कमळ फुलले... कमळ फुलवले!
सेना मनसे हरले... सेना मनसे जिंकलेही!!
निवडणूक झाली, निकाल लागले, ज्यांना जसे हवे होते तसे त्यांनी लावून घेतले... त्यामुळेच हरले कोण आणि जिंकले कोण हे कागदावरचे गणित कमळ फुललेले दाखवत असले तरी गल्ली बोळातून खणखणीत आवाज आताही येतोय तो फक्त सेना मनसेच्या युतीचाच... खोटं वाटतं असेल तर मुंबईच्या नको तर रत्नागिरीतल्या कुठल्याही नाक्यावर उभे रहा.. शांतपणे चर्चा ऐका... मग कळेल... सेना मनसे मशीनवर हरली असली ( की हरवली) तरी आम मराठी जनतेची मने त्यांनीच जिंकलीत... अर्थात हार ही हारच असते... त्याला कितीही मुलामा लावला तरी पराभव खेदजनकच असतो पण हा पराभव असला तरी खेदजनक वाटतं नाहीये... उलट अभिमानास्पद वाटतोय... कारण सगळं काही विरोधात असताना "मराठी" माणसानं रस्त्यावर उतरून आवाज शिवसेना मनसेचाच राहील हे शिवतीर्थावर दाखवलं...
सेना मनसेला 60+5 जागा मुंबईत मिळाल्या... 40 आमदार पळवणारे मात्र 25 मध्येच आटपले... (की आटपवले. भाजप गद्दारांना कधी मोठं करत नाही.योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जातो. कारण खुद्द तै गद्दारी करूनच सत्तेवर आले आहेत, हा त्यांचा इतिहास सांगतो) आणि भाजप 100 + झाली. आता त्यात दुसर्यांची पळवलेली पोरं निवडून आणल्याने तो स्कोअर वाढलाय हे कुणीही सांगेल... पण आकडेवारीनुसार कमळ फुलले.
एकुण पहाता यावेळी भाजपचे म्हणे मागच्यापेक्षा 273 नगरसेवक वाढले... मुंबईत 7/8 अशी आकडेवारी सांगते. म्हणजे एवढी आदळआपट करून फक्त 273...? आणि मुंबईत 7/8...? कदाचित एकदम वाढ दिसली तर.. हा पोक्त विचार असू शकेल... पण या वाढीत मुळचे भाजपेयी किती वाढले हा संशोधनाचा विषय आहे... सतरंजी उचले अजून थाळ्या वाजवत असताना काल आलेला नवा बनपाव महानगरपालिकेच्या बशीत बसला पण... पण "देश प्रथम" ना. मग मराठी, महाराष्ट्र गेला खड्ड्यात. आधी मावशी महत्त्वाची... मावशीची पिलावळ आता मराठी आईचे दुध पिवून तिलाच बदनाम करत फिरतील... तेव्हा आपल्याला केवीलवाणे बघत रहावे लागणार आहे... आणि हे सारे घडवणारी कीड परप्रांतीय नसून आपल्याच महाराष्ट्रातील आहे हे दुःख पचवत रहावं लागणार आहे...
त्यातल्या त्यात मराठी माणसाने सेना मनसैवर विश्वास टाकलाय... किंवा सगळंच मशीनवर खाल्ल तर आताच लोकं मारतील या जाणिवेतून असेल महानगरपालिकेत 65 कट्टर मराठी नगरसेवक असतील... विरोधात बसून काम करण्याचा अनुभव शिवसेनेला नवीन नाही... पण आता कमळकिड्याकडून काही शिकून त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची विकृती उंगली तेढी करून बाहेर काढा... त्यांना सळो की पळो करून सोडा तरंच..
तरंच हा पराभव अभिमानास्पद ठरेल...
बाकी जिंकून आलेल्या आमच्या मराठी "हिंदू" नगरसेवकांचे आणि सत्तेचा सोपान चढणार्या पाकिस्तानी बिर्याणी खावूनही न बाटलेल्या "हिंदू" नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन....
लवकरात लवकर कामे सुरु करून प्लस मध्ये असलेल्या मुंबई महानगरपालिकेला नागपूर महानगरपालिकेप्रमाणेच कर्जबाजारी कराल ही अपेक्षा...
आणखीन एक शेवटचे पण महत्त्वाचे... कमळ फुलतांच मंडळींचा उत्साह... नव्हे नव्हे... उन्माद... हा उन्माद अचानक एवढा वाढलाय की किचनमधुन लपून लाठीकाठी खेळणारे आता यांव करू आणि तांव करू च्या वल्गना करू लागलेत... तर त्यांना आठवण करून द्यायची म्हणुन सांगतो दंगलीत शिवसेना होती म्हणुनच वाचलात आणि कोरोनातही शिवसेना होती म्हणुनच तरलात... हे मान्य करा करू नका पण शिवसेना संपवण्यासाठी जे काही करता येईल ते करणारे कधी काळी शिवसेनेमुळेच वाचले होते... ही उपकाराची फेड त्यांनी कशी केली हे दिसतेय..उद्या ते उपकार नव्हतेच अशी सोयीनुसार भुमिका घेतीलही पण हा फोटो... हा इतिहास कसा लपवाल... बाप तो बाप होता है...
धन्यवाद
#शिवसेना #राजकारण #राजकारण #राजकारण #राजकारण


