#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दुपारच्यावेळी उकाडा जाणू शकतो. राज्यासह देशातही परिस्थिती सारखीच आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती अनेक भागात सध्या बघायला मिळत आहे. यादरम्यान नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.


