ShareChat
click to see wallet page
search
🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌾 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *♻संस्कारमाला♻* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *⚜आठवणीतील बोधकथा⚜* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🎀 सेठ आणि गरीब व्यक्ती 🎀* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ एक धनिक सेठ आपल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याचे ताटात पुजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे. ईश्वर प्रसन्न होईल या आशेने त्याने हे दीर्घकाळ केले. मात्र तसे झाले नाही, एके दिवशी त्याला मंदिरात जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली, ती ईश्वराला म्हणत होती,"हे ईश्वरा! तुझे लाख लाख आभार ! मी तुझ्या कृपेने सुखी झोपत आहे माझा कोणी शत्रू नाही आणि मला कसला त्रास नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा असू दे." घरी आल्यावर हि सेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती कि ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून त्याचे कष्ट कमी होत नव्हते मग तो गरीब ईश्वराला काहीही न देता इतका सुखी कसा? बराच विचार करून सेठ आपल्या दु:खाचे आणि गरीब माणसाच्या सुखाचे कारण शोधण्यासाठी संतांकडे गेला संत त्याची गोष्ट ऐकून म्हणाले, "सेठजी! आपण ज्या प्रमाणे सामान्य माणसाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचे बघत आहात. मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात त्या ईश्वराला साठवून ठेवले आहे. तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेवून जात नाही. तर निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानत आहे. ज्यादिवशी आपला ईश्वराबाबतचा भाव बदलेल त्यादिवशी तुला ईश्वराचे दर्शन होईल. *🔰तात्पर्य-ईश्वराशी सदैव नि:स्वार्थी भक्तीभाव असावा; सुख आणि मनशांती निश्चित मिळते.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍श्री राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/मराठीचे-शिलेदार-585257238244686/ 🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌾 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #आजची ताजी बातमी #📝कविता / शायरी/ चारोळी #ताजी बातमीं