#🙏शिवदिनविशेष📜 🚩🚩🚩*शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६७०* *(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार शनिवार)* *मराठ्यांनी किल्ले सुलतानगड सर केला.* *औरांगजेबाच्या धर्माधतेच्या रोज वेगवेगळ्या कहाण्या छत्रपती शिवरायांच्या कानावर येत होत्या. संपूर्ण हिंदुस्तान औरांगजेबाच्या धर्मांधतेच्या विखारी मांडवाखाळून जात असता, मराठी मनगटे शिवशिवली नसती तर नवल होते. महाराजांनी याच सुमारास मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीमच उघडली... याच वेळेस मराठ्यांच्या २० हजार सैन्याने बागलाणात येऊन, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. औरंगजेबास हे चोख प्रत्युत्तर होते. याच वेळी मराठ्यांनी सुलतान गडाला वेढा घालून किल्लेदार फतहुल्लाखान याला ठार मारले आणि गड जिंकून घेतला. मराठी मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबास आला!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६५७* *बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१६६७* *छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ जानेवारी इ.स.१७८८* *वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह! "वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये ९१ कलमी मैत्रीचा करार होऊन वाडीकर सावंतांने पोर्तुगिजांचे मांडलिकत्व पत्करले."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!*#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
00:29

