⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २५ जानेवारी इ.स.१६५६
महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो - "इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव, गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/LHQF2gwGFKg
📜 २५ जानेवारी इ.स.१६५८
मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. २५ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून सोनाजी विश्वनाथ यांस औरंगजेबाच्या भेटीसाठी बेदरला धाडले. जुनी निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यांतील कोकणपट्टी आपल्याला मिळावी अशी शिवाजीराजे यांनी आपल्या वकीलाकरवी औरंगजेबास विनंती केली. धूर्त औरंगजेबाने राजांचा डाव ओळखला व वकीलास सांगितले की, “हा मामला महत्त्वाचा असल्यामुळे खुद्द शिवाजीराजे यांनीच मला भेटावे हे बरे” राजे ओरंगजेबास भेटण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी औरंगजेबाच्या रागाची पर्वा न करता मोगलांच्या ताब्यांतील जुन्नर व अहमदनगर ही शहरे जिंकून घेतली. इतक्यात औरंगजेबास शहाजहान बादशहा आजारी असल्याचे समजले तेव्हा दिल्ली तक्त बळकावण्यासाठी त्याने घाईने उत्तरेची वाट धरली. वाटेत असता आपल्या सेना अधिकाऱ्यांस पत्रे लिहून शिवाजीराजांच्या पारिपत्यासाठी हालचाली करण्याचा आदेश दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'छत्रपती शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.''
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती. सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल -जेव्हा शहाजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना ""पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे... आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/LHQF2gwGFKg
📜 २५ जानेवारी इ.स.१६८४
व्हिसेरेईने गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन पोर्तुगालच्या राजास लिहीलेले पत्राचे वर्णन!
आमच्या राजाची अवस्था शोचनीय आहे. मोगलांमुळे आमचे रक्षण झाले. परंतु मोगलांनी हे राज्य घेण्याचे ठरविले तर त्यांची अवस्था वाईट होईल आणि मोगल निघून गेले तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वारीचा धोका पुनः आहेच." आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू आधिकारी नाहीत. किल्ले निरुपयोगी झाले आहे. तंत्रज्ञाची, गोलंदाजांची आणि दारुगोळ्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई तर पाचविलाच पुजलेली आहे. हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भिती आहे. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१६८४
(माघ वद्य ४, चतुर्थी शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार शुक्रवार)
पोर्तुगिजांची शोचनीय अवस्थेबद्दल कोंट द आल्वोरचे पत्र!
पोर्तुगीजांची शोचनीय अवस्था झाली. बारदेशाच्या हल्ल्यात मराठ्यांनी अनेक परगण्यांवर हल्ला केला. मराठे इरेसच पेटले होते. इथला दैनंदिन वस्तूंचा पुरवठा मराठ्यांनी बंद केला. त्यामुळे पोर्तुगीजांची चांगलीच कोंडी झाली. मराठ्यांनी धर्मांधतेचा कळस केलेल्या पोर्तुगिजांना धडा शिकविण्यासाठी पोर्तुगीजांचे चर्च पाडून टाकले. चर्च मधील सर्व मुर्त्या फोडून बऱ्याच लोकांना कैद केले. 'छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य पळपुटे असून छत्रपती संभाजिराजे सर्व सैन्यानिशी जरी गोव्यात आले तरी आपण गोव्याचे रक्षण करू' अशी फुशारकी मारणारा 'कोंट- द- आल्वारे' याची अत्यंत शोचनीय अवस्था मराठी आक्रमनाणे केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१७००
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता. असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. धनाजीने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते. एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१७३७
मडगाव शहर मराठ्यांच्या हाती! मंडगाव शहर मराठ्यांच्या हाती पडले तेथेच त्यांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ केला. मडगावची तटबंदी मराठ्यांनी काबीज करताच कुकल्ली येथील ठाण्याचा देशी अधिकारी कॅप्टन तुकू नाईक हा आपल्या सैन्यासह मराठ्यांना येऊन मिळाला. ह्यावरून गोव्यातील हिंदू पोर्तुगिजांच्या छळाने किती संत्रस्त झाले होते ते सिद्ध होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀


