#🙏प्रेरणादायक / सुविचार मी मुळची मुंबईची आहे माझा १ ली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण हे मुंबईतच झाले तरीपण माझी बोली भाषा अशी गावंढळच आहे कारण घरी आईवडील याच भाषेत बोलायचे त्यामूळे मलाही तशीच भाषा येऊ लागली. शाळेत मॅडम ओरडायच्या, की तू मुंबईत राहूनदेखील गावंढळ भाषेत का बोलतेस? तेंव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. माझा बालपण हे अत्यंत गरिबीत पत्र्याच्या खोलीत गेले. माझ्या आई वडिलांचं हे हातावरच पोट होत. काम केले तरच दोन वेळेस जेवायला भेटायचे.
आमचे लग्न हे सोलापूरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार पडले. नवरा प्लंबिंग चे कामे करायचा आणि त्यातूनच आमचा उदरनिर्वाह व्हायचा. त्यांना व्हिडिओ बनवायची खूप आवड होती. आधी नवरा टिकटॉकवर गाण्याचे वीडियो बनवायचा तर कशी कधी कामाचे व्हिडिओ बनवून टाकायचा. एमजी एकदा नवऱ्यांनी कॉमेडी व्हिडिओ बनवायचे ठरवले आणि त्यात मला घेतले. मला कॅमेराला समोर कसे जायचे काहीच माहीत नव्हते पण नवऱ्याच्या आग्रहाने मी देखील अभिनय करण्याचा प्रयत्न केला. हळू हळू टिक टॉक वरती आमचे लाखांमध्ये फॉलोअर्स झाले. पण अनावधानाने पुढे टिक टॉक बंद झाले आणि आम्ही जे काही कमावलो होतो ते सर्व एका रक्षणातच संपले होते.
मग नवऱ्यांनी यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचे ठरविले आणि तेथून आमचा नव्याने प्रवास सुरू झाला. आमचे अनेक व्हिडिओ प्रचंड वायरल झाले. त्यातून आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू लागलो. माझ्या काही नातेवाईक मला खूप हिणवायचे की, मी लेकर बाळ सांभाळायचे सोडून व्हिडिओ बनवते म्हणून. तरीही आम्ही नव नवीन प्रकारचे व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करायचो.
जेंव्हा आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहिले पेमेंट आले तेंव्हा मी खूप खुश झाले. मी आयुष्यात कधीही इतके पैसे एकसाथ पाहिले नव्हते. त्या पैश्यातून आम्ही आमची पहिली दुचाकी प्लॅटिना घेतली.
आमची बोली भाषा ही प्रेक्षकांच्या खूप आवडीचे आहे आणि त्या भाषेच्या शैलीमूळेच आज आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. खऱ्या अर्थानेच लग्नानंतरच देवाने माझे आयुष्य बदलले आहे. #yogitashinde #ganeshshinde #marathimotivational #MarathiSuccessStory #navrabaykocomedy #marathimulgi