ShareChat
click to see wallet page
search
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏* *💯🌹#अमावास्येला करावयाची विशेष सेवा 🌹💯* *१) #सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला (उटण्यासारखे) लाऊन गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी, जमल्यास नदी तीरावर अथवा तिर्थक्षेत्री पंचगव्य संपुर्ण अंगाला लावुन स्नान केल्यास अति उत्तम (पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लाऊ नये)...* *२} #घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी (पांढरी) मोहरी घेऊन ११ वेळा कालभैरवाष्टक व ११ वेळा वेदोक्त "वल्गा सुक्त" म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते.* *३} #अमावास्येच्या दिवशी घराच्या आजुबाजुच्या सर्व देवी-देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा.* *४} #अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशुळ काढून नारळ उतारा करावा.* *५ } #आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करुन व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू ,गोमूत्र व पंचगव्य टाकून (केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लिनर/फिनेल पण चालेल) घर स्वच्छ पुसून घ्यावे.* *६ } #हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा.* *७ } #आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरुन नारळ उतारा हा सात वेळा "श्री स्वामी समर्थ" मंत्र म्हणून करावा (उतारा करतांना वाहन हे जागेवर चालू ठेवावे) व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त ११ वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी.* *८ } #घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे.* *👉#अमावास्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर* *१) श्री स्वामी समर्थ १ माळ* *२) श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र १ माळ* *३) शाबरी मंत्र १ माळ* *४) नवनाथ मंत्र ११ वेळा* *५) कालभैरवाष्टक ११ वेळा* *६) वल्गासूक्त ११ वेळा करावे... गोरक्षचिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे, जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे...* *👉#आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.* *👉 #हिरण्यदान:- (ज्यांचे वडील नाही त्यानीच करावे)अमावास्येच्या दिवशी १२ ते १२:३० वा. दरम्यान जानवे जोड, सव्वा पावशेर पेढे, ११ रु. दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे. (प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये)* *👉#घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ-संध्याकाळ त्यावर एका नंतर एकेक असे ७ कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावास्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. (नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा)* *👉#शक्यतो अमावास्येच्या दिवशी परान्न घेऊ नये.* #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार
✍️सुविचार - GR( ere GR( ere - ShareChat