, शत्रूची दाणादाण उडायला सुरुवात झाली. मुघल सैन्यही प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. पण मराठे त्यांना आवरत नव्हते. गिरीधर बहादूर स्वतः लढाईत हत्तीवर बसून तिरंदाजी करत होता. तिरंदाजी करताना त्याचे ४ भाते रिकामे झाले. ही घनघोर लढाई ५/६ तास सुरू होती,दिवस कलू लागला, तशी मराठ्यांची सरशी होऊ लागली. तितक्यात गिरीधर बहादूराला गोळी लागली आणि तो मृत्युमुखी पडला आणि थोड्याच अवधीत दयाबहादूरदेखील ठार झाल्याचे वृत्त आले. आपले सेनानायक पडल्यावर मुघल सैन्याचा धीर सुटला. मराठ्यांचा प्रचंड विजय झाला. आमझेरा येथील छावणी पूर्णपणे लुटण्यात आली. त्यात अनेक हत्ती, घोडे, अमाप द्रव्य, शस्त्रास्त्र हस्तगत झाली. या युद्धात उदाजी पवार यांनी समशेर गाजवली. मल्हारराव होळकर यांनीही पराक्रम केला. अनपेक्षित मोठा विजय मिळाला. चिमाजीअप्पांच्या मराठी फौजांनी दोन मातब्बर शाही सुभेदार, अश्रफींचे उमराव पुरते बुडवले. या घटनेने हिंदुस्थानात हाहाक्कार उडाला. सर्वांचे लक्ष या लढाईकडे लागून होते. मराठ्यांना अकस्मात विजय मिळाला. त्यांच्या विजयाचे डंके सर्वत्र वाजू लागले. शत्रूच्या पोटात धडकी भरवणारी अशी ही घटना होती. विजयाची वार्ता टाकोटाक राऊ स्वामींना कळवण्यात आली. त्या दिवशी थोरले बाजीराव पेशवे अंबिकानगर उर्फ नगर जिल्ह्यातील लोणी पेडगाव येथे होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१८०३ २९ नोव्हेंबर इ.स.१८०३ रोजीं एका बाजूस इंग्रज आणि दुसऱ्या बाजूस नागपूरकर भोसले व शिंदे यांच्या फौजा यांच्या दरम्यान झाली (इंग्रज मराठे युद्ध, दुसरें पहा) आडगांवची लढाई होण्याच्या पूर्वी रघूजी भोसल्याच्या सैन्याची छावणी गाविलगडानजीक आडगांव येथें पडली असून शिंद्याची फौज त्यांच्या छावणीपासून पांच मैलांच्या आंतच सिरसोली येथें होती. रघूजीच्या सैन्याचें आधिपत्य त्याचा भाऊ वेंकाजी उर्फ, मन्याबापू याजकडे असून त्याजवळ या वेळीं रघूजीचें सर्व पायदळ, कांहीं फौज व बऱ्याचशा तोफा होत्या. स्टीव्हन्सन यास जनरल वेलस्लीचा गाविलगडास वेढा देण्याचा हुकुम झाला असल्यामुळें तो तेथून जवळच येऊन पोहचला असून जनरल वेलस्ली हा त्याला मदत करण्याकरितां दक्षिणेकडून येत होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २९ नोव्हेंबर इ.स.१८३८ कोल्हापूरचे छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांचं अकाली निधन झालं. तेव्हा गादीवर आठ वर्षांचे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज आले. गादीवर आलेले बाबासाहेब महाराजांचा स्वभाव शांत आणि मवाळ होता पण त्यांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे वेगळच रसायन होतं. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - EGRE VH d R ని1 WA R R HA ]~!!5:13~10= PicfcஎfceIq SHIVRINMISHESS PREATED | Bv २९ नोव्हेंबर इ.स. १६५९ काल जिंकलेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज काही मावळ्यांसह रात्रीच নিঘাল The greal maralhawarriors the_greal_marathawarriors the greal maratha uarriors EGRE VH d R ని1 WA R R HA ]~!!5:13~10= PicfcஎfceIq SHIVRINMISHESS PREATED | Bv २९ नोव्हेंबर इ.स. १६५९ काल जिंकलेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज काही मावळ्यांसह रात्रीच নিঘাল The greal maralhawarriors the_greal_marathawarriors the greal maratha uarriors - ShareChat
⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳ 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६५९ अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्गडसहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील. अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवरायांनी वाई सोडली आणि घोड्याच्या टापा वळाल्या थेट कराडच्या रोखाने. अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीना भेटले . नेताजीना त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याना मिळाले. दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले आणि आजच्या दिवशी पन्हाळगडसहित कोल्हापूर स्वराज्यात पुन्हा एकदा सामील झाले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/toEk0YvbIxs?feature=share 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६७९ मराठ्यांचे पाणी आणि रसद संपत आहे, तेव्हा ते कारण पुढे करून आपण तहासाठी घाई करावी व बेट मिळवण्याचा प्रयत्न करावा. या वेळीच २३ नोव्हेंबर रोजी सुरतेहून आलेले बंगाल मर्चट व "ऍने" ही जहाजे ताफ्यात सामील झाली. पैकी 'ऍने'चा उपयोग होणार होता. परंतु बंगाल मर्चट अत्यंत मोठे शिबाड असून त्याचा उपयोग तसा कमीच होता. मुंबईकरांनी २८ नोव्हेंबर रोजी पेशवा मोरोपंतांना पत्र लिहिले व बेट सोडण्याबाबत विचारले व त्यात इंग्रजांनी रसद पाण्याची परिस्थिती कळवली. तेव्हा मोरोपंतांनी आपण बेट कधीही सोडणार नाही व इंग्रजांना मिळालेली माहिती चुकीची असून आमचे सैन्य व्यवस्थित आहे व ते युद्धासाठी तयार आहे असे कळवले. याने इंग्रज आता अगदीच जेरीस आले आणि त्यांनी सुरतेला तहासाठी काय करावे, याचे विचार मागितले. तसेच त्यांनी सुरतेला कळवले की, वेढा असाच सुरू ठेवायचा असल्यास आम्हाला अधिक पैशांची गरज आहे व सध्या तरी ५००० शेराफिंस (१० शेराफिंस = १३ रुपये) त्वरित पाठवून द्यावे, जहाजांची संख्या वाढत असल्यामुळे खर्च वाढू लागला होता, परंतु यश मिळत नव्हते. सुरतकरही या प्रकरणाला वैतागले होते. त्यांनी तूर्त नाविक दल तसेच ठेवावे व कॅप्टन जॉन गोल्डबरो आणि कप्तान जॉन दानियाल (हे दोघे अनुक्रमे बंगाल मर्चट व 'ऐंने चे कर्णधार होते) यांना छ.शिवाजी महाराजांच्या मुलुखात हल्ला करण्यास पाठवावे, ज्याने त्याची शिबंदी इतर ठिकाणी विभागली जाईल व बेटाला पुरवठा खंडित होईल. या दरम्यान सुरतकर राजापूरकर इंग्रजांच्या मदतीने बेट राखून तह करण्याचा प्रयत्न करणार होते. दरम्यान १ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला, सिद्धी व इंग्रज यांना तो अडवता आला नाही. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६८२ कल्याण भिवंडी ताब्यात आली तर मराठी मुलखात शिरणे सोपे जाईल या हेतूने औरंगजेबाने आपला मातब्बर सरदार हसनअलीखान याला १४ हजार सैन्यासह त्या भागात पाठवले होते. पण शंभुराजेंचे ध्येयनिष्ठ सरदार या हल्ल्याना समर्थपणे तोंड देत होते. कल्याण भिवंडीजवळच मेहंदळी गावात मराठ्यांनी मुघल ठाण्यांची लुटालूट केली होती. मुघल सरदार रणमस्तखान याला बहादूर खान ही पदवी मिळली होती. तो कल्याणला आला असताना मराठ्यांची ७ हजार स्वार व ८ हजार प्याद्यांची तुकडी कल्याण भिवंडीला गेली.ही बातमी कळताच खानही तिथे गेला व तिथे गढी तयार करून तिथले ठाणे त्याने मजबूत केले. तिथेच मराठ्यांच्या सैन्याची व रणमस्तखानाच्या सैन्याची लढाई झाली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७२३ रोजी सरदार पिलाजीराव जाधव यांनी वसईच्या गव्हर्नरला पाठविलेल्या पत्राची नोंद! "माझे स्वामी छत्रपती शाहू महाराज यांनी मला किल्ले वसई वर स्वारी करण्याकरिता पाठविले आहे. तरिही मी संयम करतो. तुम्ही तुमचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी आमच्या कडे पाठवावा". सरदार पिलाजीराव जाधव हे ज्येष्ठ आणि अनुभवी सरदार असल्याने त्यांनी वसई प्रांतावर परत जाणार होते, व म्हणून त्यांनी वाटाघाटीसाठी एकदा दुत पाठविण्याची सुचना एकदम हल्ला केला नाही. छत्रपती शाहू महाराज यांच्या मागण्या पोर्तुगिजांनी मान्य केल्यास वसईवर हल्ला न करता ते वसईच्या गव्हर्नरला केली होती. परंतु ती सुचना त्याने लक्षात घेतली नसल्याने सरदार पिलाजीराव जाधव यांना वसईवर स्वारी करणे भाग पडले. त्यांच्यानंतर सरदार दावलजी सोमवंशी यांच्याही फौजा, पोर्तुगिजांच्या अमलाखालच्या प्रदेशात घुसल्या. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७५३ दाभाडे बंधु महाराष्ट्रात असल्याची संधी साधून अहमदाबादच्या जोरावरखा बाबी या मोगल ठाणेदाराने त्यांची ठाणी उठवली. दाभाडे बंधुंना हे कळल्यावर ते अहमदाबाद वर चाल करुन गेले, त्यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री उमाबाई दाभाडे याही होत्या. अहमदाबाद जवळ उमाबाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युध्दात दाभाडेंचा प्रचंड विजय झाला. अहमदाबादच्या रणभुमीवरील पराक्रमा बद्दल थोरल्या शाहू महाराजांनी उमाबाईंना सोन्याचे तोडे देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच हा सन्मान त्यांना वंशपरंपरागत करुन दिला. सोन्याचे तोडे पायात घालण्याचा मान फक्त छत्रपतींच्या घराण्यातील स्त्रियांना होता. असा मान मिळवणार्या सेनापती उमाबाई दाभाडे ह्या एकमेव महिला होतं. सेनापती उमाबाई दाभाडेंचा अल्पशा आजारपणाने तळेगाव येथे मृत्यु झाला महाराणी ताराराणी साहेब यांच्या नंतर मराठेशाहीतील नावाजलेल्या उमाबाई या पराक्रमी स्त्री होत्या. सेनापती उमाबाई दाभाडेंची समाधी तळेगाव दाभाडे पुणे येथे आहे. त्यांच्या मृत्युची तारीख २८ नोव्हेंबर १७५३. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७८० ठाणे आणि कल्याण घेतल्यानंतर आता इंग्रजांची नजर वळली ती वसईवर, दि. १६ ऑक्टोबर रोजी कॅ. गॉडार्ड सुरतेहून मुंबईकरांच्या मदतीसाठी निघाला. दि. २८ नोव्हेंबर इ.स.१७८० रोजी गोडार्डन वसईला मोर्चे लावले. इंग्रजी तोफा वसईवर आग ओकू लागल्या. यावेळी वसईवर मराठ्यांचे किल्लेदार होते. विसाजीपंत लेले. इंग्रजांच्या या हल्ल्याला विसाजीपंतांनी दोन आठवड्यांपर्यंत चांगलाच प्रतिकार केला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - MuE Ct,7 1 ' C ALR A 1 H 4 GR -A 8  -HA R R8 शिवदिनविशण shivdinvishiesh CREATED By Ku Borse Pntil २८ नोव्हेंबर इःस. १६५९ छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वधानंतर केवळ १८ दिवसांत पन्हाळागडासहित सातारा ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील केला. Ihe qrcol morolhouqrriors Ihc ಚrcot moruihq uorrlors Ihe greal maralhawarrlors MuE Ct,7 1 ' C ALR A 1 H 4 GR -A 8  -HA R R8 शिवदिनविशण shivdinvishiesh CREATED By Ku Borse Pntil २८ नोव्हेंबर इःस. १६५९ छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वधानंतर केवळ १८ दिवसांत पन्हाळागडासहित सातारा ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील केला. Ihe qrcol morolhouqrriors Ihc ಚrcot moruihq uorrlors Ihe greal maralhawarrlors - ShareChat
💐💐🙏💐💐 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - मार्गशीर्ष गुरुवारच्या आपणास मंगलमय शुभेच्छा.. जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी जय व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी सचिन दादा पानसरे সিস্কনীললন্ম্ূী श्री गूरु द्त्त भारत गॅस एचपा गस २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 मार्गशीर्ष गुरुवारच्या आपणास मंगलमय शुभेच्छा.. जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी जय व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी सचिन दादा पानसरे সিস্কনীললন্ম্ূী श्री गूरु द्त्त भारत गॅस एचपा गस २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 - ShareChat
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१००१ अफगाणिस्तानातून पुढे मुघलांची अनेक आक्रमणे येथे झाली. सबक्तगीन इ.स.९९७ मध्ये मृत्यू पावल्यानंतर खोरासान प्रांताचा सुभेदार म्हणून त्याचा मुलगा महमूद याने सुत्रे हातात घेतली. सामानींचे अधिपत्य झुगारून त्याने इ.स.९९९ मध्ये त्याने स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले. नौशेटा आणि सिंधू यामधील प्रदेशात इ.स.१००१ मध्ये मोठी युद्धे झाली. त्यावेळी पेशावर येथे हिंदू राजा जयपाल यांनी महमुदला प्रतिबंध केला. २७ नोव्हेंबर इ.स.१००१ मध्ये झालेल्या युद्धात राजा जयपाल यांचा पराभव होऊन त्यांना बंदी बनविण्यात आले. त्याचा मुलगा आनंदपाल हा महमुद विरुद्ध उभा ठाकला. ज्या पठाणांनी यावेळी राजा जयपाल-आनंदपाल यांना मदत केली.त्यांना मोठ्या शिक्षा देऊन महमुदाने त्या सगळ्यांना इस्लामची शिक्षा दिली. हिंदू राजा जयपालचा पराभव झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/nsscYRt67dk?feature=share 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६६७ (मार्गशीर्ष वद्य सप्तमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार) महाराज आणि पोर्तुगीजां मध्ये तह! धर्मांध पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी करून गोवेकरांना चांगलीच अद्दल घडवली. जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरायने वकील पाठवून तहाची मागणी केली. महाराजांनीही सकोपंत काका यांना वकील म्हणून नामजाद करून व्हाईसरायकडे पाठवले. तहाची कलमे ठरवली. आजच्या दिवशी व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८० मुंबईच्या इंग्रजांनी २७ नोव्हेंबर १६८० ला सुरतेस पत्र पाठवले. छत्रपती संभाजी महाराजांना सिद्दीचा समाचार घ्यायचा होता त्यापुर्वी इंग्रजांना समज देणे गरजेचे होते म्हणून त्यांनी आपला वकील आवजी पंडित यांना २० नोव्हेंबर १६८० रोजी मुंबाईस पाठवले या वकिलाने इंग्रजांना कडकडीत शब्दात सुनावले ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेस २७ नोव्हेंबर १६८० च्या पत्रात कळवले होते. “छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजाविरुध्द युध्द पुकारतील संभाजी राजांचा आलेला वकील पाहताच सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. छत्रपती संभाजी राजांच्या आरमाराला तोंड देण्याची तयारी नव्हती. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीच्या बंदोबस्तासाठी किनार्यावर सतत दहा हजार माणसे निष्कारण आडवावी लागतील संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तर ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीची मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालूच राहीली तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आह." 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८१ सण १६७८ मध्ये शंभुराजे जेव्हा दिलेरखानाकडे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक बहिणही होती. पुढे शंभुराजेंनी विजापुरजवळ असताना शिवाजी महाराजांच्या मदतीने मुघलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. पण यावेळी त्यांची पत्नी आणि बहीण मात्र मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजे गादीवर आल्यानंतर त्यांनी पत्नीला व बहिणीला सोडवण्यासाठी नगरच्या किल्ल्यावर हल्ले सुरू केले. शंभुराजेंचे सैन्य नगरच्या किल्ल्याजवळ जाऊन किल्ल्यात घुसण्याची संधी शोधत होते. पण मुघल किल्लेदाराकडे मराठ्यांशी टक्कर देऊ शकेल इतके सैन्यबळ नव्हते. त्यामुळे तो हैराण झाला होता. त्याने आपली स्थिती रहुल्लाखानाला कळवल्यावर त्याच्या मदतीसाठी आज्जमशहा आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले.आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ नोव्हेंबर इ.स.१८९० महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन! शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला, म्हणून यांचे नांव फुले असे पडले. शिक्षणास सुरुवात झाल्यावर ज्योतिबांनी वा.ब.फडके यांचे मांग जातीचे गुरु लहूजीबुवा यांचेजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचे शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवावृत्तीने व कार्यनिष्ठेनें हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजन समाजाला साक्षर करावे व त्याला सत्यधर्माचे ज्ञान करून द्यावे असा विचार यांच्या मनांत येऊ लागला. सन १८५१ मध्ये यांनी बुधवार पेठेतलि चिपळुणकरांच्या वाड्यांत मुलींची शाळा काढली. या कामी यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला; परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला. व सरकारने यांना दोनशे रुपयांची शालजोडी अर्पण केली. त्यानंतर सन १८५३ मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांकरिता दोन शाळा यांनी स्वतःच्या खर्चाने काढल्या. विधवाविवाहाचा प्रसार करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसा एक विवाह घडवून ही आणला. तसेच पतित मुलींच्या हातून भ्रूणहत्येचे पातक घडू नये म्हणून यांनी बालहत्या-प्रतिबंधक गृह काढले. यानंतरची यांची महत्वाची कामगिरी म्हणजे १८७३ मध्ये यांनी आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्राज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धान्त शोधून काढले ते यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिपादिले. ब्राह्मण व वेदपुराणादि ग्रंथांवर प्रखर हल्ला करून सबंध समाजरचनाच बदलून टाकण्याची दिशा यांनी दाखविली. 'ब्राह्मणांचे कसब', 'गुलामगिरी', 'जातिभेदविवेकसार', इशारा', 'शेतक-्याचा आसूड' वैगे पुस्तकें यांनीं लिहिलीं आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - [[ 68541 Ala wArriors M शिवदिनविशेण SHIVRIRIS BESse PREATED BY २७ नोव्हेंबर इ.स. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व्हाईसरायकडे सकोपंत यांना वकील म्हणन पाठवले व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. the greal marathawarriors the greal marathawarriors Ihe greal maralha uurriors [[ 68541 Ala wArriors M शिवदिनविशेण SHIVRIRIS BESse PREATED BY २७ नोव्हेंबर इ.स. १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व्हाईसरायकडे सकोपंत यांना वकील म्हणन पाठवले व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला. the greal marathawarriors the greal marathawarriors Ihe greal maralha uurriors - ShareChat
#🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
🚩शिवराय - 2[, जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक भारतातील सर्व दूध उत्पादकांना राष्ट्रीय दुध दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! सचिन दादा पानसरे त मिळ तोलन्सी श्री गुरु द्त्त  गॅस भारत गॅस Tuut T २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 2[, जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक भारतातील सर्व दूध उत्पादकांना राष्ट्रीय दुध दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! सचिन दादा पानसरे त मिळ तोलन्सी श्री गुरु द्त्त  गॅस भारत गॅस Tuut T २४ तास सवा Sachin dada pansar 9657829035 - ShareChat
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - 26/1 मुंबई दहशतवादी हल्ला या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या सर्व शहीद वीरांना व आपल्या प्राणाची पोलीस जवानांना तसेच हजारो निष्पापजीवांना भावपूर्ण . आदरांजेली सचिन दादा पानसरे থীরসী  র্ল সিসতনীলনমী নাম্ মঁষা गॅस मिळतील २४ तास सेवा Sachin dada pansar 9657829035 26/1 मुंबई दहशतवादी हल्ला या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या सर्व शहीद वीरांना व आपल्या प्राणाची पोलीस जवानांना तसेच हजारो निष्पापजीवांना भावपूर्ण . आदरांजेली सचिन दादा पानसरे থীরসী  র্ল সিসতনীলনমী নাম্ মঁষা गॅस मिळतील २४ तास सेवा Sachin dada pansar 9657829035 - ShareChat
#🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🚩शिवराय - संविधान दिवससाजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निधर्रिकरुया भारताचे सविधान भारतीय संविधान টিন निमित्तसर्व भारतीयांना हार्दिकशुभेच्छा सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद्त मिॅळ ऐॉलन्सी भास् सॅसा যম সিল্নীল 24 নাম মতা 9657829035 Sachin dada pansar संविधान दिवससाजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निधर्रिकरुया भारताचे सविधान भारतीय संविधान টিন निमित्तसर्व भारतीयांना हार्दिकशुभेच्छा सचिन दादा पानसरे श्रच गौरुगद्त मिॅळ ऐॉलन्सी भास् सॅसा যম সিল্নীল 24 নাম মতা 9657829035 Sachin dada pansar - ShareChat