⛳आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳
📜 २१ जानेवारी इ.स.१६५५
शहाजीराजांचे मोरया गोसाविंकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुनांना ताकीद पत्र,
अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहु बजानेब कारकुनांनी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा| सुपे बिदानंद सु|| खमस खमसैन अलफ राजेश्री मोरोवा गोसावी सो|| चिंचवड पा|| पुणे यांचे बाबे रघुनाथ खेडकर येही हुजूर येऊन माळूम केले जे गोसावी यास इनाम पा|| मा|| बा||फर्मान व खुर्दखते वजीरानी व बा|| खुर्दखते रख्तखाना गह्दम सालाबाद ता|| सालुगा||कुलबाब कुलकानु दुमाले चालत असता साल माराकारणे कारकून नवी जिकीर करून गोसावियाचे इनामावरी कनकगिरीपटी नवी बाब जाली आहे ते घाळून पैकीयाची तहसील लाविली आहे व आणखी नविया पटिया जालिया आहेती त्याही घाळून घेऊन म्हणताती तरी ये बाबे माहाराज्रे ताकीद खुर्दखत मर्हामती करून कनकगिरीपटीची व आणिक नवे पटीयाची तसवीस न लगे व उसापती केली असेल टे फिराउन देती यैसा हुकुम केला पाहिजे म्हणौनू माळूम केले तरी गोसावियाचे इनाम कुलबाब कुलकानु ता|| सालगुदस्ता बा|| सनद दुमाले असता सालमा||कनकगिरीपटी घाळूनु त्यास तहसील लावणे व आणिखी नविया पटीया घाळूनु घेउनू म्हणणे हे तुम्हास कोण फर्मावले आहे यावरून तुमचे कारकुनीची बूज जाहीर जाली आता खुर्दखत पावताच याचे इनामावरील कनकगिरीपटी घेतली असेली व टे आणिखी नविया पटीया काही घातलिया असतील तरी त्या दुरी करणे काही उचापती केली असेल तरी टे जराबजरा फिराउन देवणे त्याचा एक रुका ठेविलियावरी साहेब तुमची नुरी ण ठेवीत पेस्तर हरयेक बाब येकजरा याचे इनामाचे वाटे नव जाणे सालाबाद चालिलेप्रमाणे चालवणे तालिक घेऊन असल खुर्दखत फिराउन देणे फिर्यादी येऊ ण देणे पा|खा|| जैनाखान पिरजादे बा||
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/8dJsTR_p0gQ
📜 २१ जानेवारी इ.स.१६६२
शिवरायांचा कोकणात अमल !
शके १५८३ च्या माघ शु. १२ रोजी श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांनी तळकोकण काबीज करून तेथे आपला एक अमल बसविला.
विजापूर दरबारने अफझलखानास आपल्यावर पाठविले याबद्दल शिवरायांच्या मनांत राग होता. त्याचा सूड घेण्यासाठी कल्याण पासूनच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी आपले लक्ष वेधवून घेतले. आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापान्यांचाही बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतु शिवरायांचा होता. दाभोळ, राजापूर, कारवार इत्यादि धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्दीस मदत करीत. तेव्हां त्यांची ही ठाणे उठवणे अगत्याचे होते. म्हणून शिवरायांची स्वारी आता या उद्योगास लागली. कोंकणांतील श्रीमंत शहरे व पेठा हस्तगत केल्या. निजामपूर, दापोली, पालवण, संगमेश्वर वगैरे ठिकाणे हस्तगत केली. पुढे शिवराय राजापुरास आले. तेथील इंग्रजांची वखार लुटून उपद्रव देणाऱ्या सहा इंग्रजांना त्याने कैदेत ठेविले. सर्व प्रदेश ताब्यात आल्यावर प्रचितगड, पालगड, मंडनगड हे किल्ले त्यांनी नवीन बांधले. सर्वत्र शिवरायांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन तळकोकण महाराजांस अजोनी झाले.
कोकण हस्तगत झाल्यावर शिवरायांची फौज दाभोळवर आली. या संपन्न बंदरात अफझलखानाची तीन जहाजे होती. ती घेऊन तेथील अमलदार राजापुरास पळून गेला. खानाची तन जहाजे इंग्रजांच्या आश्रयास गेली. इंग्रज सुखासुखी जहाजे शिवरायांकडे देत नव्हते. अफझलखानाची दुर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती. शिवरायांचे नाव ऐकताच भीतीने वखारीचा मुख्य रेव्हिंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रातून पळून गेला. पुढे रॅडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड इत्यादि इंग्रजांनी काही आगळीक केली म्हणून शिवरायांनी त्यांना कैदेत ठेविले, शिवाजीच्या अधिकार्याने इंग्रजांना कळविले, " महाराजांस सिद्दीचे ताब्यातून दंडा राजपुरी घ्यावयाची आहे, त्या कामी तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हास मोठे बक्षिस देऊ, नाही तर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हावयाची नाही."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ जानेवारी इ.स.१७१८
गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद!
"कोल्हापुरच्या सरदारांनी I. साष्टी प्रांतात घुसताच गोवा बेटातील रहिवाशांची नुसती पाचावर धारण बसली, आक्रमकांनी मडगाव, कुक्कल्ली आणि वेरडे ही गावे लुटली. नावेलीचे श्रीमंत चर्च त्यांनी साफ धुऊन नेले. या चर्चचा भक्तगण फार मोठा आहे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ जानेवारी इ.स.१६८८
(पौष वद्य १३, त्रयोदशी, शके १६०९, संवत्सर प्रभव, वार शनिवार)
छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण!
आपल्या अद्वितीय पराक्रम कौशल्यावर कुतुबशाही प्रदेशातील पण मोगली अंमलाखाली प्रदेशावर प्रचंड हल्ला करून सुमारे १४० शहरे व काही किल्ले घेऊन मोगलांना नुसता तडाखा दिला नाही तर भुईसपाट केले, ती तारिख होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २१ जानेवारी इ.स.१७४०
स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/8dJsTR_p0gQ
📜 २१ जानेवारी इ.स.१८१९
वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्ध -
हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. २१ जानेवारी ला हाटकरांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रौबर्ट पिटमन याने ब्रिटीश अधिकारी हेन्री रसेलला लिहिलेल्या पत्रात नोवासाजी नाईकांच्या गनिमी युद्धनीतीचा उल्लेख केला आहे. "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले." निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २१ जानेवारी इ.स.१६६१
आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यात सामिल करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोकण मोहिम हाती घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू


