#🙏शिवदिनविशेष📜 ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ११ डिसेंबर इ.स.१६६१ हेन्री रेव्हिंग्टनचा मृत्यू इ.स. १६६१ च्या मार्च महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरची इंग्रजांची वखार लुटली आणि तिथल्या काही इंग्रजांना कैद केले. हे इंग्रज पुढीलप्रमाणे होते :- १) हेन्री रेव्हिंग्टन २) रँडॉल्फ टेलर ३) रॉबर्ट फेर्रान्ड ४) रिचर्ड नेपियर ५) रिचर्ड टेलर ६) फिलिप गिफर्ड ७) रॉबर्ट वार्ड नावाचा एक सर्जन ८) विल्यम मिंघम या आठ जणांपैकी पहिले सात लोक ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि आठव्याला ( विल्यम मिंघम ) या सात जणांनी आपल्या खाजगीतून पगार देऊन कामावर ठेवले होते . शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या कैदेत असताना या महाभागांनी ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी न घेता इंग्रजी निशाणाखाली गडावर तोफा डागण्याचा जो 'उद्योग ' केला होता त्याचीच शिक्षा म्हणून महाराजांनी या सर्वाना कैद केले होते. यातील रिचर्ड नेपियर हा इंग्लंडहून आला तेव्हाच फार आजारी होता, आणि तो जगेल याची आशा नव्हती. अपेक्षे प्रमाणे तो मे १६६१ रोजी मराठयांच्या कैदेत असतानाच मरण पावला. त्यानंतर उरलेल्या कैद्यांना राजापुराहून वासोटा किल्ल्यावर आणि तिथून सोनगड किल्यावर हलवण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत येथील अधिकाऱ्यांनी कैदेतील आपल्या लो#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती

