त्याची ती भेदक आणि थंड नजर पाहून तीच काळीजच गोठून गेल...
ती पुढे काही बोलायला तोंड उघडणार... इतक्यात त्याने दुसरा हात तिच्या तोंडावर दाबला... कारण घरातले सगळे शांत पणे झोपले होते... ती स्वतःला सोडवण्यासाठी धडधडपडत होती झटापट करत होती.. पण घरातल्यांची झोप मोड नको म्हणुन तो तसच जबरदस्ती तीच तोंड दाबून तिला ओढत घेऊन तिला दिलेल्या खोलीत आला...
अन् तसच तिला आतमध्ये ढकलून दिल.... आत्ताही तिने पडता पडता कसबस स्वतःला सावरल.. तीच आजच धाडस पाहून तो चांगलाच भडकला होता. आज तिच्या अंगावर कालचे भरजरी कपडे नव्हते एकही दागिना नव्हता... सुहासिनीने दिलेली रेड कलरची सिल्क साडी खिडकीतून खाली उडी माराण्याच्या हेतूने साडीचा पदर कमरेला खोचलेला.. त्यातून तिची गोरी पान नाजुक कंबर आणि धपापणारा उर... त्याच्या मनातली पुरुषी भावना नकळत उफाळून आली... पण पुढच्या क्षणी त्याने मनातले विचार झटकले अन् त्याने आता तिच्याकडे रोखून पाहिलं....
तशी तिने खाली बघत डोळ्यावर आलेली केसांची लट कानामागे टाकली.. लांब केस आत्ता वरती बांधून क्लिप लावलेला... दोन चार चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर आलेल्या..... नितळ गोरा रंग पण आत्ता तीचा चेहरा रागाने लाल बुंद झालेला... राग,भीती आणि इथून बाहेर पडता आलं नाही त्याच दुःख सर्वच भावना मनात एकवटून आलेल्या, आणि त्या आत्ता तिच्या बोलक्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या...
"कालच आम्ही बजावल होत तुला..इथून पळून जाण्याचा विचार पण मनात आणायचा नाही!" हृदय चिरून टाकणारा त्याचा थंड आवाज.. तितकीच तीक्ष्ण समोरच्याला धडकी भरवणारी भेदक नजर... चेहरा मात्र निर्वीकार.एवढी धीट ती पण सूर्याला पाहूनच तिला धडकी भरलेली... त्याला कारण ही तसच होत इतक्या सर्वांसमोरून तो तिला घेऊन येतो तर तो काहीही करू शकतो जाणून होती ती.. त्याचा औरा पाहून भले भले गप्पगार व्हायचे तर ही नाजुक सई काय चीज होती त्याच्या पुढे त्याचे ते आग ओकणारे डोळे पाहूनच तीचा घसा सुललेला....
पण थोड पुढे येऊन त्याने स्वतःला थांबवलेलं पाहून तिच्यात जरा हिम्मत आली.. "मी.. मी काय तुमची गुलाम आहे का??? तुमचं सर्व ऐकायला.!!" धीर एकवटून त्याच्या त्या लाल बुंद झालेल्या डोळ्यात रोखून बघत तिने विचारल अन् इकडे त्याच टाळक सटकल.."होय...... गुलामच आहेस तु आमच्यासाठी!एक दिवस तुझ्या पूर्ण खानदानाला गुलाम बनऊन पायाशी नाही आणलं तर नावाचा सूर्या नाय मी!!" तो चिडून दोन पाऊल पुढे येत बोलला... अन् ती घाबरून चार पाऊल मागे गेली.पूर्ण कथा प्रतिलिपी अँपवर वाचा..
https://marathi.pratilipi.com/series/9kgrc0ehchpr?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=share
#☺️प्रेरक विचार #📚मराठी रोमांचक कथा🧐 #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹प्रेमरंग

