"ध्रुव ऐक ना.." ती कार मध्ये बसण्या आधीच बोलली."हम्म बोल.." त्याने आत्ता तिच्यासाठी डोअर ओपन केला.."ध्रुव मला तुझ्याशी बोलायचं आहे.." ती अजुनही बाहेर उभ राहूनच बोलत होती."मला पण बोलायचंय तुझ्याशी तु आधी आत बस!" तो रोखून बघत बोलला तशी ती मनात नसताना आत बसली.दुसऱ्या बाजुने तो येऊन ड्रायव्हिंग सीट वर बसला अन् कार स्टार्ट केली... बराच वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही.. तो पण मनात विचार करत ड्राइव्ह करत होता, आत्ता तिला बोलायचं होतं पण तो ड्राइव्ह करत होता म्हणुन ती शांतच बसली होती.. 'पण आत्ता हा कुठे घेऊन निघालाय मला मघाच्या पासुन मी बोलायचं आहे म्हणते तर म्हणाला मला पण बोलायचं आहे, तसं तर काल पासुनच तो म्हणतोय तुझ्याशी बोलायचं आहे, काय बोलायचं असेल त्याला?' मनातल्या विचाराणी काळजात एक अनामिक भीती दाटून येत होती.. त्याचं वेळी कारला ब्रेक लागला तसं तिने बाहेर पाहिलं... आजूबाजूला सपाट पठार दिसत होतं पण थोडं टेकडीवर आल्या सारखं वाटतं होतं तिला.. त्याने डोअर ओपन केला अन् बाहेर आला.. तशी ती पण मग बाहेर आली... सगळीकडे निरव शांतता पसरली होती त्यातच संध्याकाळची वेळ पण पौर्णिमेच्या चंद्राचा लक्ख प्रकाश सर्वत्र पसरला होता.. गार वारे शहारे आणत होते तिने दोन्ही हात पोटाबरोब आवळून धरले होते, ती आत्ता कारच्या थोडं बाजुला उभी राहून किंचित बावरल्या नजरेनं आजूबाजूला बघत होती.. त्याचं वेळी त्याची नजर तिच्यावर पडली.. चंद्राच्या प्रकाशा मुळे रात्रीच्या वेळी पण सर्व कस लक्ख दिसत होतं... त्या मंद प्रकाशात तिची नितळ गोरी कांती उजळून निघाली होती. तिला बनवताना देवाने सौंदर्याचा एक परिपूर्ण साचा च वापरला असावा... गोरापान रेखीव चेहरा, कमनीय बांधा.... मृगनयनी डोळे .. गुलाबाच्या पाकळी सारखे नाजुक ओठ......मोकळे सोडलेले लांब सडक रेशमी काळे भोर केस जणू कही उंचावरून फेसाळत पडणारा धबधबाचं... नाजुक पण लांब नाक अन् दोन्ही डोळ्यांच्या वरती त्या झुपकेदार पापण्या त्यांची थरथर तो लांबून सुद्धा टिपू शकत होता... खरंच.... निसर्गताच स्त्रीयांना सौंदर्याचा अमाप खजिना लाभला आहे.. काही क्षणातच त्याने तिचं विलोभनीय रूप डोळ्यात साठऊन घेतलं स्तब्ध झाला होता तो... पाय जणू जागेवर खुंटले होते त्याचे तीच्या मोहक रूपात पुरता बुडाला होता तो... त्याचं वेळी तिने त्याच्याकडे पाहिलं अन् तो गडबडून भानावर आला."चल..." त्याने हात पुढे करून तिचा हात पकडला.ध्रुव आपण इकडे कुठे आलोय?" तिने अडखळत नजर चोरत विचारलं..
"का भीती वाटतेय? मघाशी घरातून एकटी बाहेर पडलीस तेव्हा भीती नाही वाटली का??" त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं अन् त्याची ती करारी नजर पाहून आज पहिल्यांदा ती त्याला घाबरली...
"ध्रुव थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे!" ती आहे त्याचं जागीच थांबून बोलली...
"हम्म बोल... आपण इकडे बोलण्यासाठीचं आलो आहोत, ते बघ तिकडे बसायला कट्टा आहे तुझी हरकत नसेल तर तिकडे बसुन बोलूयात का?" आत्ता त्याच्या नजरेतले भाव नॉर्मल होते ते पाहून तिच्या जीवात जीव आला..
"अम् हम्म... पण इकडे खुप थंडी वाजतेय.." ती दोन्ही हात पुन्हा पोटाबरोब आवळून धरत म्हणाली...
तसं त्यांने त्याचं जॅकेट काढलं.. "हे घे घाल थंडी नाही लागणार..." तो तिच्या हातात जॅकेट देत बोलला... तिने थरथरत्या हाताने त्याच्याकडुन ते जॅकेट घेतलं अन् घातलं तसं आता तिला त्याच्या मिठीत असल्याचा फील आला अन् नकळतच शरीरावर रोमांच उमटले...
थोडया वेळात दोघे पण त्या कट्टयावर येऊन बसले संध्याकाळची वेळ असल्यामुळे दूरच काही दिसत नव्हत पण चंद्रच्या प्रकाशात दोघांना एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत होते..
"बोल काय बोलणार होतीस?" त्याने प्रश्न केला.. तसा तिने एक आवंढा गिळला अन् पुढे म्हणाली...
"ध्रुव तु तु मला खुप सपोट करतोस आत्ता पर्यंत खुप केलंस तु माझ्यासाठी! तुझे हे ऋण मी या जन्मातच काय पण अनेक जन्म घेऊनही फेडू शकणार नाही... ध्रुव तुला पण माहित आहे प्रताप जेल मध्ये गेला म्हणजे मला ज्याच्या पासुन भीती होती तो तर जेल मध्ये गेला म्हंटल्यावर आता मी परत माझ्या घरी जाऊ शकते.. म्हणजे मी उद्याच तुझ्याशी बोलून परत जायच ठरवलं होतं, पण....." ती बोलता बोलता मधेच थांबली..
"पण काय? आजच न सांगता निघालीस का मग?" त्याने विचारलं.. तसं तिने पटकन त्याच्या नजरेत बघितलं... अन् पुन्हा आपली नजर खाली झुकवली...
"It'ok... मी तुला सकाळी म्हणालो होतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे.." तो आता उठून उभा राहून समोर बघत म्हणाला.. "आहे ना लक्षात?" त्याने तिच्याकडे वळून विचारलं..
"अम् हो.." तिने खाली बघूनचं हुंकार भरला..
"मग ऐकून न घेताच जाणार होतीस का?" ती अजुनही खालीच बघत होती.. का कोण जाने आत्ता तिला त्याच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा भीती वाटतं होती..
"सॉरी.." ती खाली बघुनच बोलली..
"स्वामीनीsssss.... तु सॉरी नको बोलूस मला ठाऊक आहे काय झालं असेल... तुला माहित आहे तु सापडत नव्हतीस तेव्हा काय अवस्था झाली होती माझ्या मनाची तु नाही समजू शकत, मघाशी मी जर वेळेवर तिथे पोहचलो नसतो तर त्या लफंग्यांनी काय केलं असत तुझ्या सोबत तुला कळतंय का??" तो भावुक होऊन तिचे दोन्ही खांदे पकडून तिच्या नजरेत बघत बोलाला.. त्याक्षणी तिच्या सर्वांगात वीज सळसळली..
"माझ्या पेक्षा जास्त कोणाला माहित असणार आहे.." ती स्वतःला सावरून खिन्न हसुन निर्वीकार पणे बोलली..
"एस्स!! हेच जे काही या पूर्वी तुझ्या सोबत झालं ना ते तु एक वाईट स्वप्न समजून विसरून जाणार आहेस तुझ्या सोबत असं काही झालंच नव्हत हे तु तुझ्या मनाला समजवणार आहेस!" तो तिच्या नजरेत बघून तिला समजावत बोलला.. त्याच्या बोलण्यातली तळमळ तिला कळत होती... पण तिच्यासाठी ते सर्व विसरणं तितकं सोपं होतं का?
"त्याने काय होणारयं ध्रुव! जे सत्य आहे ते कधीच आणि कोणीच बदलू शकत नाही.." ती पण आता उठून त्याला पाठमोरी उभी राहत म्हणाली...
"ठीक आहे सत्य नाही बदलू शकत! पण वाईट घटना वाईट गोष्टी विसरल्या जाऊ शकतात.." तो तिच्या समोर येऊन तिला पुन्हा समजावत म्हणाला... यावर मात्र आता ती काहीच बोलली नाही...
"स्वामीनी तुला मी सकाळीचं सांगितलेलं आपण उद्या बाहेर जाणार आहोत मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे!" तो तिच्या नजरेत बघत बोलला.. तसे त्याच्या नजरेतले भाव पाहून तिच्या काळजाची धडधड प्रचंड गतीने वाढली... तशी ती पटकन तिथून थोडं लांब जाऊन उभी राहिली... तो समजू शकत होता तिच्या मनाची अवस्था! आत्ता तिला शांत पणे समजावन गरजेचं होतं...
पूर्ण कथा प्रतिलिपी अँपवर वाचा.
https://marathi.pratilipi.com/series/dqg7dvdbxleq?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=share
#☺️प्रेरक विचार #📚मराठी रोमांचक कथा🧐 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹प्रेमरंग #✍मराठी साहित्य
00:20

