ShareChat
click to see wallet page
search
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ४ जानेवारी इ.स.१६६४ (पौष शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार) छत्रपती शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे आजच्या रात्री येऊन धडकले. (सकाळी १०, वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील ईनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, “ईनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.” सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. ईनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/NqhJohCxN_8?si=Nu3C9n3j3UUHcbaB 📜 ४ जानेवारी इ.स.१६६५ ( पौष वद्य त्रयोदशी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, बुधवार ) महाराज प्रतापगडी :- महाराज ग्रहणानिमित्त पर्वणी साधण्यासाठी व दानधर्म करण्यासाठी तसेच आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडी दाखल. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ जानेवारी इ.स.१६८१ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे पोर्टगीजांशी फारसे चांगले संबंध नव्हते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंनी मराठी मुलखाभोवती असणाऱ्या परकीय सत्ताधीशांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. ५ मे १६८० ला त्यांनी आपला वकील गोव्याच्या व्हाइसरॉय कडे पाठवून मैत्रीचा तह करण्यास सुचवले होते. ही बोलणी सुरू असतानाच मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी याने बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटले व गोव्याकडे मौल्यवान रत्ने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले. या बातम्या समजताच गोव्याचा व्हाइसरॉय अंतोनियो पाइस द सांदे याने मोरो दादाजीला पत्र पाठवून या घटनेचा निषेध केला व पकडलेल्या माणसांना सोडले नाही तर संभाजीराजेंना आपल्याशी मैत्री नको आहे असे समजण्यात येईल असे सांगितले. शिवाय धर्माजी नागनाथ व मोरो दादाजी यांच्या प्रांतातील व्यापरही बंद केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स.१६८४ बापाच्या सांगण्यानुसार संभाजी महाराजांवर चाल करण्यासाठी शहजादा मुअज्जम कोकणात उतरला. डोंगर दर्यांची कधीच सवय नसलेली, आयुष्यातील बराचकाळ आयषोआरामात घालवलेल्या शाही फौजेला सह्याद्री सोबत मिळते जुळते घेता आलेच नाही, मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन परतताना त्यांच्यावर उपासमारीची भयानक वेळ ओढवली, जीवाचीच धास्ती अशी काही बसली कि अंगावरील कपड्याची गत ती काय 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स.१७२१ सय्यदबंधूंपैकी हुसेनअली सैय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर सरदाराविरुद्ध लढत होता. अन् त्याच सुमारास हैद्राबादच्या निजामाने कुरापती काढायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम सैय्यद बंधूंच्या मदतीला जाणे गरजेचे होते. सरलष्कर हैबतराव निंबाळकर मराठी फौजेनिशी खानदेशात निघाले. यावेळी फौज नक्की किती होतीबते समजत नाही, परंतु निदान वीस हजार मराठी फौज असावी. खानदेशातील बंड मोडले गेले. इकडे निजामाच्या फौजा आता उघडउघड स्वराज्यात घुसखोरी करू लागल्या होत्या. निजामाच्या मोंगली फौजा शेवगाव-पैठण ओलांडून औरंगाबादेत येण्याच्या मार्गावर होत्या. मजल दरमजल करत मराठी फौजा औरंगाबादेस पोहोचल्या. दि. १५ डिसेंबर १७२० रोजी निजामाच्या फौजांत आणि मराठी फौजांत मोठे युद्ध झाले. खानदेशातील विजयामुळे मराठ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झाले होते. निजामाचा दारूण पराभव झाला. निजाम दाती तृण धरून शरण आला. यानंतर दिनांक ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण येथे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजामाची भेट झाली. उभयतांची ही प्रत्यक्ष पहिलीच भेट होती. पण पहिल्याच भेटीत निजामाला बाजीरावांची चांगलीच ओळख झाली होती. या साऱ्या गोष्टी सासवडला पेशवेवाड्यात समजत होत्या. भेटीच्या एक दिवस आधी मातोश्री राधाबाईंनी बाजीरावांना पत्र पाठवले होते. पूर्वी बाळाजी विश्वनाथांच्या कारभारात राधाबाईंनी प्रत्यक्ष सहभाग जरी घेतला नसला तरी राजकारणात कधी, काय अन् कसे करायचे याची राधाबाईंना चांगलीच माहिती होती. म्हणूनच निजामाची भेट घेताना भेटीसाठी कसे जावे, भेट केव्हा व कोणत्या ठिकाणी घ्यावी याचे संपूर्ण तपशीलवार मार्गदर्शन राधाबाईंनी केले होते. राऊ अजून राजकारणात नवखे आहेत यांच्या काळजीपोटीच त्या सल्ले देत होत्या. बाजीरावांनीही मातोश्रींच्या सल्ला-मसलतीचा योग्य विचार केला व ते निजामाच्या भेटीला गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जानेवारी इ.स. १७७९ काल्पिचे ठाणे इंग्रजांनी घेतल्यामुळे इंग्रज-मराठे यांच्यात बिघाड झाला आहे ही बातमी उघडच होती. हेस्टिंग्जनेही मुंबईकर इंग्रजांना रघुनाथरावांना घेऊन पुण्यास जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे कर्नल इगर्टन या गोऱ्या साहेबाच्या नेतृत्वाखाली ५०० इंग्रज व २००० हिंदुस्थानी शिपायांसह रघुनाथराव आणि अमृतराव मुंबईची खाडी ओलांडून पनवेलजवळ उतरले. दि. २५ डिसेंबर १७७८ रोजी इगर्टन रघुनाथरावांसह बोरघाट चढून खंडाळ्यास आले. परंतु हे पाहताच मराठ्यांनी आसपासच्या प्रदेशातील सर्व प्रदेश जाळून टाकला. त्यामुळे इंग्रजांचे दाणा-पाणी संपूर्ण तुटले. दि. ३० डिसेंबर १७७८ रोजी इगर्टनची फौज खंडाळ्याहून पुढे निघाली. दि. ४ जानेवारी १७७९ रोजी कााजवळ इंग्रजी पलटणी आल्या असता भिवराव पानशांच्या तुकडीने हल्ला चढवला. वडगाव मावळातील एकवीरा भवानीसमोरच कॅ. स्टुअर्ट मारला गेला. याच सुमारास इगर्टन आजारी पडल्याने कॅ. कॉकथन याने मोर्चा सांभाळला. दि. १३ जानेवारी रोजी तळेगावच्या मुक्कामी इंग्रज पलटणी उतरल्या. पानशांच्या तोफखान्यात मुसा नारज हा एक फ्रेंच गोलंदाज होता. याचे मूळ नाव होते 'मस्यू नोरोन्हा'. याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्रजांची पाचावर धारण बसली होती. यानंतर पानशांच्या मदतीसाठी रामचंद्र गणेश कानडे, बाजी पंत, शिंदे-नाना इ. सर्वजण ४५००० फौजेसह वानवडीहून निघाले. मराठी फौजा थेट पलटणींना जाऊन भिडल्या. इंग्रजांच्या पाच तोफा पाडाव झाल्या. चार-पाचशे माणसे पडली. दोन हजार बंदुकांची लूट मिळाली. हे होत असतानाच बाळाजीपंत फाटक आपली चार हजार फौज घेऊन कल्याण प्रांतात उतरले. बोरघाटाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. इंग्रजांची रसद पूर्णपणे बंद झाली. शेवटी इंग्रजांचे खूपच नुकसान होऊ लागले हे पाहताच कॅ. फॉर्मर या अधिकाऱ्याने नाना, महादजी आणि हरिपंततात्यांची भेट घेतली. नाना-महादजींनी फॉर्मरला स्पष्ट दमच भरला की, रघुनाथरावांना मराठ्यांच्या हवाली केल्याशिवाय अन् मुलुखाच्या उपद्रवा बदल्याचा तह केल्याशिवाय तुम्हाला परत जाता येणार नाही. यावर फॉर्मर म्हणाला की, "तह करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही." तेव्हा नानांनीही स्पष्ट विचारले, "मग पुरंदरचा तह मोडून मराठ्यांवर हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कसा?" शेवटी नाईलाजाने इंग्रजांनी मराठ्यांशी नवा तह केला. तो तहनामा पुढीलप्रमाणे- १) रघुनाथरावदादास पुन्हा मराठ्यांच्या हवाली करावे. २) साष्टी, ठाणे, उरण आणि गुजरातचे काही महाल इंग्रजांनी परत मराठ्यांना द्यावेत. ३) साष्टी कब्जा होईपर्यंत दोन इंग्रज इसमांनी मराठ्यांकडे कैदी म्हणून रहावे. ४) रघुनाथरावांकडून घेतलेले सर्व दस्तऐवज परत करावे व कलकत्याहून येणाऱ्या पलटणी परत पाठवाव्यात. याशिवाय भडोच परगणा आणि ४१००० हजार रुपये महादजी शिंद्यांना नजराणा म्हणून द्यावेत. इंग्रजांनी या तहनाम्यावर सह्या करताच रघुनाथरावदादांसह कॅ. फॉर्मर आणि स्टुअर्ट हे दोन इंग्रज मराठ्यांच्या स्वाधीन झाले आणि माघ शुद्ध १ म्हणजेच दि. १८ जानेवारी १७७९ रोजी नारो गणेश, विसाजी कृष्ण इ. मंडळींनी इंग्रजी फौजांभवतीच्या चौक्या उठवल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
📜इतिहास शिवरायांचा - the qreat marathauarriors 'IIVl` 004 VDINESH CRDA RahT Borse Pati शिवदिनविशेष जानेवारी इ.स.१६८१ < मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी व गोव्याकडे मौल्यवान रत्ने यांनी बारदेश मधील सिओलीम हे गाव লুল घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the great marathawarriors the qreat marathauarriors 'IIVl` 004 VDINESH CRDA RahT Borse Pati शिवदिनविशेष जानेवारी इ.स.१६८१ < मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी व गोव्याकडे मौल्यवान रत्ने यांनी बारदेश मधील सिओलीम हे गाव লুল घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the great marathawarriors - ShareChat