ShareChat
click to see wallet page
search
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 २३ जानेवारी इ.स.१५६५ विजयनगर साम्राज्याचा अंत ! शके १४८६ च्या माघ शु. ५ ला प्रसिद्ध तालीकोटचे युद्ध होऊन दक्षिण भारतातील बलाढ्य असे विजयनगरचे हिंदु राज्य नष्ट झाले. देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर दक्षिणेत शंभर वर्षे बजबजपुरी माजली होती. गोदा, कृष्णाकांठावर इस्लामी लाटेस तोंड देणारे कोणी नाही असे पाहून तुंगभद्राकाठचे हिंदु लोक या उद्योगास लागले. साऱ्या दक्षिण प्रांतात इस्लामी सत्ता प्रबळ होणार असा रंग दिसू लागला. धर्म नष्ट झाला, पारतंत्र्य आले, मंदिरे जमीनदोस्त झाली. अशा कठीण समयी तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर विजयनगर शहरी (सुग्रीवाच्या किष्किधा नगरीच्या जागी) विद्यारण्य ऊर्फ माधवाचार्य यांच्या साहाय्याने हरिहर आणि बुक्क या बंधूंनी एका प्रचंड हिंदु साम्राज्याची मुहूर्तमेढ शके १२५८ मध्ये रोविली ! बुक्क, दुसरा हरिहर, नृसिंहराय, कृष्णदेवराय, अच्युतराय, सदाशिवराय, आदि अनेक पराक्रमी राजे विजयनगरच्या गादीवर होऊन गेले. विजयनगर एवढे ऐश्वर्यशाली साम्राज्य त्या वेळी दुसरे नव्हते. परंतु शेवटी निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा व बेरीद- शहा या चौघा मुसलमान बादशहांनी रामराजास ठार मारून विजयनगरचे हिंदु राज्य धुळीस मिळविले. कृष्णेच्या काठी रकसगी व तंगडगी या दोन खेड्यांत रामराजाच्या सैन्याचा तळ होता. त्यावरून या युद्धास राक्षसतागडीचे युद्धहि म्हणतात. माघ शु. ५ ला दोनहि फौजा युद्धास सज्ज झाल्या. रामराजा स्वतः पालखीतून सर्वांना उत्तेजन देत होता. बराच वेळ अगदी कडाकडीचे युद्ध झाल्यावर हुसेन निजामशहा फळी फोडून रामराजाच्या अंगावर धावला.. सत्तर वर्षांचा रामराजा पालवीत चढत असताच निजामशहाचा एक मस्त हत्ती त्याच्या अंगावर धावला. भोई पालखी टाकून पळाले. रुमरिखान नावाच्या आधिका-्याने रामराजास धरून निजामशहाकडे नेले. निजामशहाने त्याचे शिर कापून ते भाल्यास लावले व शत्रूची कळण्यासाठी चोहोकडे फिरविले ! हिंदु सैन्याची धूळधाण उडाली. “ करनाटकी लस्केर तमाम चिंदीचोल जहाले, कुल लस्कर मिलोन विजयनगरासी गेले-" 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/T4LfWR2Lj9s 📜 २३ जानेवारी इ.स.१६६४ ( माघ शुद्ध पंचमी, शके १५८५, संवत्सर शोभन, शनिवार ) शिवरायांचे पितृछत्र हरवले :- !! स्वराज्यसंकल्पक सरलष्कर महाराजा शहाजीराजे भोसले यांची ३५८ वी पुण्यतिथी !! !! हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या एक मराठी झंजावती वादळाचा अपघाती अस्त !! !! ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्यांचे फर्जंद महाराजा शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरलेमहाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले. !! ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य, शिवबा आणि संभाजी त्यांचे फर्जंद महाराजा शहाजी राजे भोसले म्हणजेच थोरलेमहाराजसाहेब यांचे कर्नाटकात होदेगीरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन झाले. !! !! महाराजा शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून महाराजा शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. !! !! अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना महाराजा शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ.स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत महाराजा शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून "सरलष्कर" ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना महाराजा शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता. !! !! शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. महाराजा शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही महाराजा शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. !! !! दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने महाराजा शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून महाराजा शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता महाराजा शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात महाराजा शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी महाराजा शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. महाराजा शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. महाराजा शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे, इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान महाराजा शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व राजमाता जिजाऊ आऊसाहेब समवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. !! !! माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांचे पिता व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे यजमान. !! !! आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य उभारणीच्या कार्यात अतुलनीय पराक्रम करत सदैव साथ देणाऱ्या महाराजा शहाजीराजे त्यांच्या पराक्रमाला मानाचा त्रिवार मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम !! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जानेवारी इ.स.१६८३ गोव्याच्या व्हाईसरायच्या एका पत्राची नोंद! "गेल्या ऑगस्ट महीण्यात मी मोगलांचे सैन्यासंबंधी लिहिले होते. हे सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलखात ३ बाजूंनी शिरले आहे. या सैन्याबरोबर जे सरदार आहेत ते जिंकलेल्या प्रदेशावर तटबंद्या उभारीत आहेत. राज्य खालसा करण्याचा विचारपण यापुर्वी कधी केला कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे नव्हता." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जानेवारी इ.स.१६८४ पोर्तुगीज अधिकारी विजरईने आपला वकील जुआंव आंतुनिस पोर्तुगाल यांस पाठविले. शहाआलमचे सैन्य डिचोलीहून निघाले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जानेवारी इ.स.१७४५ गोपाळगड उर्फ अंजनवेल स्वराज्यात इ.स. १७४५ मध्ये शाहू महाराजांनी आणि नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा जंजिरेकर सिद्दीविरुद्ध आघाडी उघडण्याचा मुहूर्त साधला आणि यात पूर्वीप्रमाणे इंग्रज सिद्दीला मदत करू लागले ती थांबावी म्हणून म्हणून इंग्रजांना पत्रं पाठवली. शाहू महाराज २० जानेवारी १७४५ रोजी मुंबईकरांना लिहितात, “तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे, आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये”. यापूर्वीच दि. १० जानेवारी १७४५ रोजी नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांना कळवलं होतं, “छत्रपतींची इच्छा अंजनवेल आणि गोवळकोट सिद्दीकडून घ्यावा अशी असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणे वेधण्याचा हुकूम तुळाजीला दिला आहे. तुमचं आणि आंग्र्यांचं वैर असल्यामुळे तुळाजींच्या जहाजांना तुमच्यापासून उपद्रव होईल तो होऊ नये म्हणून तुम्हाला सांगण्याचा मला छत्रपतींचा हुकूम झाला आहे, त्यानुसार मी हे लिहीत आहे. आंग्र्यांनी दोन्हीही ठिकाणे वेढली आहेत, ती पूर्णपणे कब्जात येईपर्यंत तुम्ही सिद्दीला मदत करू नये अथवा तुळाजींच्या जहाजांना विरोध करू नये. छत्रपतींना जे सुखावह आहे तेच मलाही” (कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास, पृष्ठ ९२,९५). अखेर दि. २३ जानेवारी १७४५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्लेदार याकूतखान याच्याकडून कायमचा घेतला (आंग्रे शकावली पृष्ठ १००) आणि किल्ल्याचं नाव ठेवलं गोपाळगड ! याबद्दल पेशव्यांच्या शकवलीत उल्लेख आहे की, “अंजनवेल उर्फ गोपाळगड शामळ जंजीरकर याजपासून माघ शु॥ २ भौमवारी (२३ जानेवारी १७४५) रात्रौ तुळाजी आंग्रे यांनीं घेतला. नंतर तुळाजी बिन कान्होजीराव यास सरखेलीची वस्त्रें दिली”. https://youtu.be/T4LfWR2Lj9s 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २३ जानेवारी इ.स.१८९७ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - SHVDINSHES CREATEDBY Rahul Borse Patil II Mul ARRIORS CRPAT M शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६४ २३ स्वराज्य संकल्पक महापराक्रमी फर्जद शहाजीराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. great_marathawarriors the great marathauarriors the great marathauarriors The SHVDINSHES CREATEDBY Rahul Borse Patil II Mul ARRIORS CRPAT M शिवदिनविशेष जानेवारी इ॰स.१६६४ २३ स्वराज्य संकल्पक महापराक्रमी फर्जद शहाजीराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. great_marathawarriors the great marathauarriors the great marathauarriors The - ShareChat